सहा लाख नागरिकांच्या स्थलांतराची तयारी; ओडिशात ६० बचाव पथके तैनात! चक्रीवादळ ‘अर्णब’चा धोका

 
Cyclone Arnab Andhra Pradesh Odisha
 
मुंबई (Cyclone Arnab Andhra Pradesh Odisha) : बंगालच्या उपसागरात तयार झालेले ‘अर्णब’ चक्रीवादळ आंध्र प्रदेशच्या किनारपट्टीच्या दिशेने सरकत आहे. भारतीय हवामान विभागाच्या अंदाजानुसार, हे चक्रीवादळ दि. २७ ऑक्टोबरपर्यंत अतितीव्र चक्रीवादळात रूपांतरित होण्याची शक्यता असून, दि. २८ ऑक्टोबर रोजी आंध्र प्रदेशच्या किनारपट्टीवर धडकण्याचा अंदाज आहे. यावेळी वाऱ्याचा वेग ताशी ११५ ते १२५ किलोमीटरपर्यंत पोहोचू शकतो, तर वाऱ्याचे झोत ताशी १४० किलोमीटर वेगाने वाहण्याची शक्यता आहे. संभाव्य धोका लक्षात घेऊन आंध्र प्रदेश आणि ओडिशा या दोन्ही राज्यांमध्ये आपत्कालीन तयारीला वेग आला आहे. (Cyclone Arnab Andhra Pradesh Odisha)
 
सहा लाख नागरिकांच्या स्थलांतराची तयारी
 
चक्रीवादळाचा संभाव्य परिणाम लक्षात घेऊन आंध्र प्रदेश प्रशासनाने किनारपट्टीवरील संवेदनशील भागांमधील सुमारे सहा लाख नागरिकांना सुरक्षित ठिकाणी हलवण्यासाठी निवारा केंद्रे आणि आपत्कालीन यंत्रणा सज्ज ठेवण्यात येत आहेत.
 
हवामान विभागाने किनारपट्टीवरील नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे. मच्छीमारांनी समुद्रात जाऊ नये, तसेच नागरिकांनी समुद्रकिनारे आणि धोकादायक ठिकाणी जाणे टाळावे, अशा सूचना प्रशासनाकडून दिल्या जात आहेत. चक्रीवादळाच्या संभाव्य मार्गावरील जिल्ह्यांमध्ये अतिवृष्टी आणि जोरदार वाऱ्यांचा धोका लक्षात घेऊन खबरदारी घेतली जात आहे. (Cyclone Arnab Andhra Pradesh Odisha)

ओडिशामध्ये ६० बचाव पथके तैनात
 
चक्रीवादळाचा परिणाम ओडिशाच्या दक्षिणेकडील किनारपट्टी भागांवरही होण्याची शक्यता आहे. त्यामुळे ओडिशा सरकारने आपत्ती व्यवस्थापन यंत्रणा सतर्क केली आहे. ओडिशा आपत्ती जलद कृती दलाच्या (ODRAF) एकूण ६० पथकांच्या तैनातीची योजना तयार करण्यात आली आहे. (Cyclone Arnab Andhra Pradesh Odisha)
 
याशिवाय, राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दलाशी (NDRF) समन्वय साधण्यात आला आहे. संवेदनशील जिल्ह्यांमध्ये पोलीस आणि आपत्ती व्यवस्थापन पथकांना सतर्क राहण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. आपत्कालीन परिस्थितीचा सामना करण्यासाठी जिल्हा आणि तालुका स्तरावरही तयारी केली जात आहे.
 
२८ ऑक्टोबरला किनारपट्टीवर धडकण्याचा अंदाज
 
हवामान विभागाच्या अंदाजानुसार, ‘अर्णब’ चक्रीवादळ दि. २८ ऑक्टोबर रोजी आंध्र प्रदेशच्या किनारपट्टीवर धडकण्याची शक्यता आहे. या काळात किनारपट्टीवरील काही भागांत अतिवृष्टी, जोरदार वारे आणि समुद्रात उंच लाटा निर्माण होऊ शकतात. त्यामुळे नागरिकांनी प्रशासनाच्या सूचनांचे पालन करावे आणि अफवांवर विश्वास ठेवू नये, असे आवाहन करण्यात आले आहे. (Cyclone Arnab Andhra Pradesh Odisha)
 
चक्रीवादळाचा संभाव्य मार्ग आणि तीव्रता लक्षात घेता पुढील काही दिवस आंध्र प्रदेश आणि ओडिशासाठी महत्त्वाचे ठरणार आहेत. जीवितहानी आणि मालमत्तेचे नुकसान टाळण्यासाठी दोन्ही राज्यांतील प्रशासनाकडून आवश्यक खबरदारी घेतली जात आहे. (Cyclone Arnab Andhra Pradesh Odisha)
 
 




मुंबई तरुण भारत वेब टीम

Hello, You must be familiar with the Nation First approach daily 'Mumbai Tarun Bharat' as a newspaper committed to fearless and nationalist ideals and constantly doing conscious journalism for it. The journey of four decades has been successful only because of your trust and cooperation. Dear readers, we have been making a successful effort to always be perfect in our commitment to the thoughts of the nation and the national interest...
 
Changing with time is essential for any organization. Daily 'Mumbai Tarun Bharat' has decided to take this role here too and make 'MahaMTB' available in the media for the new 'smart' generation. Today's youth, readers, and citizens are becoming more and more 'smart' day by day. And in today's 'smart' era, information is available in abundance in the Internet-enabled information explosion. However, there is a need for complementary knowledge to determine a modern role and approach that is compatible with culture, motionlessness and tradition.
 
That is why mahamtb.com, MahaMTB Mobile App', MahaMTB Youtube Channel, MahaMTB Facebook Page, MahaMTB Twitter, MahaMTB Instagram, MahaMTB Telegram, MahaMTB WhatsApp Group etc. through social media and advanced avatar content. We are coming before you. Role in the new era, 'smart' journalism with a view, 'smart' multimedia for the new era, and journalism for a 'smart' Maharashtra will be the side of the game.
 
Now get all the updates in one click! mahamtb.com
संबंधित मजकूर