मीनाक्षी शिंदे यांचा शिवसेना महिला आघाडी जिल्हाप्रमुख पदाचा राजीनामा

    29-Oct-2026

Meenakshi Shinde Resigns
 
ठाणे, : (Meenakshi Shinde Resigns)पूर्णेकर हत्याप्रकरणात नाव आल्यानंतर आणि गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या आरोप-प्रत्यारोपानंतर माजी महापौर मीनाक्षी राजेंद्र शिंदे यांनी मोठा निर्णय घेतला आहे.त्यांनी ठाणे जिल्हा महिला आघाडी प्रमुख पदाचा राजीनामा उपमुख्यमंत्री आणि शिवसेनेचे मुख्य नेते एकनाथ शिंदे यांच्याकडे सोपवला आहे.
 
राजीनामा पत्रात काय म्हटले -
 
दिनांक २९/१०/२०२६ रोजीच्या पत्रात मीनाक्षी शिंदे यांनी लिहिले आहे की,
 
- "गेल्या काही दिवसांपासून समाजमाध्यमांवर तसेच पक्षपातळीवर माझ्याबाबत सुरू असलेले आरोप-प्रत्यारोप व सर्वपक्षीय एकत्रित येऊन माझ्यावर विविध आरोप करत पक्ष नेतृत्वास अर्थात मुख्य नेते व पालकमंत्री म्हणून आपणास वेठीस धरण्याचे जे षडयंत्र चालू आहे हे पाहून माझ्या मनाला प्रचंड वेदना होत आहेत."
 
- "मी आजवर संपूर्ण निष्ठेने पक्षाचे काम केले. पक्षाला किंवा आपणांस कधीही मान खाली घालावी लागेल, असे कोणतेही कृत्य केले नाही. तरीही, ज्या प्रकरणांशी माझा काहीही संबंध नाही, त्यामध्ये माझे नाव जोडून आपल्यावर आणि पक्षावर दबाव निर्माण केला जात आहे, हे पाहून मन व्यथित होते."(Meenakshi Shinde Resigns)
 
- "ज्या नेतृत्वाचा सन्मान जपण्यासाठी मी आजवर काम केले, त्याच नेतृत्वाच्या बदनामीचे कारण माझ्यामुळे व्हावे, ही कल्पनाही मला सहन होत नाही. माझी निष्ठा आणि माझ्या कार्याची पावती आरोपांच्या माध्यमातून दिली जात असल्याची भावना मनाला बोचत आहे."
 
- "म्हणूनच, मी ठाणे जिल्हा महिला आघाडी प्रमुख पदाचा राजीनामा आपणाकडे सुपूर्द करीत आहे. हा निर्णय नाराजीतून नव्हे, तर आपल्या नेतृत्वाचा सन्मान आणि पक्षाची प्रतिष्ठा जपण्यासाठी घेतला आहे. माझ्या भावनांची बाजू आपण समजून घ्याल, ही अपेक्षा."(Meenakshi Shinde Resigns)
 




संबंधित मजकूर