एसटी कर्मचाऱ्यांच्या वेतनासाठी ३९१ कोटी मंजूर! दिवाळीपूर्वी वेतनाचा मार्ग मोकळा

 
MSRTC Employees Salary
 
मुंबई (MSRTC Employees Salary): एसटी महामंडळाच्या सुमारे ८३ हजार अधिकारी व कर्मचाऱ्यांना दिवाळीपूर्वी वेतन देण्यासाठी महाराष्ट्र शासनाने सप्टेंबर २०२६ मधील प्रवासी सवलतींच्या प्रतिपूर्तीपोटी ३९१.०२ कोटी रुपयांचा निधी मंजूर केला आहे. परिवहन मंत्री तथा एसटी महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांच्या पाठपुराव्यामुळे हा निर्णय घेण्यात आला. यासंदर्भातील शासन निर्णय दि. २७ ऑक्टोबर रोजी निर्गमित झाला. (MSRTC Employees Salary)
यंदा ६ नोव्हेंबरपासून दिवाळी सुरू होत असल्याने कर्मचाऱ्यांना सणापूर्वी वेतन मिळावे, यासाठी मंत्री सरनाईक यांनी एसटी प्रशासनाला तातडीने कार्यवाहीचे निर्देश दिले होते. शासनाकडून निधी उपलब्ध झाल्याने वेतन वितरणाचा मार्ग मोकळा झाला आहे. (MSRTC Employees Salary)
महिला सन्मान योजना, ज्येष्ठ नागरिकांसह विविध प्रवासी सवलतींच्या प्रतिपूर्तीपोटी मिळणारा निधी एसटी महामंडळाच्या आर्थिक नियोजनासाठी महत्त्वाचा आहे. कर्मचाऱ्यांना दिवाळीपूर्वी वेतन मिळावे आणि त्यांच्या कुटुंबीयांचा सण आनंदात साजरा व्हावा, यासाठी शासनाने महत्त्वपूर्ण निर्णय घेतल्याचे मंत्री सरनाईक यांनी सांगितले. आता एसटी प्रशासनाने वेतन वितरणाची प्रक्रिया तातडीने पूर्ण करावी, असे निर्देशही त्यांनी दिले. (MSRTC Employees Salary)
 




गायत्री श्रीगोंदेकर

मूळची अहिल्यानगर येथील. 'राज्यशास्त्र' विषयातील पदवी. रानडे इन्स्टिट्यूट मधून (सा.फु.पुणे विद्यापीठ) 'एमजेएमसी' विषयात पदव्युत्तर शिक्षण. २०१९मध्ये मुंबई तरुण भारतमध्ये 'मंत्रालय प्रतिनिधी' या पदावर रुजू. सद्यस्थितीत 'इन्फ्रास्ट्रक्चर आणि डेव्हलपमेंट' विशेष प्रतिनिधी म्हणून कार्यरत. राज्यातील पायाभूत सुविधांविषयी फिल्ड रिपोर्ट आणि लेखनात रस.
संबंधित मजकूर