नवी दिल्ली (CJP Jantar Mantar Protest) : दि. १० ऑक्टोबर रोजी कॉकरोच जनता पार्टी (सीजेपी) यांचे आंदोलन मोडीत काढण्यासाठी दिल्ली पोलिसांनी कंबर कसली आहे. रैल्वे रद्द, मेट्रो स्थानके बंद, सीमा बंदी, कलम १६३ लागू, मशिदींतून घोषणा मद्य विक्री दुकाने बंद, सुमारे २६ हजार जवान केंद्रीय बल पथके तैनात. यामुळे दिल्लीला छावनीचे स्वरूप आले आहे. दरम्यान, सरकारने घेतलेल्या खबरदारीमुळे सर्वोच्च न्यायालयाने सरकारला फटकारले आहे. सॉलिसीटर जनरल तुषार मेहता यांनी विश्वास दर्शवला आहे की, परीस्थितीचा आढावा घेऊन सेवा सुरळीत ठेवल्या जातील. या दरम्यान, सरन्यायाधीशांनी महत्वाची टीप्पणी केली. ते म्हणाले, " माश्या मारण्यासाठी हातोडा वापरू नका"
आता समजून घ्या सरकाने केलेली तयारी
१) रेल्वे रद्द : भारतीय रेल्वेने दिलेल्या माहितीनुसार, इंटेलिजन्स इनपुट आणि वाहतूक मार्गदर्शक प्रणालीनुसार, दि. १० ऑक्टोबर रोजी सकाळी ४. ०० ते दुपारी २.०० वाजेपर्यंत वाहतूक कोंडी होण्याची शक्यता आहे. दि. ९ ऑक्टोबर दुपारी २.०० वाजल्यानंतर, दि. १० ऑक्टोबर सकाळी ४.०० वाजल्यापासून दुपारी २.०० वाजेपर्यंत नवी दिल्ली, हजरत निज्जामुद्दीन येथे सर्व मेल आणि एक्सप्रेस गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत. रेल्वेने दिलेल्या माहितीनुसार दि. २ ऑक्टोबर रोजी झालेल्या आंदोलनामुळे प्रचंड वाहतूक कोंडी झाली. यामुळे ५ हजार प्रवाश्यांची ट्रेन सुटली. नवी दिल्ली सुमारे ४ लाख प्रवाशांची ये-जा असते. (CJP Jantar Mantar Protest)
२) ५७ मेट्रो स्टेशन बंद : दिल्ली पोलिसांनी दिल्ली मेट्रो रेल कॉर्पोरेशनला अधिक्रृत आदेश देत दि. ९ऑक्टोबरला रात्री ९.०० वाजल्यापासून अकून ५७ मेट्रो स्थानकांचे दरवाजे बंद राहणार आहेत. इंटरचेंज सुविधा सुरू राहणार आहेत. मात्र, पुढील आदेश येईपर्यंत मट्रो स्थानके बंद राहतील. पोलिसांच्या मते गर्दी नियंत्रणाबाहेर जाऊ शकते, इथल्या संवेदणशील ठिकाणांकडे हा जमाव कूच करू शकतो. (CJP Jantar Mantar Protest)
३) सीएपीएफच्या २२१ तुकड्या पाचारण : गृहमंत्रलयाने दि. ८ ते दि. १२ ऑक्टोबरपर्यंत सीएपीएफच्या २२१ तुकड्या म्हणजेच २३ हजार जवानांना पाचारण केले आहे. यामुळे सीएपीएफच्या १०१ तुकड्यांना अधिक बळ मिळाले आहे. आता केंद्रीय सुरक्षादलाच्या जवानांची संख्या आता २६ हजार इतकी झाली आहे. सीआरपीएफच्या जम्मु काश्मीर, छत्तीसगढ आणि प. बंगाल येथून अधिकच्या तुकड्यांची कुमक मागवली जात आहे. एकून १२ हजार निमलष्करी दलाचे पुर्वीपासूनच दिल्लीत तैनात आहेत. आता ११ हजार सीआरपीएफ जवान एआरलिफ्टकरून दिल्लीत उतरवले जात आहेत. ४५०-५०० महिला निमलष्करी दल उपस्थित आहेत . पोलिसांनी १५० बॉडी कॅमेरेसुद्धा लावले आहेत ज्यामुळे आंदोलकांशी होणारा संवाद रेकॉर्ड केला जाऊ शकतो.
