नवी दिल्ली (1984 Anti-Sikh Riots BJP March) : राजधानी दिल्लीत रविवार, दि. १ नोव्हेंबर रोजी भाजप आणि काँग्रेसच्या नेतृत्वाखालील 'इंडी' आघाडीने स्वतंत्र आंदोलनांचे आयोजन केले आहे. रामलीला मैदानावर 'इंडी' आघाडीची ‘चलो दिल्ली’ सभा होत असताना भाजपने पश्चिम दिल्लीत १९८४ च्या शीखविरोधी दंगलीतील पीडितांना श्रद्धांजली वाहण्यासाठी मोर्चा काढला. या दोन्ही कार्यक्रमांमुळे दिल्लीतील राजकीय वातावरण तापले आहे.
हरिनगर ते तिलक नगरपर्यंत भाजपचा मोर्चा
भाजपने पश्चिम दिल्लीतील हरिनगर बस डेपो ते तिलक नगर मेट्रो स्टेशनदरम्यान मोर्चाचे आयोजन केले. केंद्रीय मंत्री हरदीप सिंह पुरी, दिल्लीच्या मुख्यमंत्री रेखा गुप्ता, मंत्री मनजिंदर सिंह सिरसा आणि खासदार बांसुरी स्वराज यांच्यासह भाजपचे अनेक नेते या मोर्चात सहभागी होणार असल्याची माहिती देण्यात आली होती. याशिवाय १९८४ च्या दंगलीतील पीडित कुटुंबीय आणि शीख समाजातील नागरिकांचाही सहभाग अपेक्षित होता. (1984 Anti-Sikh Riots BJP March)
१९८४ च्या दंगलीचा मुद्दा उपस्थित करत काँग्रेसवर निशाणा
३१ ऑक्टोबर १९८४ रोजी तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांची हत्या झाल्यानंतर देशातील विविध भागांत, विशेषतः दिल्लीत शीखविरोधी हिंसाचार उसळला होता. या हिंसाचारात हजारो नागरिकांचा मृत्यू झाला होता. भाजपने याच घटनेचा संदर्भ देत १ नोव्हेंबर रोजी 'इंडी' आघाडीने राजकीय सभा आयोजित करण्याच्या निर्णयावर आक्षेप घेतला आहे. (1984 Anti-Sikh Riots BJP March)
भाजप नेत्यांनी काँग्रेसवर टीका करत १९८४ मधील हिंसाचारातील पीडितांना न्याय मिळण्याचा मुद्दा उपस्थित केला. केंद्रीय मंत्री जे. पी. नड्डा यांनीही काँग्रेसच्या सभेच्या वेळेबाबत नाराजी व्यक्त केली. (1984 Anti-Sikh Riots BJP March)
रामलीला मैदानावर 'इंडी' आघाडीची ‘चलो दिल्ली’ सभा
दुसरीकडे, काँग्रेसच्या नेतृत्वाखालील 'इंडी' आघाडीने मतदार याद्यांच्या विशेष सखोल पुनरीक्षण (SIR) प्रक्रियेतील कथित अनियमिततेविरोधात रामलीला मैदानावर सभेचे आयोजन केले आहे. मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याची मागणी हा या आंदोलनाचा प्रमुख मुद्दा आहे.
काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे, राहुल गांधी, समाजवादी पक्षाचे प्रमुख अखिलेश यादव यांच्यासह विरोधी पक्षांतील विविध नेते या सभेत सहभागी होणार असल्याचे सांगण्यात आले होते. या पार्श्वभूमीवर दिल्लीमध्ये मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. (1984 Anti-Sikh Riots BJP March)
एकाच दिवशी दोन वेगवेगळ्या राजकीय मुद्द्यांवर भाजप आणि 'इंडी' आघाडी रस्त्यावर उतरल्याने राजधानी दिल्लीतील राजकीय संघर्षाला नवे वळण मिळाले आहे.
Hello, You must be familiar with the Nation First approach daily 'Mumbai Tarun Bharat' as a newspaper committed to fearless and nationalist ideals and constantly doing conscious journalism for it. The journey of four decades has been successful only because of your trust and cooperation. Dear readers, we have been making a successful effort to always be perfect in our commitment to the thoughts of the nation and the national interest...
Changing with time is essential for any organization. Daily 'Mumbai Tarun Bharat' has decided to take this role here too and make 'MahaMTB' available in the media for the new 'smart' generation. Today's youth, readers, and citizens are becoming more and more 'smart' day by day. And in today's 'smart' era, information is available in abundance in the Internet-enabled information explosion. However, there is a need for complementary knowledge to determine a modern role and approach that is compatible with culture, motionlessness and tradition.
That is why mahamtb.com, MahaMTB Mobile App', MahaMTB Youtube Channel, MahaMTB Facebook Page, MahaMTB Twitter, MahaMTB Instagram, MahaMTB Telegram, MahaMTB WhatsApp Group etc. through social media and advanced avatar content. We are coming before you. Role in the new era, 'smart' journalism with a view, 'smart' multimedia for the new era, and journalism for a 'smart' Maharashtra will be the side of the game.