दुष्काळग्रस्तांना केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवलेंचा मदतीचा हात! रिपाइंतर्फे दुष्काळग्रस्तांसाठी जिवनावश्यक वस्तुंचा ट्रक रवाना!

    03-Oct-2026
 Ramdas Athawale Drought Relief
 
मुंबई (Ramdas Athawale Drought Relief ) : मराठवाडयासह राज्यभरातील २६५ तालुक्यात राज्य सरकारने दुष्काळ जाहीर केला आहे. दुष्काळग्रस्त भागातील गरीब शेतकरी, शेतमजुर, कष्टकरी हे मोठया संकटात आहेत. दुष्काळाच्या संकटावर मात करण्यासाठी दुष्काळग्रस्तांना मदत करण्यासाठी सर्वांनी पुढे आले पाहिजे. राज्य सरकार लवकरच दुष्काळग्रस्तांना मदत जाहीर करणार आहे. रिपब्लिकन पक्ष आपल्या क्षमतेप्रमाणे दुष्काळग्रस्तांना मदत करीत आहे.
 
 
 
राज्यातील उद्योजकांनी, कॉर्पोरेट क्षेत्राने दुष्काळग्रस्तांना मदत करण्यासाठी पुढे आले पाहिजे. असे आवाहन रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री ना. रामदास आठवले यांनी केले. दुष्काळग्रस्तांना जिवनावश्यक वस्तुंची मदत देणा-या पहिल्या ट्रकला केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांच्या हस्ते हिरवा झेंडा दाखवुन रवाना करण्यात आले. त्यावेळी ते बोलत होते. (Ramdas Athawale Drought Relief )
 
 
 
बीड जिल्हयातील दुष्काळग्रस्तांना रिपब्लिकन पक्षाचे युवक आघाडीचे महाराष्ट्र राज्य अध्यक्ष पप्पु कागदे यांच्या हस्ते ही मदत दुष्काळग्रस्तांना वितरीत करण्यात येणार आहे. यासारखे आणखी पाच ट्रक राज्यातील इतर दुष्काळी भागात पाठवुन जिवनावश्यक वस्तुंची मदत दुष्काळग्रस्तांना मोफत करण्यात येणार आहे. यासाठी रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय कोषाध्यक्ष एम.एस. नंदा यांनी संयोजन केल्याची माहिती रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री ना. रामदास आठवले यांनी दिली. (Ramdas Athawale Drought Relief )




संबंधित मजकूर