४) कलम १६३ लागू : दिल्लीत भारतीय भारतीय न्याय संहिता १६३ लागू करण्यात आली आहे. दिल्ली पोलीसांचे सहआयुक्त नुपूर प्रसाद यांनी दिलेल्या माहितीनुसार, "७ ऑक्टोबर रोजी सीजेपी सहसंयोजक सौरभ दास यांना याबद्दल नोटीस पाठविण्यात आली आहे. ज्यात जंतर मंतर येथे १० ऑक्टोबर रोजी होणाऱ्या मुख्य निवडणूक आयुक्तांविरोधात होणाऱ्या आंदोलनासंदर्भात १० दिवसांपूर्वी अर्ज देण्याची सूचना दिली होती. यापूर्वीही सीजेपी कार्यकर्त्यांची आंदोलनस्थळी असलेली वागणूक लक्षात घेता पूर्वी कबूल केलेल्या नियम व अटींचे पालन न झाल्याचेही नमूद केले आहे. या कलमाअंतर्गत पाच जणांपेक्षा जास्त जमाव एकत्र आल्यास कारवाई होऊ शकते. ज्यात मोर्चा, आंदोलन, घोषणाबाजी, भाषणाला बंदी आहे. तर शस्त्र, लाठ्या, तलवार, दगड विटा आदींसारखी शस्त्रास्त्रे बाळगण्यास मनाई आहे. हे नियम तोडणाऱ्यांवर कठोर कारवाई केली जाईल." (CJP Jantar Mantar Protest)
५) दिल्लीच्या सीमा बंद : नवी दिल्लीच्या चिल्ला, सिंधू, गाजीपूर, आपसरा यासह अन्य ठिकाणच्या सीमा बंद करण्यात आल्या आहेत. बीएसएफला दिल्ली आणि नोएडा पोलीसांशी समन्वय साधत चिल्ला सीमेवर तैनात करण्यात आले आहे. शुक्रवारी रात्री ९ वाजता या सीमा बंद केल्या जातील. दिल्ली पोलीसांच्या सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, यात एकूण ५० हजार आंदोलक उपस्थित राहणार असल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
६) मशिदींतून घोषणा : दिल्ली पोलीसांनी जुन्या दिल्लीत जाऊन मशिदीत जाऊन घोषणा केल्या आहेत. कुणीही कुठल्याही प्रकारच्या मोर्चात सहभागी होऊ नये, आपल्या मुलांनाही पाठवू नका. अथवा त्यांच्यावर कलम १६३ अंतर्गत कारवाई करण्यात येईल, असा इशारा दिला आहे. चाँदनी चौक येथील शाही मशिदीतून ही घोषणा पोलीसांनी केली आहे. पोलीसांनी शांतता राखण्याचे आणि अफवांवर विश्वास न ठेवण्याचे आवाहन केले आहे. चिथावणीखोर संदेश सोशल मीडियाद्वारे पसरवू नये, असा इशाराही दिला आहे. पोलीसांनी प्रशासनाला सहकार्य करण्याचे आवाहन केले आहे. (CJP Jantar Mantar Protest)
७) मद्यविक्री आणि हॉटेल्स बंद : दिल्ली पोलीसांनी ९ आणि १० ऑक्टोबर रोजी मद्यविक्रीस बंदी केली आहे. दिल्ली अबकारी विभागाने या संदर्भात परिपत्रक काढले आहे. सद्यस्थितीला लक्षात घेता पहाडगंड आणि मध्य दिल्लीत हॉटेल्स आणि गेस्ट हाऊसना नव्या बुकींग्ज घेण्यास मनाई करण्यात आली आहे.
