एकनाथ शिंदेनी रामदास कदमांच्या आरोपांबाबत भूमिका स्पष्ट करावी; रामदास कदमांना भाजप नेत्यांनी घेरले


Ramdas Kadam on Audio Clip 
 
मुंबई (Ramdas Kadam on Audio Clip): मराठा नेते मनोज जरांगे यांनी ऐकवलेल्या कथित ऑडिओ क्लिपवरून भाजपवर निशाणा साधणाऱ्या शिवसेना नेते रामदास कदम यांच्या भूमिकेवरून भाजपतील नेत्यांनी प्रचंड नाराजी व्यक्त करत याप्रकरणावर उपमुख्यमंत्री आणि शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांनी आपली भूमिका स्पष्ट करावी अशी मागणी केली आहे. (Ramdas Kadam on Audio Clip)
 
दरम्यान, भाजप आमदार प्रवीण दरेकरांनी पत्रकार परिषदेतून रामदास कदमांना धारेवर धरले आहे. तुम्ही एवढे आक्रमक बोलता वागता तर तुम्ही सांगावे की, कोणत्या भाजपच्या नेत्याने शिंदेंना संपवण्याचा विडा उचलला आहे. आम्ही बोलायचे का देवेंद्र फडणवीसांना संपवण्यासाठी जरांगेंना कोण कोण ताकद देत होते? त्यामुळे मला वाटते आपण एका घरात राहतो, नांदतो तर आपण सभ्यपणा आणि सुसंस्कृतपणा जपला पाहिजे, अशी समजही यावेळी प्रवीण दरेकरांनी दिली. (Ramdas Kadam on Audio Clip)
 
देवेंद्रजींवर आरोप झाले, देवेंद्रजींबरोबर कटकारस्थाने झाली. त्याचे आम्ही स्वागत करायचे का? शिंदेंवर आरोप झाल्यानंतर तुम्ही नेत्यांनी बोलंण हे स्वाभाविक आहे. आम्हीही सांगतो की याची चौकशी झाली पाहिजे, पण तेव्हा देवेंद्रजींबद्दल जे झाले त्याचं काय? आम्ही सांगतो मग त्याचीही चौकशी झाली पाहिजे, असाही इशारा यावेळी दरेकरांनी दिला आहे. (Ramdas Kadam on Audio Clip)
 
एखाद्या ज्येष्ठ आणि जबाबदार नेत्याने आपल्या नेतृत्वाला खुश करण्यासाठी आपल्या मुलाचे मंत्रीपद सुरक्षित ठेवण्यासाठी किंवा आणखी प्रमोश मिळण्यासाठी त्यांनी खुशाल बोलावे काही हरकत नाही, पण तुम्ही भारतीय जनता पक्षाला दोष देणार असाल तर ते आम्ही खपवून घेणार नाही. तुम्ही जसे आक्रमक बोलता, वागता तसं आम्हालाही बोलता येते, असा शब्दात दरेकरांनी रामदास कदमांच्या विधानांवर नाराजी व्यक्त केली. (Ramdas Kadam on Audio Clip)
 
 




गायत्री श्रीगोंदेकर

मूळची अहिल्यानगर येथील. 'राज्यशास्त्र' विषयातील पदवी. रानडे इन्स्टिट्यूट मधून (सा.फु.पुणे विद्यापीठ) 'एमजेएमसी' विषयात पदव्युत्तर शिक्षण. २०१९मध्ये मुंबई तरुण भारतमध्ये 'मंत्रालय प्रतिनिधी' या पदावर रुजू. सद्यस्थितीत 'इन्फ्रास्ट्रक्चर आणि डेव्हलपमेंट' विशेष प्रतिनिधी म्हणून कार्यरत. राज्यातील पायाभूत सुविधांविषयी फिल्ड रिपोर्ट आणि लेखनात रस.
संबंधित मजकूर