एकनाथ शिंदेंच्या बदनामीप्रकरणी खासदार नरेश म्हस्केंची पोलिसांत तक्रार

    29-Oct-2026
 
Naresh Mhaske Police Complaint
 
ठाणे (Naresh Mhaske Police Complaint) : प्रदीप पूर्णेकर हत्या प्रकरणाच्या तपासावरून ठाण्यात राजकीय वातावरण तापले असतानाच, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची बदनामी आणि त्याांच्या बाबत आक्षेपार्ह विधान केल्याच्या आरोपावरून शिवसेनेचे खासदार नरेश म्हस्के यांनी बुधवारी नौपाडा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या काही कार्यकर्त्यांविरोधात ही तक्रार करण्यात आली आहे. (Naresh Mhaske Police Complaint)
 
प्रदीप पूर्णेकर यांच्या हत्येचा निषेध करताना या घटनेचा वापर एकनाथ शिंदे यांची बदनामी करण्यासाठी केला जात असल्याचा आरोप म्हस्के यांनी केला. या प्रकरणामागे मोठे राजकीय कटकारस्थान असल्याचाही दावा त्यांनी केला. (Naresh Mhaske Police Complaint) 
 
हत्येच्या तपासाबाबत असमाधान व्यक्त करणे, आरोपींविरोधात कारवाईची मागणी करणे किंवा तपासावर प्रश्न उपस्थित करणे याला शिवसेनेचा विरोध नसल्याचे म्हस्के यांनी स्पष्ट केले. मात्र, हत्येच्या प्रकरणाचा आधार घेऊन पक्षाच्या नेत्याला लक्ष्य करणे सहन केले जाणार नाही, अशी भूमिका त्यांनी मांडली. (Naresh Mhaske Police Complaint)
 
 




संबंधित मजकूर