मुंबई (SIR Process): पात्र नागरिकांचा मतदार यादीत समावेश करणे आणि कोणताही मतदार यादीतून वगळला जाऊ नये, हे निवडणूक आयोगाच्या महत्त्वाच्या उद्दिष्टांपैकी एक आहे. हे उद्दिष्ट साध्य करण्यासाठी (SIR) प्रक्रिया आवश्यक ठरते. (SIR Process)
SIR म्हणजे नेमके काय?
Special Intensive Revision (SIR) म्हणजे मतदार याद्यांचे आणि सखोल पुनर्परीक्षण. या प्रक्रियेत मतदार यादीतील नोंदी तपासून, मतदारांच्या प्रत्यक्ष निवासाची आणि पात्रतेची पडताळणी केली जाते. (SIR Process)
मतदार यादीतील अपात्र किंवा चुकीच्या नोंदी दूर व्हाव्यात, पात्र नागरिकांची यादीत नोंद असावी, पात्र मतदाता यादीतून वगळला जाऊ नये यासाठी निवडणूक आयोगाकडून विविध टप्प्यांवर मतदार याद्यांची विशेष सखोल फेरतपासणी केले जाते. (SIR Process)
मतदार याद्यांची अचूकता आणि विश्वासार्हता कायम ठेवण्यासाठी विशेष सखोल फेरतपासणी ही निवडणूक व्यवस्थेतील दीर्घकाळ चालत आलेली प्रक्रिया आहे. सध्याची (SIR) ही त्याच व्यापक प्रक्रियेचा पुढील टप्पा आहे:
१९५२ ते १९५६ या कालावधीत निवडणूक आयोगाने देशातील बहुतांश भागांत मतदार याद्यांचे विशेष सखोल फेरतपासणी केली. त्यानंतर
१९५७, १९६१, १९६५ आणि १९६६ मध्ये विविध भागांत पुन्हा सखोल पुनर्तपासणी करण्यात आली, पुढे
१९८३-८४, १९८७-८९, १९९२, १९९३ आणि १९९५ या कालावधीतही मतदार याद्यांची विशेष सखोल फेरतपासणी केली,
२००२, २००३ आणि २००४ मध्येही निवडणूक आयोगाकडून पुन्हा अनेक भागांत विशेष सखोल फेरतपासणी करण्यात आली. (SIR Process)
(SIR) विस्तृत पुनर्परीक्षण प्रक्रिया
विस्तृत पुनर्तपासणी करत असताना घराघरात जाऊन मतदारांच्या नोंदींची पडताळणी करणे.
मतदार गणना अर्ज वितरित करणे, जमा करणे आणि नोंद करणे.
मृत व्यक्तींची नावे यादीतून रद्द करणे आणि १८ वर्षे पूर्ण झालेल्या नवीन पात्र मतदारची नोंदणी करणे.
सर्वेक्षणानंतर मतदार गणनेच्या माध्यमातून नव्याने मतदार याद्या तयार करण्याची प्रक्रिया विस्तृत पुनर्परीक्षणामध्ये केली जाते. (SIR Process)
मतदार यादीत होणारे बदल
गेल्या 20 वर्षांत मतदार यादीमध्ये अनेक नावे वाढली आणि वगळली गेली आहेत.
वेगाने होणारे शहरीकरण आणि नागरिकांचे वारंवार होणारे स्थलांतर यामुळेह मतदार यादीत एकाच व्यक्तीची नोंद एकापेक्षा अधिक ठिकाणी असण्याची शक्यता निर्माण होते. म्हणून योग्य पडताळणी करून मतदार यादीत अद्ययावत नोंदी करणे आवश्यक असते. (SIR Process)
मतदार यादी ही कायमस्वरूपी स्थिर नोंद नसते. दरवर्षी त्यात अनेक प्रकारचे बदल होत असतात. त्यामुळे मतदार याद्या अद्ययावत, अचूक आणि विश्वासार्ह ठेवण्यासाठी SIR सारखी सखोल पडताळणी प्रक्रिया आवश्यक ठरते. (SIR Process)