नटसम्राट हरपला! ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांचं निधन, वयाच्या ७५व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास!







 
Nana Patekar
 
 
मुंबई (Nana Patekar ) : ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांचे गुरुवार,दि. ८ ऑक्टोबर रोजी वयाच्या ७५ व्या वर्षी निधन झाले. छातीत तीव्र वेदना होऊ लागल्यानंतर ते गोव्यातील त्यांच्या अपार्टमेंटमध्ये बेशुद्ध अवस्थेत आढळले. त्यांचे पुत्र मल्हार पाटेकर यांनी दिलेल्या माहितीनुसार, नाना यांनी छातीत तीव्र वेदना होत असल्याची तक्रार केल्यानंतर त्यांच्या अपार्टमेंटमध्ये एक वैद्यकीय पथक पाठवण्यात आले. तेथे पोहोचल्यावर नाना बेशुद्ध अवस्थेत आढळले आणि त्यांना शुद्धीवर आणण्याचे प्रयत्न करण्यात आले. त्यानंतर त्यांना मणिपाल रुग्णालयात नेण्यात आले.
 

मणिपाल रुग्णालयातील डॉक्टरांनी सकाळी ५ वाजून २० मिनिटांनी नाना पाटेकर यांना मृत घोषित केले. त्यांना पुनरुज्जीवित करण्यासाठी सुमारे ४५ मिनिटे सतत सीपीआर देण्यात आला, परंतु कोणताही प्रतिसाद मिळाला नाही. या प्रकरणाची वैद्यकीय-कायदेशीर केस म्हणून नोंद करण्यात आली आहे. त्यांच्या मृत्यूची नेमकी परिस्थिती निश्चित करण्यासाठी आज शवविच्छेदन केले जाईल, अशी माहिती मणिपाल रुग्णालयातील ऑन्कोलॉजी विभागाचे प्रमुख डॉ. शेखर साळकर यांनी दिली. (Nana Patekar )
 

नाना पाटेकर यांचे खरे नाव विश्वनाथ पाटेकर होते. ते हिंदी आणि मराठी चित्रपटसृष्टीतील एक आदरणीय अभिनेते होते. त्यांनी आपल्या चित्रपट कारकिर्दीची सुरुवात १९७८ मध्ये 'गमन' या चित्रपटाने केली. त्यानंतर त्यांनी 'परिंदा', 'क्रांतिवीर', 'अग्नि साक्षी', 'खामोशी: द म्युझिकल', 'अब तक छप्पन' आणि 'नटसम्राट' यांसारख्या चित्रपटांमध्ये अविस्मरणीय भूमिका साकारल्या. त्यांना तीन राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार मिळाले आणि २०१३ मध्ये पद्मश्री पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. (Nana Patekar )
 
अभिनेता, दिग्दर्शक आणि रंगकर्मी
 

नाना पाटेकर केवळ अभिनेतेच नव्हते, तर ते लेखक, दिग्दर्शक आणि रंगभूमीवरील संवेदनशील कलाकार म्हणूनही ओळखले जातात. १९९१ साली प्रदर्शित झालेल्या ‘प्रहार: द फायनल अटॅक’ या चित्रपटाचे त्यांनी दिग्दर्शन केले होते. या चित्रपटात सैनिकाची भूमिका साकारण्यासाठी त्यांनी भारतीय सैन्याकडून कठोर लष्करी प्रशिक्षणही घेतले होते. खऱ्या आयुष्यातही नाना पाटेकर यांना भारतीय लष्कर आणि सैनिकांविषयी विशेष आदर आहे. (Nana Patekar )
 

नटसम्राट नाना!
 

नाना पाटेकर यांनी हिंदीसोबतच मराठी चित्रपटसृष्टीतही आपल्या दमदार अभिनयाची वेगळी छाप सोडली. ‘पक पक पकाका’, ‘देऊळ’, ‘नटसम्राट’ आणि ‘प्रकाश आमटे’ यांसारख्या चित्रपटांमधील त्यांच्या प्रभावी भूमिकांनी प्रेक्षकांच्या मनावर ठसा उमटवला. त्यांच्या अभिनयातील सहजता, भूमिकेत पूर्णपणे समरस होण्याची शैली यामुळे नाना पाटेकर यांनी मराठी चित्रपटसृष्टीत स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली. विशेषतः ‘नटसम्राट’ या चित्रपटातील गणपत रामचंद्र बेलवलकर यांच्या भूमिकेने त्यांच्या अभिनयाची ताकद पुन्हा एकदा अधोरेखित केली. (Nana Patekar )

सामाजिक कार्यातही योगदान
 

अभिनयासोबतच नाना पाटेकर सामाजिक कार्यासाठीही ओळखले जात होते. ‘नाम फाउंडेशन’च्या माध्यमातून त्यांनी शेतकरी मदत, जलसंधारण आणि ग्रामीण भागातील विविध सामाजिक उपक्रमांमध्ये योगदान दिले. त्यांच्या निधनाने मराठी आणि हिंदी चित्रपटसृष्टीतील एका प्रभावी पर्वाचा अंत झाला आहे.
 

नाना पाटेकर यांच्या निधनाची बातमी समोर आल्यानंतर चित्रपटसृष्टीसह महाराष्ट्रातूनही शोक व्यक्त केला जात आहे. त्यांच्या दमदार अभिनयाची, प्रभावी संवादफेकीची आणि विविध व्यक्तिरेखांना दिलेल्या अविस्मरणीय जीवंतपणाची आठवण कायम राहणार आहे. (Nana Patekar )




मुंबई तरुण भारत वेब टीम

Hello, You must be familiar with the Nation First approach daily 'Mumbai Tarun Bharat' as a newspaper committed to fearless and nationalist ideals and constantly doing conscious journalism for it. The journey of four decades has been successful only because of your trust and cooperation. Dear readers, we have been making a successful effort to always be perfect in our commitment to the thoughts of the nation and the national interest...
 
Changing with time is essential for any organization. Daily 'Mumbai Tarun Bharat' has decided to take this role here too and make 'MahaMTB' available in the media for the new 'smart' generation. Today's youth, readers, and citizens are becoming more and more 'smart' day by day. And in today's 'smart' era, information is available in abundance in the Internet-enabled information explosion. However, there is a need for complementary knowledge to determine a modern role and approach that is compatible with culture, motionlessness and tradition.
 
That is why mahamtb.com, MahaMTB Mobile App', MahaMTB Youtube Channel, MahaMTB Facebook Page, MahaMTB Twitter, MahaMTB Instagram, MahaMTB Telegram, MahaMTB WhatsApp Group etc. through social media and advanced avatar content. We are coming before you. Role in the new era, 'smart' journalism with a view, 'smart' multimedia for the new era, and journalism for a 'smart' Maharashtra will be the side of the game.
 
Now get all the updates in one click! mahamtb.com
संबंधित मजकूर