देशभरात काँग्रेसचा सुपडा साफ! बॅलेट पेपरवरील निवडणुकीतही चार राज्यांत शून्य जागा!







 
MLC Election Results 2026
 
मुंबई (MLC Election Results 2026 ) : देशातील महाराष्ट्र, उत्तर प्रदेश, कर्नाटक आणि बिहार या चार राज्यांतील विधान परिषद निवडणुकांच्या निकालांमुळे काँग्रेसला मोठा धक्का बसला आहे. या निवडणुकांमध्ये काँग्रेसला एकाही जागेवर विजय मिळवता आलेला नाही. विशेष म्हणजे, कर्नाटकात काँग्रेसचे सरकार असतानाही पक्षाला खाते उघडता आले नाही. त्यामुळे काँग्रेसच्या निवडणूक रणनीतीवर प्रश्न उपस्थित केले जात आहेत.
 

काँग्रेसकडून सातत्याने ईव्हीएमच्या विश्वासार्हतेवर प्रश्न उपस्थित केले जातात आणि बॅलेट पेपरवर निवडणुका घेण्याची मागणी केली जाते. मात्र, बॅलेट पेपरवर झालेल्या या विधान परिषद निवडणुकांमध्येही काँग्रेसला पराभवाचा सामना करावा लागला आहे. (MLC Election Results 2026 )
 

काँग्रेसने लढवलेल्या १२ जागांवर पराभव
 

चार राज्यांतील विधान परिषद निवडणुकांमध्ये काँग्रेसने एकूण १२ जागांवर उमेदवार उभे केले होते. मात्र, या सर्व जागांवर पक्षाला पराभव पत्करावा लागल्याचा दावा करण्यात येत आहे. उत्तर प्रदेशात काँग्रेसने ११ जागांपैकी एकाही जागेवर उमेदवार उभा केला नव्हता. (MLC Election Results 2026 )
 

कर्नाटकात काँग्रेसची सत्ता असूनही पक्षाला एकही जागा जिंकता आली नाही. याउलट, भाजपने तीन जागांवर विजय मिळवला, तर मित्रपक्ष जनता दल (सेक्युलर) अर्थात जेडी(एस)ने एका जागेवर विजय मिळवला.
 

महाराष्ट्रातही काँग्रेसची निराशा?
 

महाराष्ट्रात काँग्रेसने तीन जागांवर निवडणूक लढवली होती. मतमोजणीच्या टप्प्यात काँग्रेसचे उमेदवार पिछाडीवर असल्याचे वृत्त होते. मात्र, या जागांचे अंतिम निकाल स्पष्ट झाल्यानंतरच काँग्रेसच्या कामगिरीचे चित्र निश्चित होणार आहे. (MLC Election Results 2026 )
 

बिहारमध्येही काँग्रेसला अपयश
 

बिहारमध्ये काँग्रेसने पाच जागांवर निवडणूक लढवली होती. मात्र, पक्षाला येथेही अपेक्षित यश मिळाले नसल्याचे वृत्त आहे. चार राज्यांतील निवडणुकांमध्ये काँग्रेसला एकाही जागेवर विजय मिळवता न आल्यास पक्षाच्या संघटनात्मक ताकदीवर आणि निवडणूक रणनीतीवर चर्चा होण्याची शक्यता आहे.
 

एकूणच, बॅलेट पेपरवर झालेल्या विधान परिषद निवडणुकांमध्ये काँग्रेसला अपेक्षित यश मिळालेले नाही. विशेषतः कर्नाटकातील पराभव पक्षासाठी राजकीयदृष्ट्या महत्त्वाचा मानला जात आहे. (MLC Election Results 2026 )
 

 





मुंबई तरुण भारत वेब टीम

Hello, You must be familiar with the Nation First approach daily 'Mumbai Tarun Bharat' as a newspaper committed to fearless and nationalist ideals and constantly doing conscious journalism for it. The journey of four decades has been successful only because of your trust and cooperation. Dear readers, we have been making a successful effort to always be perfect in our commitment to the thoughts of the nation and the national interest...
 
Changing with time is essential for any organization. Daily 'Mumbai Tarun Bharat' has decided to take this role here too and make 'MahaMTB' available in the media for the new 'smart' generation. Today's youth, readers, and citizens are becoming more and more 'smart' day by day. And in today's 'smart' era, information is available in abundance in the Internet-enabled information explosion. However, there is a need for complementary knowledge to determine a modern role and approach that is compatible with culture, motionlessness and tradition.
 
That is why mahamtb.com, MahaMTB Mobile App', MahaMTB Youtube Channel, MahaMTB Facebook Page, MahaMTB Twitter, MahaMTB Instagram, MahaMTB Telegram, MahaMTB WhatsApp Group etc. through social media and advanced avatar content. We are coming before you. Role in the new era, 'smart' journalism with a view, 'smart' multimedia for the new era, and journalism for a 'smart' Maharashtra will be the side of the game.
 
Now get all the updates in one click! mahamtb.com
संबंधित मजकूर