अकोला (Chandrashekhar Bawankule Akola Drought) : 'पंचायत ते पार्लमेंट' आणि 'तलाठी ते मुख्य सचिव' अशी यंत्रणा सतर्क ठेवण्यात आली आहे. अधिकाऱ्यांनी मुख्यालयात न सोडता फिल्ड'वर काम करावे. दुष्काळ कितीही गंभीर असला तरीही शासन शेतकऱ्यांच्या पाठिशी खंबीरपणे उभे आहे. कोणीही आत्महत्येसारखा मार्ग निवडू नये, अशी कळकळीची विनंती आहे. दुष्काळी परिस्थितीला सामोरे जाऊ असा विश्वास महसूलमंत्री तथा दुष्काळ निवारण मंत्रीमंडळ उपसमितीचे अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिला.
छत्रपती संभाजीनगर आणि जालन्यानंतर दुष्काळ निवारण मंत्रीमंडळ उपसमितीचे अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी अकोला जिल्ह्यातील येवता आणि बाळापूर तालुक्यातील मानकी देगाव आणि पारस या गावांचा दौरा केला. अकोला येथे नागरिकांशी संवाद साधत त्यांनी सुमारे पाचशेहून अधिक निवेदने स्वीकारली. त्यानंतर ते पत्रकारांशी बोलत होते. (Chandrashekhar Bawankule Akola Drought)
बावनकुळे म्हणाले, शेतकऱ्यांच्या पिकांचे अचूक पंचनामे पूर्ण झाल्यावर ट्रिगर १ व ट्रिगर २ नुसार केंद्र, राज्य शासन आणि पीक विमा कंपन्यांमार्फत जास्तीत जास्त मदत दिली जाईल. दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांना आर्थिक मदत देण्याबाबत सरकार अत्यंत सकारात्मक आहे. केंद्राच्या मदतीची वाट न पाहता राज्य सरकार तातडीने पावले उचलत आहे. केंद्राने प्रस्तावाऐवजी थेट आपली पाहणी टीम पाठवण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे ग्राम महसूल अधिकारी, कृषी अधिकारी आणि ग्रामसेवकांनी स्वतः शेतावर जाऊन अचूक पंचनामे करावेत, त्यावर शेतकऱ्याची सही घ्यावी असे निर्देश देण्यात आले आहेत. (Chandrashekhar Bawankule Akola Drought)
बँक व सावकारांच्या तगाद्यावर बंदी:
कर्जाचा हप्ता थकला तरी कोणत्याही बँकेने किंवा खाजगी सावकाराने शेतकऱ्यांना त्रास देऊ नये. तसेच खाजगी सावकारांनी शेतकऱ्यांना वेठीस धरू नये.
कर्जमाफी व वारस नोंदींचे काम वेगाने:
ज्या शेतकऱ्यांना कर्जमाफी झाली आहे मात्र वारसांची नोंद न झाल्यामुळे लाभ मिळाला नाही, त्यांच्या वारस नोंदी तातडीने पूर्ण करून घेण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. (Chandrashekhar Bawankule Akola Drought)
उपाययोजनाबाबत अधिकाऱ्यांना सूचना
दुष्काळाच्या परिस्थितीची अकोला जिल्ह्यातील येवता आणि बाळापूर तालुक्यातील मानकी देगाव येथील शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन पाहणी केली. तर पारस येथे लोकांची निवेदने स्वीकारली. आचारसंहिता असल्याने बैठक न घेता यावेळी त्यांनी अधिकाऱ्यांशी चर्चा करत दुष्काळ परिस्थितीत पुढील काळात घ्यावयाची काळजी आणि नियोजन याबाबत सूचना दिल्या. (Chandrashekhar Bawankule Akola Drought)