“हे देश नीच आणि किळसवाणे!” डोनाल्ड ट्रम्प यांचा 'या' चार देशांवर संताप!

 
Donald Trump Immigration Controversy
 
वॉशिंग्टन (Donald Trump Immigration Controversy) : फ्रान्समधील हिंसक निदर्शनांच्या पार्श्वभूमीवर अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी स्थलांतराच्या धोरणांवरून फ्रान्स सरकारवर जोरदार टीका केली आहे. तसेच, लिबिया, येमेन, हैती आणि सोमालिया या देशांतील स्थलांतरितांना अमेरिकेत प्रवेश देण्याबाबत प्रश्न उपस्थित करताना त्यांनी या देशांसाठी अपमानास्पद शब्दांचा वापर केला. ट्रम्प यांनी या चार देशांना नीच आणि किळसवाणे म्हणुन संबोधले आहे.
 
जॉर्जियातील प्रचारसभेत ट्रम्प यांची टीका
 
शनिवार, २४ ऑक्टोबर रोजी अमेरिकेतील जॉर्जिया राज्याच्या पेरी शहरात रिपब्लिकन उमेदवारांच्या प्रचारसभेला संबोधित करताना ट्रम्प यांनी फ्रान्समधील परिस्थितीचा उल्लेख केला. फ्रान्सने आपल्या सीमा अशा लोकांसाठी खुल्या ठेवल्या आहेत, ज्यांना त्या देशाबद्दल आदर नाही, असा दावा त्यांनी केला. फ्रान्समध्ये सुरू असलेल्या हिंसाचारासाठी त्यांनी स्थलांतर धोरणांना जबाबदार धरले आणि अमेरिकेने अशा लोकांना आपल्या देशात प्रवेश देऊ नये, असे म्हटले. (Donald Trump Immigration Controversy)
 
 
 
लिबिया, येमेन, हैती आणि सोमालियाचा उल्लेख
 
याच सभेत ट्रम्प यांनी लिबिया, येमेन, हैती आणि सोमालिया या देशांचा उल्लेख करत त्यांना ‘दहशतवादग्रस्त’ देश संबोधले. अमेरिकेने या देशांतील स्थलांतरितांना स्वीकारण्याऐवजी नॉर्वे आणि स्वीडनसारख्या देशांतील नागरिकांना प्राधान्य का देऊ नये, असा सवाल त्यांनी उपस्थित केला. त्यांच्या या विधानामुळे स्थलांतरितांविषयीच्या त्यांच्या कठोर भूमिकेवर पुन्हा चर्चा सुरू झाली आहे.
 
फ्रान्समध्ये हजारो पोलिस तैनात
 
दरम्यान, फ्रान्समध्ये वाढती महागाई, आर्थिक विषमता आणि सरकारी धोरणांविरोधात मोठ्या प्रमाणावर निदर्शने सुरू आहेत. २४ ऑक्टोबर रोजी देशभरात झालेल्या आंदोलनांमध्ये फ्रान्सच्या गृह मंत्रालयाच्या अंदाजानुसार सुमारे ४ लाख १० हजार लोक सहभागी झाले होते. पॅरिससह काही शहरांमध्ये निदर्शक आणि पोलिसांमध्ये संघर्ष झाला. काही ठिकाणी पोलिसांनी अश्रुधुराचा वापर केला, तर हिंसाचार आणि लुटमारीच्या घटनाही घडल्या. परिस्थिती नियंत्रणात ठेवण्यासाठी देशभरात सुमारे ७० हजार पोलिस आणि जेंडरम तैनात करण्यात आले होते. (Donald Trump Immigration Controversy)
 
फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष मॅक्रॉन यांची नाराजी
 
फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन यांनी यापूर्वी फ्रान्समधील परिस्थितीचा वापर राजकीय फायद्यासाठी करणाऱ्या परदेशी नेत्यांवर टीका केली होती. देशातील हिंसाचारासाठी स्थलांतरितांना सरसकट जबाबदार धरणाऱ्या दाव्यांवरही त्यांनी आक्षेप घेतला. फ्रान्समधील निदर्शनांमागे महागाई, शिक्षणव्यवस्थेतील समस्या आणि आर्थिक विषमता यांसारखे मुद्देही आहेत.
 
अमेरिकेत नोव्हेंबर २०२६ मध्ये होणाऱ्या मध्यावधी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर ट्रम्प यांनी स्थलांतर आणि राष्ट्रीय सुरक्षेचे मुद्दे प्रचारसभांमध्ये ठळकपणे मांडले आहेत. त्यामुळे त्यांच्या या वक्तव्याला केवळ फ्रान्समधील परिस्थितीवरील प्रतिक्रिया न मानता अमेरिकेतील स्थलांतरविषयक राजकारणाच्या संदर्भातही पाहिले जात आहे. (Donald Trump Immigration Controversy)'
 
 




मुंबई तरुण भारत वेब टीम

Hello, You must be familiar with the Nation First approach daily 'Mumbai Tarun Bharat' as a newspaper committed to fearless and nationalist ideals and constantly doing conscious journalism for it. The journey of four decades has been successful only because of your trust and cooperation. Dear readers, we have been making a successful effort to always be perfect in our commitment to the thoughts of the nation and the national interest...
 
Changing with time is essential for any organization. Daily 'Mumbai Tarun Bharat' has decided to take this role here too and make 'MahaMTB' available in the media for the new 'smart' generation. Today's youth, readers, and citizens are becoming more and more 'smart' day by day. And in today's 'smart' era, information is available in abundance in the Internet-enabled information explosion. However, there is a need for complementary knowledge to determine a modern role and approach that is compatible with culture, motionlessness and tradition.
 
That is why mahamtb.com, MahaMTB Mobile App', MahaMTB Youtube Channel, MahaMTB Facebook Page, MahaMTB Twitter, MahaMTB Instagram, MahaMTB Telegram, MahaMTB WhatsApp Group etc. through social media and advanced avatar content. We are coming before you. Role in the new era, 'smart' journalism with a view, 'smart' multimedia for the new era, and journalism for a 'smart' Maharashtra will be the side of the game.
 
Now get all the updates in one click! mahamtb.com
संबंधित मजकूर