भूतानमध्ये निसर्गाचा प्रकोप! हिमनदी सरोवर फुटले, प्रसिद्ध गरम पाण्याचे कुंड उद्ध्वस्त; भारतातील सीमावर्ती भाग अलर्टवर!

 
Bhutan Glacial Lake Outburst Flood
 
थिम्फू (Bhutan Glacial Lake Outburst Flood) : भूतानमध्ये गुरुवार, दि. २९ ऑक्टोबर रात्री शिंताफू हिमनदी सरोवर फुटल्याने अचानक पूरस्थिती निर्माण झाली. पाण्याच्या प्रचंड प्रवाहामुळे प्रसिद्ध ‘गासा त्साचू’ नैसर्गिक गरम पाण्याच्या कुंडातील सुविधा वाहून गेल्या, तर पुनाखा-गासा महामार्गाच्या काही भागाचेही नुकसान झाले. या घटनेत अद्याप कोणतीही जीवितहानी झाल्याचे वृत्त नाही. दरम्यान, सरोवरातून बाहेर पडलेले पाणी नदीप्रणालीतून भारतात येण्याची शक्यता असल्याने पश्चिम बंगाल आणि आसाममध्ये सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.
 
भूतानमधील प्रसिद्ध गरम पाण्याचे कुंड उद्ध्वस्त
 
भूतानच्या गासा जिल्ह्यातील लाया परिसरात असलेल्या शिंताफू त्सो सरोवरातून २९ ऑक्टोबरच्या संध्याकाळी पाण्याचा मोठा प्रवाह बाहेर पडल्याचे वृत्त आहे. वाकिला पर्वताच्या खाली असलेले हे सरोवर भूतानमधील संभाव्य धोकादायक १७ हिमनदी सरोवरांपैकी एक मानले जाते. (Bhutan Glacial Lake Outburst Flood)
 
सरोवरातून बाहेर पडलेले पाणी मो छू नदीच्या जलग्रहण क्षेत्रातून पुढे वाहू लागले. या पुराच्या पाण्यामुळे गासा त्साचू येथील गरम पाण्याच्या कुंडातील सुविधा आणि परिसरातील रस्त्यांचे नुकसान झाले. पाण्याचा प्रवाह आणि अंधार यामुळे नुकसानीचा संपूर्ण अंदाज तातडीने घेता आला नसल्याचे वृत्त आहे.
 
भारतातील नदीकाठच्या भागांना सतर्कतेचा इशारा
 
भूतानमधील सरोवर फुटल्यामुळे नदीच्या पाणीपातळीत अचानक वाढ होण्याची शक्यता आहे. मो छू आणि फो छू नद्यांच्या संगमातून पुनात्सांगछू नदी तयार होते. पुढे या नदीप्रणालीतील पाणी भारतात संकोश नदीच्या माध्यमातून पोहोचते आणि अखेरीस ब्रह्मपुत्रा नदीला मिळते. (Bhutan Glacial Lake Outburst Flood)
 
या पार्श्वभूमीवर पश्चिम बंगालमधील अलीपुरद्वार आणि जलपाईगुरी जिल्ह्यांसह आसाममधील धुबरी परिसरात सतर्कता वाढवण्यात आली आहे. नदीकाठच्या आणि सखल भागांतील नागरिकांना सुरक्षित ठिकाणी जाण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
 
अलीपुरद्वारमध्ये १० हजारांहून अधिक नागरिकांचे स्थलांतर
 
पश्चिम बंगालमधील अलीपुरद्वार जिल्ह्यात पूरस्थितीचा धोका लक्षात घेऊन १० हजारांहून अधिक नागरिकांना सुरक्षित ठिकाणी हलवण्यात आले आहे. काही नागरिकांना मदत छावण्यांमध्ये ठेवण्यात आले आहे. प्रशासनाकडून सायरनच्या माध्यमातून नागरिकांना सतर्क करण्यात आले असून, राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दल (NDRF), राज्य आपत्ती प्रतिसाद दल (SDRF) आणि आपत्ती व्यवस्थापन यंत्रणा सज्ज ठेवण्यात आल्या आहेत. (Bhutan Glacial Lake Outburst Flood)
 
हिमनदी सरोवर फुटल्याने अचानक पूर कसा येतो?
 
हिमनदी वितळल्यामुळे किंवा तिच्या मागे सरकल्यामुळे तयार झालेल्या सरोवरात मोठ्या प्रमाणात पाणी साचू शकते. या पाण्याला रोखून धरणारा नैसर्गिक अडथळा कमकुवत झाला किंवा फुटला, तर पाण्याचा प्रचंड प्रवाह अचानक खालील भागांत धावतो. या घटनेला ग्लेशियल लेक आउटबर्स्ट फ्लड असे म्हणतात. (Bhutan Glacial Lake Outburst Flood)
 
अशा पुरामुळे नद्या अचानक दुथडी भरून वाहू शकतात आणि रस्ते, पूल, वीज व्यवस्था तसेच नदीकाठच्या वस्त्यांना धोका निर्माण होऊ शकतो. त्यामुळे भूतानमधील घटनेनंतर भारतातील सीमावर्ती जिल्ह्यांमध्येही प्रशासनाकडून परिस्थितीवर लक्ष ठेवले जात आहे. (Bhutan Glacial Lake Outburst Flood)
 
 




मुंबई तरुण भारत वेब टीम

Hello, You must be familiar with the Nation First approach daily 'Mumbai Tarun Bharat' as a newspaper committed to fearless and nationalist ideals and constantly doing conscious journalism for it. The journey of four decades has been successful only because of your trust and cooperation. Dear readers, we have been making a successful effort to always be perfect in our commitment to the thoughts of the nation and the national interest...
 
Changing with time is essential for any organization. Daily 'Mumbai Tarun Bharat' has decided to take this role here too and make 'MahaMTB' available in the media for the new 'smart' generation. Today's youth, readers, and citizens are becoming more and more 'smart' day by day. And in today's 'smart' era, information is available in abundance in the Internet-enabled information explosion. However, there is a need for complementary knowledge to determine a modern role and approach that is compatible with culture, motionlessness and tradition.
 
That is why mahamtb.com, MahaMTB Mobile App', MahaMTB Youtube Channel, MahaMTB Facebook Page, MahaMTB Twitter, MahaMTB Instagram, MahaMTB Telegram, MahaMTB WhatsApp Group etc. through social media and advanced avatar content. We are coming before you. Role in the new era, 'smart' journalism with a view, 'smart' multimedia for the new era, and journalism for a 'smart' Maharashtra will be the side of the game.
 
Now get all the updates in one click! mahamtb.com
संबंधित मजकूर