‘एकनाथ शिंदेंना संपवण्याचे षड्यंत्र’; क्लिपमध्ये बोलणारे लोक भाजपचेच -रामदास कदम

ऑडिओ क्लिपवरून रामदास कदमांचा गंभीर आरोप

 

Ramdas Kadam on Audio Clip
 
मुंबई (Ramdas Kadam on Audio Clip): मराठा समाजाचे नेते जरांगे पाटील यांना न्याय देण्यासाठी मराठा समाजाने डोक्यावर उचलून घेत होता, पण हा माणूस सर्वांना फसवत आहे. आमचे मित्र प्रसाद लाड तुमच्यासोबत जेवत आहेत, स्वागत करत आहे. काय जिवा भावाची मैत्री झाली आहे, असे म्हणत शिवसेना नेते रामदास कदम यांनी मनोज जरांगेंच्या आरोपावरुन पलटवार करताना ती ऑडिओ क्लिप एआय क्लिप नसून ती भाजपाची क्लिप आहे, असे भाजपला देखील लक्ष केले. (Ramdas Kadam on Audio Clip)
 
भाजपच्या लोकांना हाताशी धरून तुम्ही एकनाथ शिंदेंना संपविण्यासाठी, एका मराठा नेत्याला संपवण्यासाठी हे षडयंत्र करत आहात. अनेक लोक आले तुम्हाला भेटले, मंत्री भेटले आंदोलन संपवावे यासाठी तुमच्या उशाशी बसले. त्यापैकी आमचे मित्र प्रसाद लाड तुमच्यासोबत जेवत आहेत, स्वागत करत आहे. काय जिवा भावाची मैत्री झाली आहे. तुम्ही बोलता असतानाही तुमच्या खांद्याला खांदा लावून प्रसाद लाड बसले आहेत. (Ramdas Kadam on Audio Clip)
 
जरांगेनी ऐकवलेली क्लिप 32 मिनिटांची आहे. भाजप कसा वाढवायचा हे सगळं त्या क्लिपमध्ये आले आहे. ही क्लिप 10 ऑक्टोबर 2024 ची आहे. मनोज जरांगे जाती जातीमध्ये भिंती निर्माण करत आहेत. मला बोलायला लावू नका, तुमच्याकडे ही क्लिप कधी आली सांगा, असा सवाल रामदास कदम यांनी उपस्थित केला. (Ramdas Kadam on Audio Clip)
 
मराठा समाजासाठी दिवस रात्र धावणारा मावळा त्याने ही क्लिप मला आणून दिली. यामध्ये प्रवीण दरेकर यांचे नाव आले आहे. याचे उत्तरही भाजपला द्यावे लागणार आहे. विश्वासाने एकनाथ शिंदे तुमच्यासोबत आल्यानंतर एकनाथ शिंदेंची भीती तुम्हालाही वाटायला लागली आहे का? एकनाथ शिंदेचा केसाने गळा कापण्याचे काम भाजप करतंय का? त्या क्लिपची चौकशी झाली पाहिजे. मी स्वतः नरेंद्र मोदी, अमित शहा, मोहन भागवत, देवेंद्र फडणवीस यांना पत्र पाठवले आहे, असे म्हणत रामदास कदम यांनी पुन्हा एकदा जरांगे पाटील यांना लक्ष्य केले. (Ramdas Kadam on Audio Clip)
 




गायत्री श्रीगोंदेकर

मूळची अहिल्यानगर येथील. 'राज्यशास्त्र' विषयातील पदवी. रानडे इन्स्टिट्यूट मधून (सा.फु.पुणे विद्यापीठ) 'एमजेएमसी' विषयात पदव्युत्तर शिक्षण. २०१९मध्ये मुंबई तरुण भारतमध्ये 'मंत्रालय प्रतिनिधी' या पदावर रुजू. सद्यस्थितीत 'इन्फ्रास्ट्रक्चर आणि डेव्हलपमेंट' विशेष प्रतिनिधी म्हणून कार्यरत. राज्यातील पायाभूत सुविधांविषयी फिल्ड रिपोर्ट आणि लेखनात रस.
संबंधित मजकूर