फिनोलेक्स केबल्सने लाँच केली मॅग्नेक्स 7.5 kA स्विचगियर रेंज; FMEG पोर्टफोलिओ झाला अधिक मजबूत

MCB आणि आयसोलेटर्सची नवी रेंज, जी विश्वासार्ह कामगिरी आणि सर्किट सुरक्षेला आधुनिक डिझाइनची जोड देते

    27-Oct-2026
 
 
Finolex Magnex 7.5 kA Switchgear
 
मुंबई (Finolex Magnex 7.5 kA Switchgear): फिनोलेक्स केबल्स लिमिटेडने आज आपल्या मॅग्नेक्स 7.5 kA स्विचगियर फॅमिलीच्या लाँचची घोषणा केली. निवासी आणि व्यावसायिक वापरासाठीच्या सर्किट प्रोटेक्शन उत्पादनांच्या या नव्या रेंजमुळे कंपनीच्या फास्ट-मूव्हिंग इलेक्ट्रिकल गुड्स (FMEG) पोर्टफोलिओचा विस्तार झाला आहे. इलेक्ट्रिकल उद्योगातील फिनोलेक्सच्या प्रदीर्घ अनुभवावर आधारित ही रेंज आजच्या ग्राहकांच्या बदलत्या गरजा पूर्ण करण्यासाठी तयार करण्यात आली आहे.
 
मॅग्नेक्स फॅमिलीमध्ये मिनिएचर सर्किट ब्रेकर्स (MCB), आयसोलेटर्स आणि डिस्ट्रिब्यूशन बॉक्सेसचा समावेश आहे. कंपनी अ‍ॅक्सेसरीजची नवी रेंजही सादर करत आहे, ज्यात MCB चेंजओव्हर स्विच आणि रोटरी सिलेक्टर स्विच यांचा समावेश आहे.
 
या प्रसंगी फिनोलेक्स केबल्स लिमिटेड चे मुख्य कार्यकारी अधिकारी  महेश विश्वनाथन,  म्हणाले, “आमची मॅग्नेक्स 7.5 kA स्विचगियर रेंज तांत्रिक नावीन्य आणि ग्राहक-केंद्री उपायांप्रतीची आमची सततची बांधिलकी दर्शवते. विजेच्या गरजा बदलत असताना, विश्वासार्ह सुरक्षा, कामगिरी आणि सौंदर्य या तिन्हींचा मेळ घालणारी उत्पादने ग्राहक अधिकाधिक शोधत आहेत. मॅग्नेक्सच्या माध्यमातून ग्राहकांना सुरक्षेसोबतच अधिक आत्मविश्वास देण्याचे आमचे उद्दिष्ट आहे, तसेच गुणवत्ता आणि उत्कृष्टतेप्रतीची आमची बांधिलकी अधिक दृढ करायची आहे. विश्वासार्ह आणि नावीन्यपूर्ण इलेक्ट्रिकल उपायांद्वारे आधुनिक जीवनशैलीचे भविष्य घडवण्याच्या आमच्या प्रवासातील हे आणखी एक पाऊल आहे.”  (Finolex Magnex 7.5 kA Switchgear)
 
फिनोलेक्सने 2016 मध्ये स्विचगियर सेगमेंटमध्ये प्रवेश केला. उत्पादने रुडकी येथील कंपनीच्या अत्याधुनिक प्लांटमध्ये तयार केली जातात. नवी मॅग्नेक्स 7.5 kA फॅमिली 6 kA आणि 10 kA उत्पादनांमधील दरी भरून काढते आणि रिटेल ग्राहकांना अधिक ब्रेकिंग कॅपॅसिटी, सुधारित संरक्षण आणि अधिक मूल्य देते.  (Finolex Magnex 7.5 kA Switchgear)
 
ही रेंज विश्वासार्ह कॉन्टॅक्ट कामगिरीसाठी कॉपर + सिल्व्हर-इनले कॉन्टॅक्ट्स, ओव्हरलोड आणि शॉर्ट-सर्किटला प्रतिसाद देण्यासाठी थर्मल प्लस मॅग्नेटिक ट्रिपिंग, सुरक्षित हाताळणीसाठी फिंगर-सेफ टर्मिनल डिझाइन, विश्वासार्ह सेवा आयुष्यासाठी उच्च एन्ड्युरन्स आणि इन्स्टॉलेशनमध्ये लवचिकतेसाठी रिव्हर्सिबल लाइन/लोड टर्मिनल्ससह तयार करण्यात आली आहे.  (Finolex Magnex 7.5 kA Switchgear)
 
