भारतात कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाल्याचा खोटा आरोप; विरोधकांना मुख्यमंत्री फडणवीसांचे प्रत्युत्तर...

    26-Oct-2026
 
Devendra Fadnavis Hits Back at Opposition
 
ठाणे (Devendra Fadnavis Hits Back at Opposition): नवी मुंबईतील कार्यक्रमानंतर पत्रकरांशी बोलताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विरोधकांनी चालवलेल्या फेक नरेटिव्ह चा पर्दाफाश केला.यासह त्यांनी विविध प्रश्नांना उत्तरे देत विरोधकांच्या प्रत्येक आरोपांचे खंडन केले. महाराष्ट्रातील चांगली कायदा-सुव्यवस्था हेच राज्यात मोठ्या प्रमाणावर गुंतवणूक येण्याचे प्रमुख कारण आहे. असे प्रत्युत्तर भारतात कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाल्याचा खोटा आरोप करणार्‍यांना दिले. (Devendra Fadnavis Hits Back at Opposition)
 
देशातील ४० टक्के परकीय गुंतवणूक (एफडीआय) थेट महाराष्ट्रात येते, तसेच राज्य स्टार्टअप, युनिकॉर्न आणि फिनटेक क्षेत्रांचे केंद्र बनले आहे, याकडे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी लक्ष वेधले. राज्यात गंभीर घटना घडत असल्या, तरी त्यावर महाराष्ट्र पोलीस वेगाने कारवाई करतात, हे महत्त्वाचे असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.  (Devendra Fadnavis Hits Back at Opposition)
 
यावेळी पाकिस्तानचे गुणगान करणाऱ्यांवर टीका करताना, पाकिस्तानमध्ये लोकांना खाण्याचेही वांदे आहेत, असा टोला त्यांनी लगावला. जम्मू-काश्मीर भारतात असल्याने तेथील जनता सुरक्षित असून तिला समृद्धी आणि सन्मान मिळत आहे. त्यामुळे पाकव्याप्त काश्मीरमधील नागरिक भारतात येण्यास इच्छुक आहेत, असे विधान करून फडणवीसांनी पाक प्रेमींना जोरदार टोला लगावला.  (Devendra Fadnavis Hits Back at Opposition)
 
कायदा सुव्यवस्था वरून विरोधकांना सुनावले
 
महाराष्ट्रात कायदा-सुव्यवस्थेची स्थिती चांगली असल्याने राज्यात मोठ्या प्रमाणावर उद्योग आणि गुंतवणूक येत आहे. देशातील ४० टक्के थेट परकीय गुंतवणूक (एफडीआय) महाराष्ट्रात का येते, तसेच राज्य स्टार्टअप, युनिकॉर्न आणि फिनटेक क्षेत्रांचे केंद्र का बनले आहे, याचे कारण येथील कायदा-सुव्यवस्था आहे, असे प्रतिपादन त्यांनी केले.  (Devendra Fadnavis Hits Back at Opposition)
 
राज्यात गंभीर घटना घडतात, हे नाकारता येणार नाही; मात्र अशा घटनांनंतर महाराष्ट्र पोलीस ज्या वेगाने कारवाई करतात, ते महत्त्वाचे आहे, असेही ते म्हणाले. 
(Devendra Fadnavis Hits Back at Opposition)
 
 




संबंधित मजकूर