एमपीएससीचे अध्यक्ष, सदस्यांविरोधात कारवाईसाठी विशेष समिती; मुख्यमंत्र्यांची राज्यपालांकडे शिफारस!

    07-Oct-2026   
 
MPSC Chairman Members Action Committee
 
मुंबई (MPSC Chairman Members Action Committee) : महाराष्ट्र लोकसेवा आयोगाचे (एमपीएससी) माजी आणि विद्यमान अध्यक्ष, तसेच सदस्यांविरोधात संविधानाच्या कलम ३१७ नुसार कारवाई करण्यासाठी एक विशेष समिती गठीत करण्याची विनंती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्यपाल जिष्णूदेव वर्मा यांच्याकडे केली आहे.
 
उच्च न्यायालयाच्या निवृत्त न्यायाधीशांच्या अध्यक्षतेत समिती गठीत करून ३ महिन्यात अहवाल मागवून त्या निष्कर्षांच्या आधारे पुढील कार्यवाही करण्यात यावी, अशी विनंती करणारी शिफारस राज्यपालांकडे सादर करण्यात आली आहे. (MPSC Chairman Members Action Committee)
 
गेल्या काही दिवसांपासून एमपीएससी पेपरफुटीबाबत संतप्त विद्यार्थ्यांनी पुण्यात आंदोलन पुकारले आहे. एमपीएससीच्या अध्यक्षांच्या राजीनाम्यासह विविध मागण्या या विद्यार्थ्यांकडून करण्यात येत आहेत. राज्यात विविध राजकीय पक्षांनीही या आंदोलनाला पाठिबा दिला आहे. दरम्यान, राज्य सरकारला एमपीएससीच्या अध्यक्ष किंवा सदस्यांना पदावरून दूर करण्याचे अधिकार नाहीत. त्यामुळे आता राज्यपालांकडे उच्च न्यायालयाच्या निवृत्त न्यायाधीशांच्या अध्यक्षतेत समिती गठीत करण्याची शिफारस करण्यात आली आहे. या समितीचा अहवाल आल्यानंतर पुढील कार्यवाही करण्यात येणार आहे. (MPSC Chairman Members Action Committee)
 
 




अवंती भोयर

विज्ञान शाखेतील पदवीनंतर भारतीय जनसंचार संस्थान (IIMC) अमरावतीतून पत्रकारितेचे पदव्युत्तर शिक्षण. 'दै. मुंबई तरुण भारत'मध्ये वेब उपसंपादक या पदावर कार्यरत. शेती, साहित्य, राजकारण या विषयात विशेष रस. हस्तकला, संगीत आणि कविता लेखनाचा छंद....
संबंधित मजकूर