कॅप्टन स्मित मछार यांच्या शौर्याचा मालाडवासीयांना विशेष अभिमान! – आमदार अतुल भातखळकर

    03-Oct-2026
Captain Smit Machar
 
मुंबई (Captain Smit Machar) : आपल्या अद्वितीय शौर्याने आणि प्रसंगावधानाने जगभरात कौतुकाचा विषय ठरलेले कॅप्टन स्मित मछार हे आज देशासाठी अभिमानाचे प्रतीक बनले आहेत. विशेष म्हणजे, त्यांचे सासरे श्री. जयसुख जोगी हे मालाड पूर्वेतील इंद्रप्रस्थ सोसायटीचे रहिवासी असल्याने कॅप्टन स्मित मछार यांच्या कर्तृत्वाचा मालाडवासीयांना विशेष अभिमान आहे, अशी भावना कांदिवली पूर्वचे भाजपा आमदार अतुल भातखळकर यांनी व्यक्त केली.
 
आमदार अतुल भातखळकर यांनी आज मालाड पूर्वेतील इंद्रप्रस्थ सोसायटी येथे श्री. जयसुख जोगी यांच्या निवासस्थानी सदिच्छा भेट दिली. यावेळी त्यांनी श्री. जोगी यांचा शाल व पुष्पगुच्छ देऊन विशेष सत्कार केला. तसेच त्यांच्या शूर जावयाने दाखवलेल्या असामान्य धैर्याबद्दल समस्त मालाडवासीयांच्या वतीने त्यांचे मनःपूर्वक अभिनंदन केले. या भेटीदरम्यान श्री. जोगी यांनी कॅप्टन मछार यांच्या धाडसी कामगिरीबरोबरच त्यांच्या जीवनप्रवासातील अनेक आठवणींना उजाळा दिला. (Captain Smit Machar)
 
 
 
याप्रसंगी आमदार अतुल भातखळकर म्हणाले की, "कॅप्टन स्मित मछार यांनी आपल्या अतुलनीय धैर्याने संपूर्ण देशाची मान जगात उंचावली आहे. अशा पराक्रमी वीराचे सासरे आमच्या मालाड पूर्वेतील इंद्रप्रस्थ सोसायटीत राहतात, ही आमच्यासाठी अत्यंत गौरवाची बाब आहे. कॅप्टन मछार हे केवळ आपल्या कुटुंबाचेच नव्हे, तर संपूर्ण देशाचे अभिमानस्थान आहेत. त्यांच्या शौर्याने तरुण पिढीसमोर धैर्य, कर्तव्यनिष्ठा आणि प्रसंगावधानाचा आदर्श निर्माण केला आहे. या शूर वैमानिकाच्या पाठीशी आम्ही सदैव खंबीरपणे उभे असून, त्यांच्या उत्तम आरोग्यासाठी आणि लवकर बरे होण्यासाठी मनःपूर्वक शुभेच्छा व्यक्त करतो." (Captain Smit Machar)
 
 




संबंधित मजकूर