मुंबई (Nana Patekar Death): ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांच्या निधनाचे वृत्त अत्यंत दुःखद आणि मन हेलावून टाकणारे आहे. त्यांच्या निधनाने भारतीय चित्रपटसृष्टीतील एक संवेदनशील, प्रभावी आणि अष्टपैलू कलाकार आपण गमावला आहे, अशा शब्दात कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी भावपूर्ण श्रध्दांजली व्यक्त केली. (Nana Patekar Death)
नाना पाटेकर यांनी आपल्या दमदार अभिनयाने अनेक दशकांपर्यंत रसिकांच्या मनावर अधिराज्य गाजवले. त्यांच्या अभिनयातील वास्तवता, संवेदनशीलता आणि सामाजिक भान ही त्यांची विशेष ओळख होती. अभिनयासोबतच सामाजिक बांधिलकी जपत त्यांनी समाजातील विविध प्रश्नांकडे लक्ष वेधले. त्यांच्या कार्यातून अनेक पिढ्यांना प्रेरणा मिळाली. (Nana Patekar Death)
मराठी तसेच हिंदी चित्रपटसृष्टीतील त्यांचे योगदान सदैव स्मरणात राहील. त्यांच्या जाण्याने कलाक्षेत्राची मोठी पोकळी निर्माण झाली आहे. नाना पाटेकर यांचे कुटुंबीय, मित्रपरिवार आणि असंख्य चाहत्यांच्या दुःखात मी मनापासून सहभागी आहे. ईश्वर त्यांच्या आत्म्यास चिरशांती देवो आणि त्यांच्या कुटुंबीयांना हे दुःख सहन करण्याचे बळ देवो. ज्येष्ठ अभिनेता नाना पाटेकर यांना भावपूर्ण श्रद्धांजली! (Nana Patekar Death)