मुंबई(Maharashtra Government AI Initiatives): शासकीय योजनांचा लाभ योग्य लाभार्थ्यांपर्यंत पोहोचविणे, अपात्र लाभार्थ्यांची पडताळणी करणे आणि प्रशासकीय कामकाजातील पारदर्शकता वाढविण्यासाठी महाराष्ट्र सरकारकडून कृत्रिम बुद्धिमत्ता (एआय) आणि एकात्मिक डिजिटल प्रणालींचा वापर वाढविण्यात येणार आहे. महाआयडी, महासारथी आणि महाडीबीटी या प्रणालींच्या माध्यमातून विविध विभागांतील माहिती एकत्रित करून योजनांच्या अंमलबजावणीवर लक्ष ठेवण्यासह त्यांच्या परिणामकारकतेचे मूल्यमापन केले जाणार आहे. (Maharashtra Government AI Initiatives)
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली सह्याद्री अतिथीगृह येथे झालेल्या बैठकीत विविध डिजिटल उपक्रमांचा आढावा घेण्यात आला. यावेळी ‘महाइंडस’ या सुरक्षित एआय प्लॅटफॉर्मसह महाडीबीटी २.०, आपले सरकार २.० आणि मैत्री पोर्टलवरील नवीन सेवांचा शुभारंभ करण्यात आला. (Maharashtra Government AI Initiatives)
या बैठकीला मत्स्यव्यवसाय मंत्री नितेश राणे, राज्य सेवा हक्क आयोगाचे मुख्य आयुक्त मनू कुमार श्रीवास्तव, मुख्य सचिव राजेश अग्रवाल, इलेक्ट्रॉनिक्स, माहिती तंत्रज्ञान व कृत्रिम बुद्धिमत्ता विभागाचे सचिव विरेंद्र सिंह यांच्यासह विविध विभागांचे वरिष्ठ अधिकारी, विभागीय आयुक्त आणि जिल्हाधिकारी उपस्थित होते. (Maharashtra Government AI Initiatives)
शासकीय योजनांचा निधी योग्य व्यक्तींपर्यंत पोहोचतो की नाही, याची पडताळणी करण्यासाठी विविध विभागांतील माहितीचे एकत्रीकरण महत्त्वाचे ठरणार आहे. महासारथी प्रणालीमध्ये विविध विभागांचे माहिती तंत्रज्ञानाधारित एकत्रीकरण केल्यास माहिती सातत्याने अद्ययावत ठेवता येईल. त्यामुळे लाभार्थ्यांची पात्रता तपासणे, अपात्र लाभार्थ्यांची ओळख पटविणे आणि योजनांमधून प्रत्यक्षात काय साध्य झाले, याचे मूल्यमापन करणे अधिक सुलभ होणार आहे. (Maharashtra Government AI Initiatives)
महाआयडीच्या माध्यमातून नागरिकांची माहिती एकत्रित करण्याबरोबरच शासकीय यंत्रणेची कार्यक्षमता आणि उत्तरदायित्व वाढविण्याचा प्रयत्न आहे. शासन निर्णयांमधून आवश्यक माहिती शोधणे, पत्रव्यवहाराचे व्यवस्थापन करणे आणि कार्यालयीन कामकाज सुलभ करणे यासाठीही डिजिटल प्रणालींचा वापर केला जाणार आहे. (Maharashtra Government AI Initiatives)
‘सर्वम एआय’च्या सहकार्याने विकसित करण्यात आलेल्या ‘महाइंडस’ या सुरक्षित एआय प्लॅटफॉर्मचे उद्घाटन मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते करण्यात आले. या प्रणालीद्वारे मराठीसह २२ भारतीय भाषांमध्ये मसुदालेखन, भाषांतर, सारांश तयार करणे आणि माहितीचे विश्लेषण करणे शक्य होणार आहे. शासकीय माहिती देशाबाहेर जाणार नाही किंवा एआय मॉडेलच्या प्रशिक्षणासाठी वापरली जाणार नाही, अशी व्यवस्था या प्लॅटफॉर्ममध्ये करण्यात आल्याचे शासनाकडून सांगण्यात आले. (Maharashtra Government AI Initiatives)
या प्लॅटफॉर्मवरील ‘जीआर एक्सपर्ट’ सुविधेद्वारे शासन निर्णय शोधणे आणि त्यांतील बदल तपासणे शक्य होईल. ‘ई-मेल समरायझर’मुळे ई-मेलचा सारांश तयार करता येईल, तर ‘आरएफपी बिड इव्हॅल्युएटर’च्या मदतीने निविदांची तुलना आणि मूल्यांकन करता येणार आहे. त्यामुळे प्रशासकीय कामकाजातील वेळ वाचविण्यासह निर्णयप्रक्रिया अधिक सुलभ करण्याचा प्रयत्न आहे. (Maharashtra Government AI Initiatives)
महाआयडीचे प्रायोगिक स्वरूपातील उद्घाटन करण्यात आले असून, आतापर्यंत एक कोटींहून अधिक आयडी तयार झाले आहेत. सर्व विभागांचे अंतर्गत तांत्रिक एकत्रीकरण पूर्ण झाल्यानंतर ही प्रणाली अधिक व्यापक स्वरूपात कार्यान्वित करता येईल. प्रत्येक विभागाने निर्धारित वेळेत आपली जबाबदारी पूर्ण करून पुढील टप्प्याचे नियोजन करावे, असे निर्देश मुख्यमंत्री फडणवीस यांनी दिले. (Maharashtra Government AI Initiatives)
१०९ नव्या सेवांचा डिजिटल विस्तार
महाडीबीटी २.० पोर्टलवर मत्स्यव्यवसाय विभागाच्या २४, कामगार विभागाच्या १० आणि महिला व बालविकास विभागाच्या दोन अशा एकूण ३६ नवीन योजनांचा प्रारंभ करण्यात आला. आपले सरकार २.० पोर्टलवर परिवहन विभागाच्या ६१ सेवांसह विविध विभागांच्या एकूण ७१ सेवा सुरू करण्यात आल्या आहेत. तसेच मैत्री पोर्टलवर वैधमापनशास्त्र विभागाच्या १३ नवीन सेवांचा समावेश करण्यात आला आहे. (Maharashtra Government AI Initiatives)
मूळची अहिल्यानगर येथील. 'राज्यशास्त्र' विषयातील पदवी. रानडे इन्स्टिट्यूट मधून (सा.फु.पुणे विद्यापीठ) 'एमजेएमसी' विषयात पदव्युत्तर शिक्षण. २०१९मध्ये मुंबई तरुण भारतमध्ये 'मंत्रालय प्रतिनिधी' या पदावर रुजू. सद्यस्थितीत 'इन्फ्रास्ट्रक्चर आणि डेव्हलपमेंट' विशेष प्रतिनिधी म्हणून कार्यरत. राज्यातील पायाभूत सुविधांविषयी फिल्ड रिपोर्ट आणि लेखनात रस.