ठाणे, : (Shrikant Shinde on 500 crore audio clip)मराठा आरक्षण आंदोलनकर्ते मनोज जरांगे-पाटील यांनी समोर आणलेल्या कथित ऑडिओ क्लिपमधील ५०० कोटी रुपयांच्या आरोपावर खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी अखेर मौन सोडले. “जरांगे पाटलांना जो प्रश्न पडला आहे, तोच मलाही पडला आहे. ते ५०० कोटी रुपये नेमके कुठे गेले? माझ्यापर्यंत तर ते पैसे पोहोचलेले नाहीत,” अशी उपरोधिक प्रतिक्रिया त्यांनी शनिवारी प्रसारमाध्यमांशी बोलताना दिली.
“ज्याच्याकडे हे पैसे पाठवले होते, तो माझ्यापर्यंत पोहोचलेला नाही. मी देखील गेल्या दोन दिवसांपासून या पैशांचा शोध घेत आहे. ५०० कोटी रुपये एकत्र ठेवले तर कसे दिसतील आणि ते वाहून नेण्यासाठी किती गाड्या लागतील, याचीही आमची चर्चा सुरू होती. मला काही माहिती मिळाली तर मी तुम्हाला सांगेन,” असे शिंदे म्हणाले.(Shrikant Shinde on 500 crore audio clip)
नेमके काय म्हणाले शिंदे?
"गेले दोन दिवस त्यांच्याबाबत संशोधन करत होतो, ज्या कोणामार्फत 500 कोटी पाठवले होते तो माझ्यापर्यन्त पोहोचला नाही. जरांगे पाटलांना जो प्रश्न पडलाय तो मलाही पडलाय आणि आता त्याला शोधायला चाललोय मी..आम्ही चर्चा करत होते 500 कोटी एकत्र कसे दिसतील किती गाड्या लागतील? कोण काय बोलत यावर न जाता आता मुख्यमंत्री यांनी चौकशी चे आदेश दिले आहेत त्यामुळे कळेल काय गोष्टी आहेत त्या..या मागे नक्की काय आहे याचा मी पण रिसर्च करतो आहे माध्यमांनी पण करा मला कळलं तर मी सांगेन तुम्हाला कळलं तर तुम्ही सांगा"(Shrikant Shinde on 500 crore audio clip)
असा उपरोधिक टोला श्रीकांत शिंदे यांनी माध्यम प्रतिनिधीनी विचारलेल्या प्रश्नवर लगावला.