ठाणे, (Bhiwandi to Saptashrungi ST Bus) : नवरात्रोत्सवानिमित्त सप्तशृंगी देवीच्या दर्शनासाठी जाणाऱ्या भाविकांसाठी महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या भिवंडी आगाराने विशेष एसटी बससेवा सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. १४ ते २० ऑक्टोबरदरम्यान दररोज भिवंडी ते सप्तशृंगी गड अशी ही विशेष तीर्थयात्रा सेवा चालविण्यात येणार आहे.(Bhiwandi to Saptashrungi ST Bus)
नवरात्रोत्सवात सप्तशृंगी गडावर भाविकांची मोठी गर्दी होत असल्याने त्यांची प्रवासाची गैरसोय टाळण्यासाठी तसेच सुरक्षित आणि सोयीस्कर प्रवास उपलब्ध करून देण्यासाठी भिवंडी आगाराने हा उपक्रम हाती घेतला आहे. या विशेष बससेवेचे परतीचे भाडे ८१० रुपये ठेवण्यात आले आहे.(Bhiwandi to Saptashrungi ST Bus)
महिला, ज्येष्ठांना सवलत
शासनाच्या सवलत योजनांनुसार या प्रवासात महिलांना ५० टक्के सवलत मिळणार आहे. तसेच ६५ वर्षांवरील ज्येष्ठ नागरिकांना ५० टक्के, तर ७५ वर्षांवरील ज्येष्ठ नागरिकांना मोफत प्रवास करता येणार आहे. भाविकांसाठी प्रशस्त लालपरी बस आणि अनुभवी चालकांची व्यवस्था करण्यात येणार आहे.(Bhiwandi to Saptashrungi ST Bus)
भिवंडी आगार व्यवस्थापक किशोर महाजन यांनी भाविकांना या सेवेचा लाभ घेण्याचे आवाहन केले. ‘भिवंडी आगार - आपला विश्वास, आमची जबाबदारी’ या ब्रीदवाक्यानुसार भाविकांना सुरक्षित व सुखद प्रवास देण्याचा प्रयत्न असल्याचे त्यांनी सांगितले.(Bhiwandi to Saptashrungi ST Bus)