मुंबई : नजीकच्या काळात सत्ता दिसणार नाही, या नैराश्यातून पुन्हा सत्ता काबीज करण्यासाठी फक्त अराजकतेचा मार्ग उरल्याची भूमिका काँग्रेस व इंडिया आघाडीतील नेत्यांची झाली आहे. देशविरोधी प्रवृत्तींसोबत त्यांच्यासोबत हातमिळवणी करून विरोधी पक्ष हे काम करत आहे. या विरोधात येत्या २ नोव्हेंबर रोजी 'लोकशाही बचाओ, अराजकता हटाव' हा एल्गार केला जाणार असल्याची माहिती मुंबई भाजपचे अध्यक्ष आ. अमीत साटम यांनी दिली. (BJP Mumbai March November 2)
भाजप कार्यालयात झालेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी कॅबिनेट मंत्री मंगलप्रभात लोढा, मुंबईच्या महापौर रितू तावडे, भाजप मुंबई सरचिटणीस आचार्य पवन त्रिपाठी, राजेश शिरवडकर, श्वेता परुळकर, मुंबई भाजपा प्रवक्ते ॲड. अनिकेत निकम यांच्यासह इतर नेते उपस्थित होते. (BJP Mumbai March November 2)
आ. अमीत साटम म्हणाले की, ‘लोकतंत्र बचाओ-अराजकता हटाओ' अभियानांतर्गत सोमवार, दि. २ नोव्हेंबर २०२६ रोजी दुपारी ३ वाजता शिवतीर्थ, शिवाजी पार्क येथून कामगार मैदानापर्यंत पदयात्रेचे आयोजन करण्यात आले आहे. या पदयात्रेच्या माध्यमातून लोकशाही आणि संविधानाप्रती आपली बांधिलकी व्यक्त करण्यात येणार आहे. ही पदयात्रा शांततापूर्ण पद्धतीने आयोजित करण्यात येणार असून, संविधानाचा सन्मान, लोकशाही मूल्यांचे संरक्षण आणि समाजात जनजागृती करणे हा या उपक्रमाचा उद्देश आहे. पदयात्रेच्या समारोपानंतर उपस्थित प्रमुख नेत्यांपैकी एका नेत्याचे भाषण होणार आहे. (BJP Mumbai March November 2)
विविध कार्यक्रमांचे आयोजन
"या अभियानांतर्गत मुंबई आणि महाराष्ट्रातील विविध शहरांमध्ये जिल्हास्तरावर व विधानसभा स्तरावर प्रबुद्ध नागरिक संमेलने, तसेच विविध क्षेत्रांतील प्रभावशाली व्यक्तींसोबत संवाद कार्यक्रम आयोजित करण्यात येणार आहेत. दिशाभूल करणाऱ्या माहितीमुळे निर्माण होणारे गैरसमज दूर करणे, लोकशाही प्रक्रियेबाबत जागरूकता वाढवणे आणि नागरिकांपर्यंत वस्तुस्थिती पोहोचवणे हा या कार्यक्रमांचा उद्देश आहे. ‘विकसित भारत २०४७’ हे ध्येय साध्य करण्यासाठी समाजात शांतता, एकता आणि लोकशाही मूल्ये टिकवून ठेवणे आवश्यक आहे. भाषा, जात, धर्म आणि प्रांताच्या आधारावर समाजात तेढ निर्माण करण्याच्या प्रयत्नांना विरोध करून नागरिकांमध्ये जनजागृती करण्याचा मुंबई भाजपचा संकल्प आहे," असेही त्यांनी सांगितले. (BJP Mumbai March November 2)
ते पुढे म्हणाले की, "गेल्या बारा वर्षांत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली भारताचा मान आणि जागतिक स्तरावरील प्रतिष्ठा वाढली आहे. भारत जगातील चौथी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनला असून, देशात अनेक महत्त्वपूर्ण पायाभूत सुविधा प्रकल्प उभारण्यात आले आहेत. कोविडच्या जागतिक संकटाच्या काळात केंद्र सरकारने जाहीर केलेले आत्मनिर्भर भारत पॅकेज आणि देशात राबविण्यात आलेल्या लसीकरण कार्यक्रमामुळे भारताला संकटातून बाहेर पडण्यास मदत झाली." (BJP Mumbai March November 2)
विरोधकांकडून अराजकता निर्माण करण्याचा प्रयत्न
"काँग्रेस आणि राहुल गांधी यांच्याकडून दिशाभूल करणारी माहिती पसरवली जात असून विकासाच्या मुद्द्यांवर चर्चा करण्याऐवजी विरोधकांकडून अराजकता निर्माण करण्याचा प्रयत्न होत आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी देशाला दिलेल्या संविधानाचा सन्मान राखणे आणि लोकशाही प्रक्रियेवर विश्वास ठेवणे आवश्यक आहे," असेही ते म्हणाले. (BJP Mumbai March November 2)
नसीरुद्दीन शाह यांची ‘गुलफाम हसन’ची भूमिका प्रत्यक्षात?
अभिनेते नसीरुद्दीन शाह यांच्या कथित वक्तव्याबाबत बोलताना आ. अमीत साटम म्हणआले की, “भारत तेरे तुकडे होंगे, इंशा अल्लाह, इंशा अल्लाह” आणि “अफझल हम शर्मिंदा हैं, तेरे कातिल जिंदा हैं” या घोषणा नेमक्या कोणत्या विचारांचे प्रतिनिधित्व करतात? या घोषणांना नसीरुद्दीन शाह यांचे समर्थन आहे का?, याबाबत त्यांनी आपली भूमिका स्पष्ट करावी. भारताची वाढती जागतिक प्रतिष्ठा काही आंतरराष्ट्रीय शक्तींना मान्य नसून देशांतर्गत विरोधक आणि काही भारतविरोधी शक्तींकडून देशात अराजकता निर्माण करण्याचा प्रयत्न होत आहे. या पार्श्वभूमीवर नागरिकांनी दिशाभूल करणाऱ्या माहितीला बळी न पडता वस्तुस्थिती समजून घ्यावी," असे आवाहनही त्यांनी केले. तसेच, जावेद अख्तर, शबाना आझमी आणि नसीरुद्दीन शाह यांच्या भूमिकांवरही त्यांनी टीका केली. (BJP Mumbai March November 2)
देशविरोधी प्रवृत्तींसोबत हातमिळवणी करून विरोधी पक्षांना त्यांच्या माध्यमातून त्यांना सत्ता काबीज करायची आहे, असे सांगत त्यांनी चंगूमंगू मिमिक्री आर्टिस्ट या शब्दात ठाकरे बंधूंवर टीका केली. तसेच काँग्रेस फेक नरेटीव्हची फॅक्टरी असून, फॅक्टरी ऑफ फेक नरेटीव्ह हे राहुल गांधी आहेत," अशी टीकाही अमीत साटम यांनी केली. (BJP Mumbai March November 2)
विज्ञान शाखेतील पदवीनंतर भारतीय जनसंचार संस्थान (IIMC) अमरावतीतून पत्रकारितेचे पदव्युत्तर शिक्षण. 'दै. मुंबई तरुण भारत'मध्ये वेब उपसंपादक या पदावर कार्यरत. शेती, साहित्य, राजकारण या विषयात विशेष रस. हस्तकला, संगीत आणि कविता लेखनाचा छंद....