या लाँचबद्दल बोलताना फिनोलेक्स केबल्स लिमिटेडचे श्री. अमित माथुर, प्रेसिडेंट – सेल्स अँड मार्केटिंग म्हणाले, “ मॅग्नेक्स 7.5 kA फॅमिली ग्राहकांच्या बदलत्या गरजा पूर्ण करणारे इलेक्ट्रिकल उपाय विकसित करण्याच्या आमच्या बांधिलकीचे प्रतिबिंब आहे. विश्वासार्ह संरक्षण, उच्च कामगिरी आणि आधुनिक डिझाइन स्पर्धात्मक किमतीत एकत्र देऊन आम्ही आमचा FMEG पोर्टफोलिओ बळकट करू इच्छितो आणि आमच्या 5,000 चॅनल पार्टनर्स आणि 2,15,000 हून अधिक रिटेलर्सच्या विस्तृत नेटवर्कचा लाभ घेत ग्राहकांच्या मोठ्या वर्गापर्यंत पोहोचू इच्छितो.”  (Finolex Magnex 7.5 kA Switchgear)
 
या रेंजची ऑप्टिमाइझ्ड ब्रेकिंग कॅपॅसिटी 7.5 kA आहे, जी IEC 60898-1 आणि IS/IEC 60898-1 नुसार आहे. यामुळे MCB आपल्या निर्दिष्ट रेटिंगमधील संभाव्य फॉल्ट करंट सुरक्षितपणे खंडित करू शकतात. एनर्जी लिमिटेशन क्लास 3 शॉर्ट सर्किटदरम्यान लेट-थ्रू एनर्जी मर्यादित ठेवतो, ज्यामुळे केबल्स आणि जोडलेल्या उपकरणांवरील थर्मल आणि मेकॅनिकल ताण कमी होतो. थर्मल आणि मॅग्नेटिक ट्रिपिंग यंत्रणा अनुक्रमे दीर्घकाळ चालणारा ओव्हरलोड आणि शॉर्ट सर्किट यांना प्रतिसाद देतात. इन्स्टॉलर्ससाठी, बायकनेक्ट टर्मिनल्स आणि लाइन-लोड रिव्हर्सिबिलिटीमुळे जलद आणि लवचिक जोडण्या करता येतात, तर लेझर मार्किंगमुळे टिकाऊ ओळख आणि ट्रेसेबिलिटी मिळते. कार्यात्मक डिझाइन आणि व्यावहारिक वैशिष्ट्यांच्या या मिश्रणामुळे ही रेंज निवासी आणि व्यावसायिक इलेक्ट्रिकल इन्स्टॉलेशनसाठी आदर्श ठरते.  (Finolex Magnex 7.5 kA Switchgear)
 
फिनोलेक्स केबल्स लिमिटेडविषयी
 
1958 मध्ये स्थापन झालेली आणि पुणे येथे मुख्यालय असलेली फिनोलेक्स केबल्स ही भारतातील इलेक्ट्रिकल आणि टेलिकम्युनिकेशन केबल्सच्या आघाडीच्या उत्पादकांपैकी एक आहे. कंपनीने FMEG सेगमेंटमध्ये आपली उपस्थिती सातत्याने वाढवली असून तिच्या विविध पोर्टफोलिओमध्ये पंखे, स्विचेस, लाइटिंग उत्पादने, वॉटर हीटर्स, रूम हीटर्स, इस्त्र्या, कंड्युट्स आणि इतर इलेक्ट्रिकल उपायांचा समावेश आहे. उत्पादन क्षमतांमध्ये गुंतवणूक करून, उत्पादन पोर्टफोलिओचा विस्तार करून आणि बदलत्या ग्राहक पसंतीला प्रतिसाद देऊन फिनोलेक्स आधुनिक जीवनशैलीसाठी विश्वासार्ह, विचारपूर्वक डिझाइन केलेल्या आणि स्पर्धात्मक किमतीच्या इलेक्ट्रिकल उत्पादनांसाठी आपली प्रतिष्ठा उंचावत आहे.  (Finolex Magnex 7.5 kA Switchgear)
 
 




संबंधित मजकूर