संसदेत गदारोळ, बाहेर जनमहाभियोगाचा गाजावाजा! सभागृहातील कामकाज रोखणाऱ्या काँग्रेसचा ‘प्रति संसद’ उपक्रम

केंद्र सरकार आणि निवडणूक आयोगावर विरोधकांचा निशाणा

 
Congress Jan Mahabhiyog
 
मुंबई (Congress Jan Mahabhiyog): देशाच्या संविधानाद्वारे स्थापित संसदेच्या दोन्ही सभागृहात संसदेचे कामकाज सुरळीत चालू देण्याऐवजी वारंवार गदारोळ, घोषणाबाजी आणि सभात्यागाचे राजकारण करणाऱ्या काँग्रेससह विरोधी पक्षांनी प्रति संसद उभारत ‘जनमहाभियोग’सारख्या उपक्रमातून सरकारविरोधी भूमिका मांडण्यास सुरुवात केली आहे. संसदेतील चर्चेऐवजी सभागृहाबाहेर स्वतंत्र व्यासपीठ उभारून विरोधकांकडून सरकार आणि निवडणूक आयोगावर निशाणा साधला जात असल्याने काँग्रेससह देशातील विरोधी पक्षाच्या राजकीय भूमिकेची चर्चा सुरू झाली आहे.  
 
फेब्रुवारी २०२६ मध्ये लोकसभेत कामकाजात व्यत्यय आणल्याच्या आरोपावरून काँग्रेसच्या आठ खासदारांना निलंबित करण्यात आले होते. कागदपत्रे फाडणे आणि ती सभागृहात फेकणे यांसारख्या प्रकारांनंतर ही कारवाई करण्यात आली. त्यानंतर नीट पेपरफुटी प्रकरण, विद्यार्थ्यांवरील पोलिस कारवाई आणि शिक्षणमंत्र्यांच्या राजीनाम्याच्या मागणीवरून विरोधकांनी संसदेचे कामकाज रोखले. केंद्र सरकार, मंत्रिमंडळातील मंत्री, स्वतः गृहमंत्री हे सातत्याने आपण सभागृहात चर्चेस तयार असल्याचे सांगत असतानाही विरोधकांनी मात्र गदारोळ आणि आंदोलनाचा पवित्रा कायम ठेवला. (Congress Jan Mahabhiyog)
 
दरम्यान, ऑक्टोबर ३१ रोजी काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांच्या निवासस्थानी इंडिया आघाडीने मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्याविरोधात ‘जन महाभियोग’ हा प्रतीकात्मक कार्यक्रम आयोजित केला. माजी लोकसभा अध्यक्ष मीरा कुमार यांनी या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान भूषवले, तर सोनिया गांधी, राहुल गांधी आणि प्रियांका गांधी यांच्यासह विरोधी पक्षांचे नेते उपस्थित होते. निवडणूक आयोगाच्या निष्पक्षतेवर प्रश्न उपस्थित करत खर्गे यांनी केंद्र सरकारवर टीका केली. मात्र, हा संसदेच्या घटनात्मक महाभियोग प्रक्रियेचा भाग नसून विरोधकांचा प्रतीकात्मक राजकीय कार्यक्रम होता. (Congress Jan Mahabhiyog)
 
एकीकडे, संसदेत कामकाज रोखायचे आणि बाहेर स्वतंत्र संसदसदृश कार्यक्रम घ्यायचा, या विरोधकांच्या भूमिकेवरून काँग्रेसचा देशात अराजकता आणि नागरिकांची दिशाभूल करण्याचा मानस पुन्हा पुन्हा अधोरेखित होताना दिसतो आहे. (Congress Jan Mahabhiyog)
 
 




गायत्री श्रीगोंदेकर

मूळची अहिल्यानगर येथील. 'राज्यशास्त्र' विषयातील पदवी. रानडे इन्स्टिट्यूट मधून (सा.फु.पुणे विद्यापीठ) 'एमजेएमसी' विषयात पदव्युत्तर शिक्षण. २०१९मध्ये मुंबई तरुण भारतमध्ये 'मंत्रालय प्रतिनिधी' या पदावर रुजू. सद्यस्थितीत 'इन्फ्रास्ट्रक्चर आणि डेव्हलपमेंट' विशेष प्रतिनिधी म्हणून कार्यरत. राज्यातील पायाभूत सुविधांविषयी फिल्ड रिपोर्ट आणि लेखनात रस.
संबंधित मजकूर