अमेरिकन उद्योगपतीची तरफदारी करणे ही राहुल गांधी यांची बेईमानी! मंत्री ॲड. आशिष शेलार; अभिजीत दीपकेंचे नागरिकशास्त्र कच्चे

    09-Oct-2026   
 
Rahul Gandhi Elon Musk Controversy
 
मुंबई (Rahul Gandhi Elon Musk Controversy) : अमेरिकेतील एका उद्योगपतीची तरफदारी करणे ही राहुल गांधी यांची बेईमानी आहे, अशी टीका सांस्कृतिक कार्यमंत्री ॲड. आशिष शेलार यांनी केली आहे. राहुल गांधी यांनी केलेल्या उद्योगपती एलॉन मस्क यांच्या समर्थनावर त्यांनी प्रतिक्रिया दिली.
 
एलॉन मस्क यांनी केलेल्या टीकेचे समर्थन करत काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी भारत सरकारवर टीका केली होती. याबाबत माध्यमांशी बोलताना मंत्री ॲड. आशिष शेलार म्हणाले की, “हा विषय केंद्र सरकारशी संबंधित आहे. मात्र, आपण प्रश्न विचारला म्हणून सांगतो की, राहुल गांधी ज्या उद्योगपतीची तरफदारी करीत आहेत, ती बेईमानी आहे. एकीकडे भारतातील इन्फोसिस, विप्रो, टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस यांसारख्या तंत्रज्ञान क्षेत्रात काम करणाऱ्या कंपन्यांवर अमेरिका निर्बंध लादत आहे. हे पाहता अमेरिकेत काम करणाऱ्या आपल्या भारतीय तरुणांच्या करिअर आणि नोकरीच्या दृष्टीने हे पोषक नाही. अशावेळी राहुल गांधी यांनी अमेरिकन कंपनीची वकिली करणे ही बेईमानी आहे.” (Rahul Gandhi Elon Musk Controversy)
 
“आपल्या व्यवस्थांबाबत एलॉन मस्क किंवा स्टारलिंक यांनी जे प्रश्न उपस्थित केले आहेत, त्याबाबत अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले आहे की, सुरक्षा पडताळणीच्या नियमावलीसंदर्भातील काम सुरू आहे. याबाबत केंद्र सरकार किंवा संबंधित अधिकारी निर्णय घेतील. मात्र, त्यांच्या निर्णयाची वाट न पाहता राहुल गांधी यांनी अमेरिकेतील एका प्रतिक्रियेच्या बाजूने बोलणे म्हणजे भारतीय प्रशासकीय व्यवस्थेशी बेईमानी करण्यासारखे आहे,” असेही ते म्हणाले. (Rahul Gandhi Elon Musk Controversy)
 
महाराष्ट्रात तंत्रज्ञानाच्या दृष्टीने अयोग्य गोष्टी सरकार करणार नाही
 
“स्टारलिंकच्या मागण्यांबाबत महाराष्ट्रापुरते बोलायचे झाल्यास, तंत्रज्ञानाच्या दृष्टीने जे अयोग्य असेल, ते सरकार करणार नाही. योग्य वेळी योग्य निर्णय घेतला जाईल. जिओ किंवा अंबानी यांचा उल्लेख केला जात असल्याने सांगतो की, भारताच्या भविष्यासाठी जे योग्य आहे, त्याचाच विचार करून, कोणतीही कंपनी असली तरी सरकार योग्य निर्णय घेईल,” असेही त्यांनी स्पष्ट केले. (Rahul Gandhi Elon Musk Controversy)
 
विरोधकांचे आंदोलन म्हणजे अराजकतेचे व्याकरण
 
दरम्यान, दिल्लीत विरोधकांकडून सुरू असलेल्या आंदोलनावर बोलताना मंत्री आशिष शेलार म्हणाले की, “हे आंदोलन देशातील व्यवस्थांवर प्रश्न उपस्थित करणारे असून, ते अराजकतेचे व्याकरण आहे. लोकसभेत याबाबत बोलण्याची संधी आहे. राज्यघटनेने दिलेले लोकसभेचे व्यासपीठ सर्व प्रश्न मांडण्यासाठी उपलब्ध असताना तिथे बोलायला तयार नाहीत आणि सभागृहाबाहेर येऊन अराजकता माजवत आहेत.”
 
अभिजित दीपकेंचे नागरिकशास्त्र कच्चे
 
"अभिजित दीपके यांनी देशात आता आणीबाणी लागू असल्याचे म्हटले असेल, तर त्यांचे नागरिकशास्त्र कच्चे आहे. ज्या काँग्रेससोबत ते आहेत, त्यांनाच आणीबाणी काय असते, हे विचारावे. आणीबाणी म्हणजे काय, हे अभिजित दीपके यांना माहीत नाही. त्यामुळे त्यांनी या विषयावर बोलू नये. काँग्रेसच्या काळात काय घडले होते, कोणाला बोलण्याची आणि लिहिण्याची मुभा होती, हे त्यांनी एकदा काँग्रेसलाच विचारावे. सीजेपीचे आंदोलन हा काँग्रेसवर कुरघोडी करण्याचा प्रकार आहे," अशी टीकाही मंत्री आशिष शेलार यांनी केली. (Rahul Gandhi Elon Musk Controversy)
 
 




अवंती भोयर

विज्ञान शाखेतील पदवीनंतर भारतीय जनसंचार संस्थान (IIMC) अमरावतीतून पत्रकारितेचे पदव्युत्तर शिक्षण. 'दै. मुंबई तरुण भारत'मध्ये वेब उपसंपादक या पदावर कार्यरत. शेती, साहित्य, राजकारण या विषयात विशेष रस. हस्तकला, संगीत आणि कविता लेखनाचा छंद....
संबंधित मजकूर