पीपल्सच्या परिवर्तनाचे कार्य अधिक व्यापक करण्यासाठी प्रयत्नशील; विधानसभा उपाध्यक्ष अण्णा बनसोडे

पीपल्स एज्युकेशन संस्थेच्या विश्वस्तपदाचा पदभार स्वीकारला

    05-Oct-2026   
      
Anna Bansode Peoples Education Society 
 
मुंबई (Anna Bansode Peoples Education Society): पीपल्स एज्युकेशन संस्थेच्या विश्वस्तपदी नियुक्ती झाल्यानंतर महाराष्ट्र विधानसभा उपाध्यक्ष तथा पिंपरी विधानसभा मतदारसंघाचे आमदार अण्णा बनसोडे यांनी सोमवारी, मुंबई येथील सिद्धार्थ कॉलेजला भेट देत विश्वस्तपदाचा पदभार स्वीकारला.
यावेळी अण्णा बनसोडे यांनी पीपल्स एज्युकेशन संस्थेच्या विविध शैक्षणिक व प्रशासकीय कामकाजाची माहिती घेतली. तसेच संस्थेच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना दिल्या जाणाऱ्या शैक्षणिक सुविधांची पाहणी करून महाविद्यालयातील विद्यार्थी-विद्यार्थिनींशी संवाद साधला. विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक अडचणी, अपेक्षा आणि भविष्यातील संधी याबाबत त्यांनी चर्चा केली. (Anna Bansode Peoples Education Society)
 
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या शैक्षणिक आणि सामाजिक परिवर्तनाच्या विचारातून उभ्या राहिलेल्या पीपल्स एज्युकेशन संस्थेच्या माध्यमातून समाजातील वंचित, दुर्बल आणि गरजू घटकांपर्यंत दर्जेदार शिक्षण पोहोचविण्याचे महत्त्वपूर्ण कार्य सुरू आहे. या कार्याला अधिक बळ देण्यासाठी आपण कटिबद्ध असल्याचे अण्णा बनसोडे यांनी यावेळी सांगितले. (Anna Bansode Peoples Education Society)
 
“शिक्षण हे सामाजिक परिवर्तनाचे प्रभावी माध्यम आहे. पीपल्स एज्युकेशन संस्थेच्या माध्यमातून शिक्षणाचा प्रसार आणि सामाजिक परिवर्तनाचे कार्य अधिक व्यापक करण्यासाठी आपण प्रयत्नशील राहू. विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी आवश्यक त्या सुविधा आणि संधी उपलब्ध करून देण्यास प्राधान्य दिले जाईल. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा शिक्षणाचा वसा पुढे नेत असताना संस्थेच्या वाढीसाठी शासनाकडून सर्वोत्तपरीने सहकार्य कसे होईल यासाठी प्रयत्न असेल," असेही अण्णा बनसोडे म्हणाले. (Anna Bansode Peoples Education Society)
 
 




अवंती भोयर

विज्ञान शाखेतील पदवीनंतर भारतीय जनसंचार संस्थान (IIMC) अमरावतीतून पत्रकारितेचे पदव्युत्तर शिक्षण. 'दै. मुंबई तरुण भारत'मध्ये वेब उपसंपादक या पदावर कार्यरत. शेती, साहित्य, राजकारण या विषयात विशेष रस. हस्तकला, संगीत आणि कविता लेखनाचा छंद....
संबंधित मजकूर