मुंबई (CJP Bengaluru protest) : बंगळुरूतील फ्रीडम पार्क येथे कॉकरोच जनता पार्टीच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या ‘चप्पल आंदोलनासाठी’ महिलांना आणण्यावरून गंभीर आरोप करण्यात आले आहेत. मदिकेरी येथील सुमारे ६० महिलांना घरे उपलब्ध करून देण्याचे आश्वासन देऊन बंगळुरूला आणण्यात आले आणि त्याबदल्यात त्यांना सीजेपीच्या आंदोलनात सहभागी होण्यास सांगण्यात आले, असा दावा एका महिलेने केल्याचे वृत्त आहे. या आरोपांमुळे राजकीय आंदोलनांसाठी लोकांना एकत्र आणताना कोणत्या पद्धतींचा वापर केला जातो, याबाबत गंभीर प्रश्न उपस्थित झाले आहेत. (CJP Bengaluru protest)
मदिकेरी येथील महिलांच्या सहभागामुळे त्यांच्या संमतीचा मुद्दाही ऐरणीवर आला आहे. शांततापूर्ण आंदोलनात सहभागी होण्याचा आणि आपले मत व्यक्त करण्याचा प्रत्येकाला अधिकार आहे. मात्र, घर मिळवून देण्याचे आश्वासन देऊन त्याबदल्यात आंदोलनात सहभागी होण्याची अट घालण्यात आली असेल, तर या संपूर्ण प्रकरणाची सखोल चौकशी व्हावी अशी मागणी करण्यात आली आहे. अशी माहिती आहे की, घर मिळण्याच्या आशेने या महिला बंगळुरूला आल्या होत्या आणि त्यांना त्या बदल्यात आंदोलनात सहभागी होणे अपेक्षित होते. या महिलांना बंगळुरूला नेण्यामागचा नेमका उद्देश आणि घर उपलब्ध करून देण्याच्या आश्वासनाशी संबंधित अटी यांची स्पष्ट व सत्य माहिती देण्यात आली होती का, असा गंभीर प्रश्न यामुळे उपस्थित होत आहे. (CJP Bengaluru protest)
दि. ८ ऑक्टोबर रोजी फ्रीडम पार्क येथे आयोजित करण्यात आलेले हे आंदोलन मतदार याद्यांच्या विशेष सखोल पुनरीक्षणाला (एसआयआर) विरोध करण्यासाठी सीजेपीने सुरू केलेल्या मोहिमेचा एक भाग होते. या कार्यक्रमाची सुरुवात ‘जनता न्यायाधिकरणा’ने झाली. मतदारांची नावे वगळण्यात आल्याबाबत नागरी समाजातील संघटना आणि व्यक्तींनी या व्यासपीठावर आपल्या चिंता मांडणे अपेक्षित होते. त्यानंतर महिलांच्या सहभागाने ‘चप्पल आंदोलन’ करण्यात येणार होते. (CJP Bengaluru protest)
एसआयआर प्रक्रियेदरम्यान मोठ्या प्रमाणावर मतदारांची नावे वगळण्यात आल्याचा आरोप सीजेपीने केला आहे. ही प्रक्रिया तातडीने थांबवावी, मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांनी राजीनामा द्यावा आणि त्यांच्यावर फौजदारी कारवाई करण्यात यावी, तसेच निवडणूक आयुक्तांची नियुक्ती स्वतंत्र व निष्पक्ष प्रक्रियेद्वारे करण्यात यावी, अशा मागण्या सीजेपीने केल्या आहेत. (CJP Bengaluru protest)
'मास मीडिया' या विषयातून पदवीपर्यंतचे शिक्षण पूर्ण.'कम्युनिकेशन ॲण्ड जर्नालिझम' विषयातून पदव्युत्तरपर्यंतचे शिक्षण पूर्ण. सध्या दै.'मुंबई तरुण भारत'मध्ये वेब उपसंपादक म्हणून कार्यरत. लिखाण, संगीत, वाचन, फोटोग्राफी, इ.ची आवड.लिवोग्राफी भाषाशैलीत विशेष प्रावीण्य.बालपणापासून रा.स्व.संघाचा स्वयंसेवक