पुणे म्हाडाच्या ४४६२ घरांसाठी १ डिसेंबरला सोडत; अडीच लाखांहून अधिक अर्जदार सहभागी होण्याची शक्यता


MHADA Pune Lottery 2026
 
मुंबई, (MHADA Pune Lottery 2026):  म्हाडाच्या पुणे मंडळाच्या ४४६२ घरांसाठीची अर्ज नोंदणी आणि अर्जविक्री प्रक्रिया शुक्रवारी (३० ऑक्टोबर) संपली. या घरांसाठी आतापर्यंत ३ लाख १ हजार ५८६ अर्ज प्राप्त झाले असून, त्यापैकी २ लाख ४५ हजार २३२ अर्जदारांनी अनामत रकमेसह अर्ज सादर केले आहेत. कागदपत्र पडताळणी आणि अनामत रक्कम भरण्यासाठी मुदत शिल्लक असल्याने सोडतीतील सहभागी अर्जदारांची संख्या अडीच लाखांवर जाण्याची शक्यता आहे.
 
पुणे मंडळाने १५ टक्के एकात्मिक आणि २० टक्के सर्वसमावेशक योजनेंतर्गत उपलब्ध झालेल्या घरांसाठी २४ ऑगस्टपासून अर्ज प्रक्रिया सुरू केली होती. तांत्रिक अडचणी आणि महाआयटी प्रणाली बंद असल्याने प्रक्रियेला तीन वेळा मुदतवाढ देण्यात आली. दरम्यान, पुणे मंडळाने सोडतीची तारीख निश्चित केली असून, १ डिसेंबर रोजी ४४६२ घरांची सोडत पार पडणार आहे. त्यामुळे या सोडतीकडे आता लाखो अर्जदारांचे लक्ष लागले आहे.(MHADA Pune Lottery 2026)
 
 




गायत्री श्रीगोंदेकर

मूळची अहिल्यानगर येथील. 'राज्यशास्त्र' विषयातील पदवी. रानडे इन्स्टिट्यूट मधून (सा.फु.पुणे विद्यापीठ) 'एमजेएमसी' विषयात पदव्युत्तर शिक्षण. २०१९मध्ये मुंबई तरुण भारतमध्ये 'मंत्रालय प्रतिनिधी' या पदावर रुजू. सद्यस्थितीत 'इन्फ्रास्ट्रक्चर आणि डेव्हलपमेंट' विशेष प्रतिनिधी म्हणून कार्यरत. राज्यातील पायाभूत सुविधांविषयी फिल्ड रिपोर्ट आणि लेखनात रस.
संबंधित मजकूर