मत्स्यव्यवसायाच्या २४ योजनांसाठी आता ऑनलाइन अर्ज!

महाडीबीटी २.० प्रणालीचा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते शुभारंभ

MahaDBT 2.0 Fisheries Schemes
 
मुंबई, : (MahaDBT 2.0 Fisheries Schemes)मच्छीमार, मत्स्यशेतकरी आणि मत्स्यव्यावसायिकांसाठी राज्य शासनाने डिजिटल सेवेचे नवे दालन खुले केले आहे. मत्स्यव्यवसाय विभागाच्या २४ लाभार्थीभिमुख योजनांसाठी आता महाडीबीटी २.० प्रणालीद्वारे ऑनलाइन अर्ज करता येणार आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते आणि मत्स्यव्यवसाय व बंदरे मंत्री नितेश राणे यांच्या उपस्थितीत बुधवार, दि. २८ ऑक्टोबर रोजी सह्याद्री अतिथिगृह येथे या सुविधेचा शुभारंभ करण्यात आला.
 
मुख्यमंत्री मत्स्यसंपदा योजनेअंतर्गत सुरू करण्यात आलेल्या या सुविधेमुळे मच्छीमार, मत्स्यशेतकरी, मत्स्यव्यावसायिक आणि मच्छीमार संस्थांना योजनांसाठी घरबसल्या अर्ज करता येणार आहेत. यामुळे कार्यालयांमध्ये वारंवार जाण्याची गरज कमी होऊन अर्ज प्रक्रिया अधिक सुलभ, पारदर्शक आणि गतिमान होण्यास मदत होणार आहे.(MahaDBT 2.0 Fisheries Schemes)
 
शासन प्रक्रिया पुनर्रचनेअंतर्गत मत्स्यव्यवसाय विभागाच्या योजनांची अंमलबजावणी अधिक कार्यक्षम करण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे. ऑनलाइन प्रणालीमुळे अनावश्यक कागदपत्रांची मागणी कमी होणार असून, उपलब्ध शासकीय माहितीच्या आधारे आवश्यक तपशील मिळविणे आणि प्रमाणपत्रे ऑनलाइन उपलब्ध करून देणे शक्य होणार आहे.
 
योजनेच्या लाभार्थ्यांना मंजूर अनुदान आधार-संलग्न बँक खात्यात थेट जमा करण्याची सुविधाही उपलब्ध होणार आहे. त्यामुळे प्रशासकीय प्रक्रियेतील अडथळे कमी करून पात्र लाभार्थ्यांपर्यंत योजनांचा लाभ अधिक प्रभावीपणे पोहोचविण्याचा शासनाचा प्रयत्न आहे. डिजिटल तंत्रज्ञानाच्या माध्यमातून मत्स्यव्यवसाय क्षेत्रातील लाभार्थ्यांना सुलभ सेवा उपलब्ध करून देणे, अर्ज प्रक्रियेत पारदर्शकता वाढविणे आणि योजनांच्या अंमलबजावणीला गती देणे, हा या उपक्रमाचा प्रमुख उद्देश आहे.(MahaDBT 2.0 Fisheries Schemes)
 
 




गायत्री श्रीगोंदेकर

मूळची अहिल्यानगर येथील. 'राज्यशास्त्र' विषयातील पदवी. रानडे इन्स्टिट्यूट मधून (सा.फु.पुणे विद्यापीठ) 'एमजेएमसी' विषयात पदव्युत्तर शिक्षण. २०१९मध्ये मुंबई तरुण भारतमध्ये 'मंत्रालय प्रतिनिधी' या पदावर रुजू. सद्यस्थितीत 'इन्फ्रास्ट्रक्चर आणि डेव्हलपमेंट' विशेष प्रतिनिधी म्हणून कार्यरत. राज्यातील पायाभूत सुविधांविषयी फिल्ड रिपोर्ट आणि लेखनात रस.
संबंधित मजकूर