मुंबई : राज्यातील दुष्काळग्रस्तांना मदत करण्यासाठी लावणी कलाकारांनी मुख्यमंत्री सहाय्यता निधीमध्ये एक लाख रुपयांचा निधी दिला असून, या रकमेचा धनादेश सांस्कृतिक कार्य मंत्री ॲड. आशिष शेलार यांच्याकडे सुपूर्द करण्यात आला. सांस्कृतिक कार्य विभागाचे सचिव डॉ. किरण कुलकर्णी आणि पु. ल. देशपांडे महाराष्ट्र कला अकादमीच्या संचालक मीनल जोगळेकर यांनी हा धनादेश मंत्री आशिष शेलार यांच्याकडे सुपूर्द केला. (Lavani Artists Donation)
पु. ल. देशपांडे महाराष्ट्र कला अकादमीची नाट्यगृहे सांस्कृतिक कार्यक्रमांच्या आयोजनासाठी विनामूल्य उपलब्ध करून देण्यात येत आहेत. या माध्यमातून विविध कलाकार आणि सांस्कृतिक संस्था कार्यक्रमांचे आयोजन करून मुख्यमंत्री सहाय्यता निधीसाठी योगदान देत आहेत. कलाकारांच्या कलागुणांना सामाजिक कार्याची जोड देत दुष्काळग्रस्तांच्या मदतीसाठी योगदान देण्याची संधी या उपक्रमातून उपलब्ध झाली आहे. (Lavani Artists Donation)
मंत्री ॲड. आशिष शेलार यांनी ५ ऑक्टोबर रोजी आयोजित बैठकीत कलाकार आणि सांस्कृतिक संस्थांना कार्यक्रमांच्या माध्यमातून मुख्यमंत्री सहाय्यता निधीसाठी योगदान देण्याचे आवाहन केले होते. या आवाहनाला सकारात्मक प्रतिसाद देत पु. ल. देशपांडे महाराष्ट्र कला अकादमीने उपलब्ध तारखांनुसार नाट्यगृहे विनामूल्य उपलब्ध करून देण्याचा निर्णय घेतला आहे. हा उपक्रम तूर्तास ३१ मार्च २०२७ पर्यंत राबविण्यात येणार आहे. (Lavani Artists Donation)
विज्ञान शाखेतील पदवीनंतर भारतीय जनसंचार संस्थान (IIMC) अमरावतीतून पत्रकारितेचे पदव्युत्तर शिक्षण. 'दै. मुंबई तरुण भारत'मध्ये वेब उपसंपादक या पदावर कार्यरत. शेती, साहित्य, राजकारण या विषयात विशेष रस. हस्तकला, संगीत आणि कविता लेखनाचा छंद....