मुंबई (Binance Hack 2026) : जगातील आघाडीच्या क्रिप्टोकरन्सी एक्सचेंजपैकी एक असलेल्या बायनान्सवर मोठा सायबर हल्ला झाल्याची घटना समोर आली आहे. या हल्ल्यात सुमारे ५.३ अब्ज डॉलर म्हणजेच जवळपास ५० हजार कोटी रुपयांच्या क्रिप्टो मालमत्तेवर परिणाम झाल्याचा कंपनीचा प्राथमिक अंदाज आहे. हा आकडा अंतिम नसून तपासादरम्यान त्यात बदल होऊ शकतो. या घटनेमुळे क्रिप्टोकरन्सी क्षेत्रात मोठी खळबळ उडाली आहे.
बायनान्सने ठेवी आणि पैसे काढण्याच्या सेवा तात्पुरत्या थांबवल्या
सुरक्षेच्या दृष्टीने बायनान्सने काही नेटवर्कवरील ठेवी आणि पैसे काढण्याच्या सेवा तात्पुरत्या स्थगित केल्या आहेत. कंपनीने प्रभावित पत्त्यांचे व्यवहार करण्याचे अधिकार रद्द केले असून, हल्ल्याचा तपास करण्यासाठी कायदा अंमलबजावणी यंत्रणा आणि ब्लॉकचेन विश्लेषकांची मदत घेतली आहे. (Binance Hack 2026)
बायनान्सने ३० ऑक्टोबर रोजी जारी केलेल्या अधिकृत निवेदनात या घटनेचा प्राथमिक आर्थिक परिणाम सुमारे ६.३ अब्ज डॉलर असल्याचे म्हटले आहे. ब्लॉकचेन क्षेत्रातील भागीदारांच्या मदतीने आतापर्यंत सुमारे ३ अब्ज डॉलरची क्रिप्टो मालमत्ता गोठवण्यात आल्याचेही कंपनीने सांगितले आहे. उर्वरित रक्कम शोधण्याचे प्रयत्न सुरू आहेत.
इंजिनिअरचा लॅपटॉप हॅक झाल्याचा संशय
बायनान्सच्या प्राथमिक तपासानुसार, कंपनीच्या एका DevOps इंजिनिअरचा लॅपटॉप हॅक झाल्यामुळे हल्लेखोरांना अंतर्गत सर्व्हिस कंटेनरपर्यंत प्रवेश मिळाला असावा. या माध्यमातून अनधिकृत पैसे काढण्याचे व्यवहार सादर करण्यात आल्याचा संशय आहे. (Binance Hack 2026)
मात्र, कोणत्याही वॉलेटची खासगी सुरक्षा की (Private Key) लीक झाल्याचा पुरावा अद्याप मिळालेला नसल्याचे कंपनीने स्पष्ट केले आहे. तपास पूर्ण झाल्यानंतर सविस्तर तांत्रिक अहवाल प्रसिद्ध केला जाईल, असेही बायनान्सने सांगितले आहे. (Binance Hack 2026)
बायनान्स म्हणते, ग्राहकांचे पैसे सुरक्षित
या घटनेनंतर ग्राहकांच्या निधीबाबत चिंता व्यक्त केली जात असताना बायनान्सने ग्राहकांचे पैसे सुरक्षित असल्याचे म्हटले आहे. हल्ल्यामुळे झालेल्या नुकसानीची भरपाई कंपनीच्या SAFU फंड आणि स्वतःच्या निधीतून केली जाईल, असे आश्वासनही देण्यात आले आहे.
बायबिट हॅकिंगचा विक्रमही मागे पडण्याची शक्यता
यापूर्वी फेब्रुवारी २०२५ मध्ये दुबईस्थित बायबिट क्रिप्टो एक्सचेंजवर सुमारे १.५ अब्ज डॉलरचा सायबर हल्ला झाला होता. उत्तर कोरियाशी संबंधित हॅकर्सवर या हल्ल्याचा आरोप करण्यात आला होता. बायनान्सवरील हल्ल्याचा सध्याचा अंदाज अंतिम ठरल्यास तो बायबिटवरील हल्ल्यापेक्षा चारपट मोठा ठरू शकतो. त्यामुळे क्रिप्टोकरन्सी क्षेत्रातील आतापर्यंतच्या सर्वात मोठ्या सायबर हल्ल्यांपैकी ही एक घटना ठरण्याची शक्यता आहे. (Binance Hack 2026)
बिटकॉइनसह प्रमुख क्रिप्टोकरन्सींच्या किमती घसरल्या
बायनान्सवरील हल्ल्याची बातमी समोर आल्यानंतर बिटकॉइनसह इथेरियम आणि इतर प्रमुख क्रिप्टोकरन्सींच्या किमतींमध्ये घसरण झाली. बिटकॉइनच्या किमतीत सुमारे ५ टक्क्यांची घसरण नोंदवण्यात आली. इथेरियम आणि सोलाना यांसारख्या इतर प्रमुख डिजिटल करन्सीमध्येही जवळपास तितकीच घसरण झाली आहे. क्रिप्टो बाजारातील अनिश्चिततेमुळे गुंतवणूकदारांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. (Binance Hack 2026)
क्रिप्टोकरन्सी एक्सचेंजवर हल्ला झाल्यानंतर चोरलेली रक्कम दुसऱ्या डिजिटल वॉलेटमध्ये पाठवून किंवा तिचे रूपांतर करून ती वापरण्याचा प्रयत्न केला जाऊ शकतो. मात्र, टेथर (USDT) आणि सर्कल (USDC) यांसारख्या स्टेबलकॉइन जारी करणाऱ्या कंपन्यांना ब्लॉकचेनवरील विशिष्ट पत्त्यांशी संबंधित टोकन गोठवण्याची क्षमता असते.
बायनान्सच्या प्रकरणातही अशा प्रकारे काही मालमत्ता गोठवण्यात आल्याचे सांगण्यात आले आहे. त्यामुळे हल्लेखोरांना संबंधित निधी पुढे हस्तांतरित करणे किंवा त्याचा वापर करणे कठीण होऊ शकते. या घटनेचा सविस्तर तपास सुरू असून, अंतिम नुकसान आणि हल्ल्याची संपूर्ण पद्धत तपासानंतर स्पष्ट होणार आहे. (Binance Hack 2026)
Hello, You must be familiar with the Nation First approach daily 'Mumbai Tarun Bharat' as a newspaper committed to fearless and nationalist ideals and constantly doing conscious journalism for it. The journey of four decades has been successful only because of your trust and cooperation. Dear readers, we have been making a successful effort to always be perfect in our commitment to the thoughts of the nation and the national interest...
Changing with time is essential for any organization. Daily 'Mumbai Tarun Bharat' has decided to take this role here too and make 'MahaMTB' available in the media for the new 'smart' generation. Today's youth, readers, and citizens are becoming more and more 'smart' day by day. And in today's 'smart' era, information is available in abundance in the Internet-enabled information explosion. However, there is a need for complementary knowledge to determine a modern role and approach that is compatible with culture, motionlessness and tradition.
That is why mahamtb.com, MahaMTB Mobile App', MahaMTB Youtube Channel, MahaMTB Facebook Page, MahaMTB Twitter, MahaMTB Instagram, MahaMTB Telegram, MahaMTB WhatsApp Group etc. through social media and advanced avatar content. We are coming before you. Role in the new era, 'smart' journalism with a view, 'smart' multimedia for the new era, and journalism for a 'smart' Maharashtra will be the side of the game.