स्टॉकहोम (Nobel Prize Medicine 2026 Optogenetics) : मेंदूतील वेगवेगळ्या मज्जापेशी म्हणजेच न्यूरॉन्सची हालचाल प्रकाशाच्या मदतीने नियंत्रित करण्याचा मार्ग शोधणाऱ्या तीन शास्त्रज्ञांना २००२६चा वैद्यकशास्त्रातील नोबेल पुरस्कार जाहीर झाला आहे. जर्मनीचे पीटर हेगेमॅन आणि जॉर्ज नागेल तसेच अमेरिकेचे कार्ल डाइसेरोथ यांना या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे.
नोबेल समितीने लाइट गेटेड आयन चैनल और आप्टोजेनेटिक्स क्षेत्रातील त्यांच्या महत्त्वपूर्ण संशोधनासाठी तिघांची निवड केली. त्यांच्या संशोधनामुळे प्रकाशाचा वापर करून मेंदूतील विशिष्ट न्यूरॉन्सची क्रिया अत्यंत अचूक पद्धतीने सुरू किंवा बंद करणे शक्य झाले आहे. त्यामुळे मेंदू नेमका कसा काम करतो, याचा अभ्यास करण्यासाठी संशोधकांना एक प्रभावी नवे साधन मिळाले आहे. (Nobel Prize Medicine 2026 Optogenetics)
शैवालाच्या संशोधनातून उलगडले न्यूरॉन्सचे रहस्य
पीटर हेगेमॅन आणि जॉर्ज नागेल यांनी प्रकाशाला प्रतिसाद देणाऱ्या सूक्ष्मजीवांमधील प्रोटीनचा अभ्यास केला. या संशोधनातून चैनलरोडॉप्सिन नावाच्या प्रकाश-संवेदनशील प्रोटीनची महत्त्वाची भूमिका समोर आली. (Nobel Prize Medicine 2026 Optogenetics)
ही प्रोटीन प्रकाशाच्या संपर्कात आल्यानंतर पेशींच्या पडद्यामधून आयनचा प्रवाह नियंत्रित करतात. पुढे याच तत्त्वाचा वापर करून न्यूरॉन्सवर नियंत्रण ठेवण्याची शक्यता निर्माण झाली.
कार्ल डाइसेरोथ यांनी दिली ऑप्टोजेनेटिक्सला नवी दिशा
अमेरिकन शास्त्रज्ञ कार्ल डाइसेरोथ यांनी प्रकाश-संवेदनशील प्रोटीनचा वापर न्यूरॉन्स नियंत्रित करण्यासाठी केला. या तंत्रज्ञानाला पुढे ऑप्टोजेनेटिक्स म्हणून ओळख मिळाली.
या पद्धतीमध्ये विशिष्ट न्यूरॉन्सना प्रकाश-संवेदनशील बनवले जाते. त्यानंतर प्रकाश टाकून त्या पेशी सक्रिय किंवा निष्क्रिय करता येतात. त्यामुळे मेंदूतील एखाद्या विशिष्ट न्यूरॉनचा किंवा न्यूरल सर्किटचा वर्तनावर नेमका काय परिणाम होतो, हे तपासणे शक्य झाले. (Nobel Prize Medicine 2026 Optogenetics)
मेंदूच्या संशोधनात मोठी क्रांती
मेंदूमध्ये अब्जावधी न्यूरॉन्स असून ते सतत एकमेकांशी विद्युत आणि रासायनिक संकेतांद्वारे संवाद साधत असतात. एखाद्या विशिष्ट न्यूरॉनची भूमिका काय आहे, हे शोधणे पूर्वी अत्यंत कठीण होते. (Nobel Prize Medicine 2026 Optogenetics)
ऑप्टोजेनेटिक्समुळे संशोधकांना विशिष्ट पेशींवर थेट नियंत्रण मिळाले. त्यामुळे स्मरणशक्ती, भावना, हालचाल, बक्षीसाची भावनांचा अभ्यास अधिक अचूकपणे करता येऊ लागला.
या तंत्रज्ञानाचा वापर जगभरातील प्रयोगशाळांमध्ये मेंदू आणि मज्जासंस्थेच्या कार्याचा अभ्यास करण्यासाठी केला जात आहे. (Nobel Prize Medicine 2026 Optogenetics)
डोळ्यांच्या आजारांवरही संशोधन
या शोधाचा संभाव्य उपयोग डोळ्यांच्या उपचारांमध्येही केला जात आहे. दृष्टी गमावलेल्या व्यक्तींच्या डोळ्यांतील काही पेशींना प्रकाशाला प्रतिसाद देण्यास सक्षम करून दृष्टीचा काही भाग पुन्हा मिळवता येईल का, यावर संशोधन सुरू आहे. (Nobel Prize Medicine 2026 Optogenetics)
मात्र, ऑप्टोजेनेटिक्सच्या मदतीने सध्या सर्व प्रकारच्या अंधत्वावर उपचार उपलब्ध झाले आहेत, असे म्हणता येणार नाही. हे क्षेत्र अद्याप संशोधन आणि वैद्यकीय चाचण्यांच्या टप्प्यात आहे.
नोबेल सप्ताहाला सुरुवात
स्टॉकहोम येथील कॅरोलिन्स्का इन्स्टिट्यूट येथे २०२६ च्या मेडिसिन नोबेल पुरस्काराची घोषणा करण्यात आली. यासोबतच यंदाच्या नोबेल पुरस्कार सप्ताहाला सुरुवात झाली आहे. (Nobel Prize Medicine 2026 Optogenetics)
मेडिसिननंतर मंगळवार, दि. ६ ऑक्टोबर रोजी भौतिकशास्त्र, बुधवार, दि. ७ ऑक्टोबर रोजी रसायनशास्त्र आणि गुरुवार, दि. ८ ऑक्टोबर रोजी साहित्याच्या नोबेल पुरस्कारांची घोषणा होणार आहे. त्यानंतर शुक्रवार, दि. ९ ऑक्टोबर रोजी शांततेच्या नोबेल पुरस्काराची घोषणा केली जाईल. दि. १२ ऑक्टोबर रोजी आर्थिक शास्त्रातील नोबेल मेमोरियल पुरस्कार जाहीर केला जाणार आहे. (Nobel Prize Medicine 2026 Optogenetics)