विधानपरिषदेसाठी भाजपचे उमेदवार जाहीर

    04-Oct-2026   
 

Maharashtra MLC Election 2026
 
मुंबई (Maharashtra MLC Election 2026): राज्यातील विधानपरिषदेच्या तीन पदवीधर आणि दोन शिक्षक मतदारसंघाच्या आगामी निवडणुकीला वेग आला असून काँग्रेसनंतर आता भाजपनेही तीन जागांसाठी आपल्या उमेदवारांची यादी जाहीर केली आहे. (Maharashtra MLC Election 2026)
 
येत्या २३ ऑक्टोबर रोजी महाराष्ट्रातील तीन पदवीधर आणि दोन शिक्षक मतदारसंघाच्या निवडणूकीसाठी मतदान होणार आहे. महायुतीमध्ये यातील पुणे पदवीधर, पुणे शिक्षक आणि नागपूर पदवीधर या तीन जागा भाजपाच्या वाट्याला आल्या असून या जागांवर भाजपने आपले उमेदवार जाहीर केले आहेत. (Maharashtra MLC Election 2026)
 
दरम्यान, पुणे पदवीधर मतदारसंघात डॉ. स्मिता जाधव तर पुणे शिक्षक मतदारसंघात कौस्तुभ गावडे यांना उमेदवारी देण्यात आली आहे. तसेच भाजपचा पारंपरिक बालेकिल्ला असलेल्या नागपूर पदवीधर मतदारसंघातून माजी आमदार सुधाकर कोहळे यांना संधी देण्यात आली आहे. (Maharashtra MLC Election 2026)
 
पुण्यात धक्कातंत्र
 
भाजपने नेहमीप्रमाणे पुण्यात धक्कातंपत्राचा वापर केला आहे. अनेक नावांच्या चर्चा असताना भाजपने पुणे पदवीधर मतदारसंघातून डॉ. स्मिता योगेश जाधव यांना उमेदवारी दिली आहे. (Maharashtra MLC Election 2026)
 
 




अवंती भोयर

विज्ञान शाखेतील पदवीनंतर भारतीय जनसंचार संस्थान (IIMC) अमरावतीतून पत्रकारितेचे पदव्युत्तर शिक्षण. 'दै. मुंबई तरुण भारत'मध्ये वेब उपसंपादक या पदावर कार्यरत. शेती, साहित्य, राजकारण या विषयात विशेष रस. हस्तकला, संगीत आणि कविता लेखनाचा छंद....
संबंधित मजकूर