मुंबई (ABVP Somaiya College Membership Drive) : विद्याविहार येथील प्रतिष्ठित सोमय्या महाविद्यालयात अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या वतीने राबविण्यात आलेल्या सदस्यता अभियानाला विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. यंदाच्या सदस्यता अभियानात सोमय्या महाविद्यालयातील तब्बल ४,७२६ विद्यार्थ्यांनी अभाविपची सदस्यता स्वीकारली.
महाविद्यालयीन विद्यार्थ्यांचा मोठ्या संख्येने या अभियानात झालेला सहभाग हा विद्यार्थीहिताच्या विविध प्रश्नांवर अभाविपच्या माध्यमातून कार्य करण्यासाठी विद्यार्थ्यांची असलेली तयारी दर्शवणारा आहे. शैक्षणिक प्रश्नांसोबतच सामाजिक आणि राष्ट्रीय विषयांमध्ये विद्यार्थ्यांचा सहभाग वाढविण्याच्या उद्देशाने अभाविप सातत्याने महाविद्यालयीन परिसरात कार्यरत आहे. (ABVP Somaiya College Membership Drive)
यावेळी मुंबई महानगर मंत्री अभिषेक पवार यांनी अभाविपशी नव्याने जोडलेल्या सर्व सदस्यांचे स्वागत केले. ते म्हणाले, “सोमय्या महाविद्यालयातील ४,७२६ विद्यार्थ्यांनी अभाविपवर व्यक्त केलेला विश्वास हा निश्चितच महत्त्वाचा आहे. हा केवळ सदस्यसंख्येचा आकडा नसून, आपल्या महाविद्यालयीन परिसरातील प्रश्नांवर संघटितपणे काम करण्यासाठी पुढे आलेल्या विद्यार्थीशक्तीचे प्रतिबिंब आहे. या नव्या सदस्यांच्या सहभागातून विद्यार्थीहिताच्या विविध विषयांवर अधिक व्यापकपणे काम करण्यास निश्चितच बळ मिळेल.”
सोमय्या महाविद्यालयातील या प्रतिसादामुळे मुंबई महानगरातील विविध महाविद्यालयांमध्ये अभाविपच्या सदस्यता अभियानाला मिळत असलेला विद्यार्थ्यांचा सहभाग अधोरेखित झाला आहे. आगामी काळात नव्याने जोडलेल्या सदस्यांच्या सहभागातून विद्यार्थीहिताच्या विविध विषयांवर उपक्रम आणि कार्य अधिक व्यापक करण्यावर भर दिला जाणार आहे. (ABVP Somaiya College Membership Drive)
'मास मीडिया' या विषयातून पदवीपर्यंतचे शिक्षण पूर्ण.'कम्युनिकेशन ॲण्ड जर्नालिझम' विषयातून पदव्युत्तरपर्यंतचे शिक्षण पूर्ण. सध्या दै.'मुंबई तरुण भारत'मध्ये वेब उपसंपादक म्हणून कार्यरत. लिखाण, संगीत, वाचन, फोटोग्राफी, इ.ची आवड.लिवोग्राफी भाषाशैलीत विशेष प्रावीण्य.बालपणापासून रा.स्व.संघाचा स्वयंसेवक