मुंबई (Maharashtra FDA Officers Suspended) : नियमबाह्य कारवाई करण्यास दबाव आणल्याबद्दल अन्न व औषध प्रशासन विभागाच्या (एफडीए) ४ अधिकाऱ्यांचे निलंबन करण्यात आले असून २१ अधिकाऱ्यांच्या विभागीय चौकशीचे आदेश देण्यात आले आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, भिवंडीतील हाय स्ट्रीट इम्पेक्स एलएलपी या कंपनीत जप्त केलेल्या पदार्थांवर ते केवळ धूम्रपानासाठीच असल्याचे नमूद असतानाही कंपनीवर कारवाई करण्यासाठी एफडीएचे ठाण्याचे सह-आयुक्त श्रीकांत करकाळे यांनी सहाय्यक आयुक्त पी. पी. सुर्यवंशी यांच्यावर दबाव आणला होता. तसेच अन्न सुरक्षा अधिकारी के. वाय. चिपळूणकर, शुभांगी कर्णे, अशोक इलागेर, सी. आर. स्वामी, माणिक जाधव यांनाही निलंबनाच्या कारवाईचा धाक दाखवून दबाव आणला होता. शुभांगी कर्णे यांनी रजेवर असलेल्या अधिकाऱ्यांनाही कारवाईसाठी भाग पाडले तर इलागोर यांनी आपल्या हद्दीबाहेर जाऊन कारवाई केल्याचा प्रकार उघडकीस आला होता. (Maharashtra FDA Officers Suspended)
२१ अधिकाऱ्यांची विभागीय चौकशी
तसेच केंद्र शासनाच्या हद्दीत जाऊन सोएक्स इंडिया प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीवरही अशाच प्रकारे नियमबाह्य कारवाई केली गेली. त्याप्रकरणी २१ अधिकाऱ्यांची विभागीय चौकशी करण्याचे आदेश एफडीए आयुक्त तुकाराम मुंडे यांनी दिले आहेत. यात पुण्याचे सह-आयुक्त दिगंबर भोगावडे, सहाय्यक आयुक्त ना. रा. सरकटे, यदुराज दहातोंडे, शि. बा. कोडगिरे, इमरान हाश्मी, गं. पां. कोकणे, रा. र. काकडे, अ. रा. देशमुख, प्र. व. आंबरे, अन्न सुरक्षा अधिकारी अ. ज. टोणपे, अशोक इलागेर, मंगेश लवटे, सायली पटवर्धन, अ. ग. गायकवाड, सं. शा. सावंत, लोहार, सावळे, सोनकांबळे या अधिकाऱ्यांचा समावेश आहे. (Maharashtra FDA Officers Suspended)
विज्ञान शाखेतील पदवीनंतर भारतीय जनसंचार संस्थान (IIMC) अमरावतीतून पत्रकारितेचे पदव्युत्तर शिक्षण. 'दै. मुंबई तरुण भारत'मध्ये वेब उपसंपादक या पदावर कार्यरत. शेती, साहित्य, राजकारण या विषयात विशेष रस. हस्तकला, संगीत आणि कविता लेखनाचा छंद....