८) डिटेन्शन सेंटर तयार : सीजेपी प्रवक्ता आशुतोष रांका यांनी केलेल्या दाव्यानुसार, त्यांच्या १० हजार कार्यकर्त्यांना ताब्यात घेतल्याचा आरोप पोलीसांवर आहे. सौरव दास म्हणाले की, "जिथे जिथे पोलीस आम्हाला थांबवतील, तिथेच आंदोलन केले जाईल आणि तिथेच ठिय्या मांडला जाईल." राजीव गांधी स्टेडीअम आणि छत्रसाला सेडियमवर तात्पुरत्या स्वरुपाचे डिटेन्शन सेंटर तयार केले जाणार आहेत. (CJP Jantar Mantar Protest)
९) सार्वजिक वाहतूकीवर नियंत्रण : दिल्ली पोलीसांनी सार्वजनिक बस तिकीटांच्या बुकींवर लक्ष ठेवले आहे. तसेच यापूर्वी झालेल्या आंदोलनात वापरण्यात आलेल्या ट्रान्सपोर्ट बस व्यवस्थांवर करडी नजर आहे. ओला उबर सारख्या कंपन्यांशी समन्वय साधून नियंत्रण ठेवले जाणार आहे. दिल्ली सरकारने खबरदारी म्हणून दिल्ली ट्रान्सपोर्ट सेवा पुढील सहा महिन्यांसाठी अत्यावश्यक सेवा म्हणून घोषित करित एस्मा लागू केला आहे. कुठल्याही प्रकारे वाहनचालक संप पुकारू शकत नाही. (CJP Jantar Mantar Protest)
१०) रस्त्यांवर नाकेबंदी : दिल्ली पोलीसांनी पुर्ण दिल्लीत ३७ ठिकाणे ब्लॉकींग पॉईंटर्स म्हणून घोषित केली असून तिथे पोलीस तैनात आहेत. आंदोलकांना जंतरमंतर येथे जाण्यापासून रोखणे, हा प्रमुख उद्देश आहे. मुख्य रस्तेही बंद करण्यात आले असून बॅरिकेट्स लावण्यात आले आहे. अशोक रोड, संसद मार्ग, जनपथ मार्ग, रायसिना रोड, रफी मार्ग, पंत मार्ग हे रस्ते बंद ठेवण्यात आले आहेत.
दरम्यान एक आंदोलन रोखण्यासाठी इतकी व्यवस्था का?
एका युवा आंदोलनाला रोखण्यासाठी इतकी व्यवस्था का?, असा प्रश्न उपस्थित केला जाऊ लागला आहे. मात्र, पोलीसांनी आम्हाला सुमारे ५० हजार आंदोलक दिल्लीत धडकणार असल्याची गुप्त माहिती मिळाल्याचे सुत्राने सांगितले आहे. त्यामुळे इतका चोख बंदोबस्त करण्यात आल्याचे ते म्हणाले. सर्वोच्च न्यायालयानेही हे प्रकरण गंभीर असल्याचे म्हटले आहे. मेट्रो स्थानके बंद झाल्यास आम्हाला गंभीर चिंता आहे, असे कोर्टाने सरकारला म्हटले आहे. सर्वसामान्य नागरिकांच्या दैनंदिन प्रवासाबद्दल आणि ज्यांचे हातावर पोट आहे, अशांची आम्हाला चिंता आहे, असेही न्यायालायाने म्हटले आहे. दरम्यान या प्रकरणात १० ऑक्टोबर रोजी काय घडते याबद्दल उत्सुकता आहे. (CJP Jantar Mantar Protest)
Hello, You must be familiar with the Nation First approach daily 'Mumbai Tarun Bharat' as a newspaper committed to fearless and nationalist ideals and constantly doing conscious journalism for it. The journey of four decades has been successful only because of your trust and cooperation. Dear readers, we have been making a successful effort to always be perfect in our commitment to the thoughts of the nation and the national interest...
Changing with time is essential for any organization. Daily 'Mumbai Tarun Bharat' has decided to take this role here too and make 'MahaMTB' available in the media for the new 'smart' generation. Today's youth, readers, and citizens are becoming more and more 'smart' day by day. And in today's 'smart' era, information is available in abundance in the Internet-enabled information explosion. However, there is a need for complementary knowledge to determine a modern role and approach that is compatible with culture, motionlessness and tradition.
That is why mahamtb.com, MahaMTB Mobile App', MahaMTB Youtube Channel, MahaMTB Facebook Page, MahaMTB Twitter, MahaMTB Instagram, MahaMTB Telegram, MahaMTB WhatsApp Group etc. through social media and advanced avatar content. We are coming before you. Role in the new era, 'smart' journalism with a view, 'smart' multimedia for the new era, and journalism for a 'smart' Maharashtra will be the side of the game.