ऑडिओ क्लिपची सत्यता तपासणे महत्वाचे! -राज्यमंत्री पंकज भोयर

    25-Oct-2026   
 
Pankaj Bhoyar Audio Clip
 
नागपूर  (Pankaj Bhoyar Audio Clip) : जी ऑडिओ क्लिप बाहेर आली आहे ती जवळजवळ सर्वांनी ऐकली. इतक्या उशीरा ही ऑडिओ क्लिप बाहेर कशी आली? हा महत्वाचा प्रश्न आहे. त्यामुळे प्रथम या क्लिपची सत्यता तपासणे आवश्यक आहे, अशी प्रतिक्रिया गृहराज्यमंत्री पंकज भोयर यांनी दिली.
 
एका वृत्तवाहिनीशी बोलताना राज्यमंत्री पंकज भोयर म्हणाले की, "यात प्रत्येक जण एकमेकाकडे संशयाने बघतो आहे. परंतू, यामुळे महायुती आणि महायुतीच्या नेत्यांमध्ये असलेला समन्वय कुठेही बिघडणार नाही, असे मला वाटते. या महायुतीच्या अभेद्य समन्वयात बाधा निर्माण करण्याचा प्रयत्न करण्यासाठी अशा प्रकारे डुप्लिकेट ऑडिओ क्लिप तयार करण्यात आली आहे का, याची सत्यता तपासणे आवश्यक आहे. त्यानंतरच यावर बोलणे योग्य राहील."  (Pankaj Bhoyar Audio Clip)
 
लवकरच सत्य जनतेसमोर येईल
 
"मुख्यमंत्र्यांनी या प्रकरणाच्या चौकशीचे आदेश दिले आहे. स्वतः मनोज जरांगे पाटील यांनीदेखील याची चौकशी करण्याची विनंती केली आहे. पोलिस प्रशासनाच्या वतीने फॉरेन्सिक तपासणीच्या माध्यमातून सत्यता पडताळण्याचे काम सुरु झाले असून लवकरच जनतेसमोर याची सत्यता येईल. राजकारणामध्ये एकमेकांवर आरोप प्रत्यारोप सदैव होत असतात. परंतू, त्या आरोपांची सत्यता तपासणे अतिशय आवश्यक आहे. मनोज जरांगे यांच्याकडे अशा पद्धतीच्या अजून काही क्लिप्स असेल तर त्यांनी त्या तपासासाठी द्याव्यात. नेमकी या गोष्टीची व्याप्ती कुठपर्यंत आहे त्यावर चौकशीचा कालावधी अवलंबून राहील," असेही त्यांनी सांगितले.  (Pankaj Bhoyar Audio Clip)
 
"रामदास कदम हे शिवसेनेचे ज्येष्ठ नेते आहेत. कदाचित भावनेच्या भरात जाऊन त्यांनी असे वक्तव्य केलेले असावे. परंतू, भाजप असे काम करेल अशा कुठलाही अपेक्षा त्यांनी ठेवू नये," असेही ते म्हणाले. तसेच मागच्या अनेक वर्षांपासून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस कुशलपणे राज्याचे नेतृत्व करत आहेत. अशावेळी त्यांना अडचणीत आणणे किंवा त्यांना बदनाम करण्याचा प्रयत्न अनेक वेळा झाला आहे. परंतू, त्यांनी प्रत्येक संकटावर मात करून जनतेचे काम करण्यासाठी पुढे आले," असेही राज्यमंत्री पंकज भोयर म्हणाले.  (Pankaj Bhoyar Audio Clip)
 
 




अवंती भोयर

विज्ञान शाखेतील पदवीनंतर भारतीय जनसंचार संस्थान (IIMC) अमरावतीतून पत्रकारितेचे पदव्युत्तर शिक्षण. 'दै. मुंबई तरुण भारत'मध्ये वेब उपसंपादक या पदावर कार्यरत. शेती, साहित्य, राजकारण या विषयात विशेष रस. हस्तकला, संगीत आणि कविता लेखनाचा छंद....
संबंधित मजकूर