मुंबई (Murasu Cyclone) : देश अद्याप अर्णब चक्रीवादळामुळे झालेल्या विध्वंसातून आणि आंध्र प्रदेश व ओडिशातील नुकसानीतून सावरत असतानाच आता ‘मुरासू’ चक्रीवादळाचे संकट घोंघावू लागले आहे. बंगालच्या उपसागरात निर्माण झालेले हे चक्रीवादळ अधिक तीव्र होण्याची शक्यता भारतीय हवामान विभागाने (IMD) वर्तवली आहे. २ नोव्हेंबरच्या सकाळपर्यंत या चक्रीवादळाचे तीव्र चक्रीवादळात रूपांतर होऊ शकते. त्यानंतर २ नोव्हेंबरच्या मध्यरात्रीपासून ३ नोव्हेंबरच्या पहाटेपर्यंत ते दक्षिण आंध्र प्रदेशच्या किनारपट्टीवर धडकण्याची शक्यता आहे. या काळात वाऱ्याचा वेग ताशी १०० ते ११० किलोमीटर, तर वाऱ्याच्या झोतांचा वेग ताशी १२० किलोमीटरपर्यंत पोहोचण्याचा अंदाज आहे. दरम्यान, या चक्रीवादळाच्या प्रभावामुळे महाराष्ट्रातील काही भागांतही पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
सध्या कुठे आहे मुरासू चक्रीवादळ?
हवामान विभागाच्या माहितीनुसार, मुरासू चक्रीवादळ दक्षिण-पश्चिम आणि लगतच्या पश्चिम-मध्य बंगालच्या उपसागरावर केंद्रित होते. हे वादळ चेन्नईपासून सुमारे ५६० किलोमीटर पूर्व-दक्षिण-पूर्वेला, विशाखापट्टणमपासून ६६० किलोमीटर दक्षिण-दक्षिण-पूर्वेला आणि नेल्लोरपासून सुमारे ६३० किलोमीटर पूर्व-दक्षिण-पूर्वेला होते. (Murasu Cyclone)
गेल्या सहा तासांत ताशी सुमारे २३ किलोमीटर वेगाने पुढे सरकल्यानंतर या हवामान प्रणालीचे चक्रीवादळात रूपांतर झाले. २ नोव्हेंबरच्या सकाळपर्यंत त्याची तीव्रता आणखी वाढण्याची शक्यता हवामान विभागाने व्यक्त केली आहे.
२ ते ३ नोव्हेंबरदरम्यान आंध्र प्रदेशच्या किनारपट्टीवर धडकण्याची शक्यता
हवामान विभागाच्या अंदाजानुसार, मुरासू चक्रीवादळ उत्तर-पश्चिम दिशेने सरकत २ नोव्हेंबरच्या रात्री ११.३० ते ३ नोव्हेंबरच्या पहाटे ४ वाजेदरम्यान नेल्लोर आणि नरसापूरदरम्यान दक्षिण आंध्र प्रदेशच्या किनारपट्टीवर धडकू शकते. (Murasu Cyclone)
या काळात ताशी १०० ते ११० किलोमीटर वेगाने वारे वाहण्याची, तर वाऱ्याच्या झोतांचा वेग ताशी १२० किलोमीटरपर्यंत पोहोचण्याची शक्यता आहे. किनारपट्टीवरील नागरिकांनी हवामान विभाग आणि स्थानिक प्रशासनाकडून जारी होणाऱ्या सूचनांकडे लक्ष देण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
आंध्र प्रदेशसह दक्षिण भारतात मुसळधार पावसाचा अंदाज
मुरासू चक्रीवादळाच्या प्रभावामुळे आंध्र प्रदेशच्या किनारी भागांत मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. काही भागांत अत्यंत मुसळधार पावसाचाही इशारा देण्यात आला आहे. (Murasu Cyclone)
समुद्र खवळण्याची शक्यता लक्षात घेता मच्छीमारांना बंगालच्या उपसागरातील काही भागांत मासेमारीसाठी न जाण्याचा सल्ला देण्यात आला आहे. किनारपट्टीवरील नागरिकांनीही स्थानिक प्रशासनाच्या सूचनांचे पालन करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.
महाराष्ट्रातही पावसाची शक्यता; कोकणासह मध्य महाराष्ट्रावर लक्ष
महाराष्ट्रातील कोकण, गोवा, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात १ ते ५ नोव्हेंबरदरम्यान काही ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता आहे. मध्य महाराष्ट्रात १ ते ४ नोव्हेंबरदरम्यान मेघगर्जनेसह वादळी वारे वाहण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. मुरासू चक्रीवादळाचा महाराष्ट्रावर नेमका किती परिणाम होईल, याबाबत पुढील हवामान अंदाज महत्त्वाचे ठरणार आहेत. (Murasu Cyclone)
Hello, You must be familiar with the Nation First approach daily 'Mumbai Tarun Bharat' as a newspaper committed to fearless and nationalist ideals and constantly doing conscious journalism for it. The journey of four decades has been successful only because of your trust and cooperation. Dear readers, we have been making a successful effort to always be perfect in our commitment to the thoughts of the nation and the national interest...
Changing with time is essential for any organization. Daily 'Mumbai Tarun Bharat' has decided to take this role here too and make 'MahaMTB' available in the media for the new 'smart' generation. Today's youth, readers, and citizens are becoming more and more 'smart' day by day. And in today's 'smart' era, information is available in abundance in the Internet-enabled information explosion. However, there is a need for complementary knowledge to determine a modern role and approach that is compatible with culture, motionlessness and tradition.
That is why mahamtb.com, MahaMTB Mobile App', MahaMTB Youtube Channel, MahaMTB Facebook Page, MahaMTB Twitter, MahaMTB Instagram, MahaMTB Telegram, MahaMTB WhatsApp Group etc. through social media and advanced avatar content. We are coming before you. Role in the new era, 'smart' journalism with a view, 'smart' multimedia for the new era, and journalism for a 'smart' Maharashtra will be the side of the game.