जेरुसलेम (Israel Election Results 2026) : इस्रायलच्या सार्वत्रिक निवडणुकीत ९३ टक्के निवडणूक केंद्रावर जवळपास ८५ टक्के मतमोजणी पुर्ण झालेली आसून अद्याप कोणत्याही प्रमुख राजकीय गटाला स्पष्ट बहुमत मिळताना दिसत नाही. पंतप्रधान बेंजामिन नेतान्याहू यांच्या नेतृत्वाखालील गटाला ५३ जागा मिळण्याचा अंदाज असून, आयझेनकोट यांच्या नेतृत्वाखालील विरोधी गटाला ४८ जागा मिळण्याची शक्यता आहे. तर अरब पक्षांना एकत्रितपणे १९ जागा मिळण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. इस्रायलच्या १२० सदस्यीय संसदेत बहुमतासाठी ६१ जागांची आवश्यकता आहे. त्यामुळे सरकार स्थापन करण्यासाठी राजकीय पक्षांना इतर पक्षांचा पाठिंबा मिळवावा लागणार आहे.
नेतान्याहू बहुमतापासून आठ जागा दूर
मतमोजणीच्या उपलब्ध आकडेवारीनुसार, नेतान्याहू यांच्या गटाला बहुमतासाठी आवश्यक असलेल्या ६१ जागांपेक्षा आठ जागा कमी पडत आहेत. दुसरीकडे, आयझेनकोट यांच्या नेतृत्वाखालील विरोधी गटालाही स्वबळावर सरकार स्थापन करता येणार नाही. त्यामुळे सरकार स्थापनेसाठी कोणत्या पक्षांना एकत्र आणले जाते, यावर इस्रायलचे पुढील राजकीय चित्र अवलंबून असेल. (Israel Election Results 2026)
अरब पक्षांनी मिळवलेल्या १९ जागांमुळे सरकार स्थापनेच्या चर्चेत त्यांची भूमिका महत्त्वाची ठरू शकते. मात्र, विरोधी गटातील सर्व पक्ष अरब पक्षांशी आघाडी करण्यास तयार आहेत का, हा प्रश्न अद्याप कायम आहे. (Israel Election Results 2026)
मतमोजणी अद्याप सुरू
इस्रायलच्या केंद्रीय निवडणूक समितीने नियमित मतदान केंद्रांवरील मतमोजणीचा मोठा टप्पा पूर्ण केला आहे. मात्र, सैनिक, राजनैतिक अधिकारी आणि नेमून दिलेल्या मतदान केंद्राबाहेर मतदान केलेल्या काही पात्र मतदारांच्या दुहेरी लिफाफ्यातील मतांची मोजणी बाकी आहे. या मतांमुळे अंतिम जागावाटपात बदल होण्याची शक्यता आहे. (Israel Election Results 2026)
निवडणुकीतील सुरुवातीच्या एक्झिट पोलमध्ये विरोधी गटाला आघाडी मिळण्याचा अंदाज वर्तवण्यात आला होता. मात्र, मतमोजणी पुढे सरकल्यानंतर नेतान्याहू यांच्या गटाने आघाडी घेतल्याचे चित्र समोर आले. तरीही, अंतिम निकाल जाहीर होईपर्यंत सध्याचे आकडे तात्पुरतेच मानले जातील.
बहुमत न मिळाल्यास काय होणार?
इस्रायलच्या निवडणूक पद्धतीनुसार, सरकार स्थापन करण्यासाठी एखाद्या पक्षाला किंवा आघाडीला किमान ६१ सदस्यांचा पाठिंबा आवश्यक असतो. (Israel Election Results 2026)
जर कोणत्याही नेत्याला सरकार स्थापन करण्यासाठी आवश्यक पाठिंबा मिळवता आला नाही, तर देशात पुन्हा निवडणूक होण्याची शक्यता निर्माण होऊ शकते. तोपर्यंत नेतान्याहू काळजीवाहू पंतप्रधान म्हणून दैनंदिन सरकारी कामकाज सांभाळू शकतात. मात्र, सरकार स्थापनेच्या वाटाघाटी किती काळ चालतील, हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. (Israel Election Results 2026)
विरोधी गटाला अरब पक्षांच्या पाठिंब्याची अपेक्षा
डेमोक्रॅट्स पक्षाचे नेते यायर गोलान यांनी आयझेनकोट यांच्या नेतृत्वाखालील विरोधी गटाने अरब पक्षांशी एकत्र येऊन बहुमताचा आकडा गाठण्याचा प्रयत्न करावा, असे आवाहन केले आहे. मात्र, या प्रस्तावाला विरोधी गटातील सर्व पक्षांचा पाठिंबा मिळेल का, हे अद्याप स्पष्ट झालेले नाही.
एकूणच, इस्रायलच्या निवडणुकीत कोणत्याही गटाला स्पष्ट बहुमत न मिळाल्याने सरकार स्थापनेचा पेच निर्माण झाला आहे. आता अंतिम मतमोजणीनंतर जागांचे चित्र किती बदलते आणि कोणते पक्ष एकत्र येऊन सरकार स्थापन करतात, याकडे संपूर्ण जगाचे लक्ष लागले आहे. (Israel Election Results 2026)
Hello, You must be familiar with the Nation First approach daily 'Mumbai Tarun Bharat' as a newspaper committed to fearless and nationalist ideals and constantly doing conscious journalism for it. The journey of four decades has been successful only because of your trust and cooperation. Dear readers, we have been making a successful effort to always be perfect in our commitment to the thoughts of the nation and the national interest...
Changing with time is essential for any organization. Daily 'Mumbai Tarun Bharat' has decided to take this role here too and make 'MahaMTB' available in the media for the new 'smart' generation. Today's youth, readers, and citizens are becoming more and more 'smart' day by day. And in today's 'smart' era, information is available in abundance in the Internet-enabled information explosion. However, there is a need for complementary knowledge to determine a modern role and approach that is compatible with culture, motionlessness and tradition.
That is why mahamtb.com, MahaMTB Mobile App', MahaMTB Youtube Channel, MahaMTB Facebook Page, MahaMTB Twitter, MahaMTB Instagram, MahaMTB Telegram, MahaMTB WhatsApp Group etc. through social media and advanced avatar content. We are coming before you. Role in the new era, 'smart' journalism with a view, 'smart' multimedia for the new era, and journalism for a 'smart' Maharashtra will be the side of the game.