ठाणे,(Dadar to Navi Mumbai Airport Bus);- नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ मुंबईशी जोडण्यासाठी महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाने आणखी एक पाऊल पुढे टाकले आहे. दादर ते नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ अशी थेट एसटी बससेवा सुरू करण्यात आली असून, अटलसेतू मार्गे धावणाऱ्या या सेवेमुळे दादरहून विमानतळापर्यंत थेट सार्वजनिक वाहतूक उपलब्ध झाली आहे. परिवहन मंत्री तथा एसटी महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांच्या हस्ते बुधवारी या सेवेचा शुभारंभ करण्यात आला.(Dadar to Navi Mumbai Airport Bus)
दादर हे मुंबईतील प्रमुख रेल्वे आणि सार्वजनिक वाहतूक केंद्र असल्याने येथून थेट विमानतळ बससेवा सुरू झाल्याने विमानप्रवाशांसह सर्वसामान्य नागरिकांना त्याचा फायदा होणार आहे. अटलसेतूमुळे मुंबईहून नवी मुंबईकडे जाणारा प्रवास अधिक थेट झाल्याने विमानतळ कनेक्टिव्हिटी मजबूत करण्याच्या दृष्टीने ही सेवा महत्त्वाची ठरणार आहे.(Dadar to Navi Mumbai Airport Bus)
यावेळी सरनाईक म्हणाले की, नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला एसटीच्या व्यापक सार्वजनिक वाहतूक जाळ्याशी जोडणे आवश्यक आहे. दादरहून थेट विमानतळापर्यंत सेवा सुरू झाल्याने मुंबईतील प्रवाशांना विमानतळ गाठणे अधिक सोयीचे होईल.(Dadar to Navi Mumbai Airport Bus)
बोरिवली, पुण्यालाही जोडले विमानतळ
दादरसोबतच एसटीने बोरिवली–नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ आणि स्वारगेट–नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ या सेवाही सुरू केल्या आहेत. त्यामुळे मुंबई, नवी मुंबई आणि पुणे या प्रमुख शहरांमधून विमानतळापर्यंत थेट एसटी कनेक्टिव्हिटी उपलब्ध होण्यास सुरुवात झाली आहे.(Dadar to Navi Mumbai Airport Bus)
विमानतळावरील प्रवाशांची वाढती संख्या आणि गरज लक्षात घेऊन भविष्यात आणखी मार्गांवर एसटी सेवा सुरू करण्याचे संकेत महामंडळाने दिले आहेत. त्यामुळे नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेत एसटीची भूमिका महत्त्वाची ठरणार आहे.(Dadar to Navi Mumbai Airport Bus)