“राहुल गांधींची रॅली शीख नरसंहाराच्या जखमांवर मीठ चोळणारी!” रविशंकर प्रसाद यांचा काँग्रेसवर निशाणा

 
Rahul Gandhi Rally Sikh Genocide Controversy
 
नवी दिल्ली (Rahul Gandhi Rally Sikh Genocide Controversy) : राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखाली १ नोव्हेंबर रोजी आयोजित करण्यात येणाऱ्या रॅलीवरून भाजपने काँग्रेसवर टीका केली आहे. ही रॅली १९८४ मधील शीखविरोधी नरसंहाराच्या जखमांवर मीठ चोळणारी असल्याचा आरोप भाजपने केला आहे. दिल्लीतील रामलीला मैदानावर होणारी ही रॅली शीखविरोधी दंगलींच्या स्मृतिदिनाशी जुळत असल्याने, या दिवशी रॅली आयोजित करण्याचा निर्णय शीख समुदायाच्या भावना दुखावणारा असल्याचे भाजपने म्हटले आहे. भाजपचे ज्येष्ठ नेते रविशंकर प्रसाद यांनी पत्रकार परिषदेत हा मुद्दा उपस्थित करत राहुल गांधी यांच्या निर्णयावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले.
 
‘शीख समुदायाच्या जखमांवर मीठ का चोळत आहात’
 
रविशंकर प्रसाद यांनी राहुल गांधी यांना १ नोव्हेंबरलाच रॅली घेण्याचा आग्रह का आहे, असा सवाल केला. १९८४ मधील हिंसाचाराच्या आठवणी शीख समुदायासाठी अत्यंत वेदनादायी असून, त्या दिवसाचे भावनिक महत्त्व लक्षात घेणे आवश्यक असल्याचे ते म्हणाले. (Rahul Gandhi Rally Sikh Genocide Controversy)
 
“दि. १ नोव्हेंबर रोजी रामलीला मैदानावर मोठी रॅली घेऊन राहुल गांधी शीख समुदायाच्या जखमांवर मीठ का चोळू इच्छितात?” असा सवाल प्रसाद यांनी उपस्थित केला.
 
‘इंडिया आघाडीतील काही पक्षही तारखेबाबत नाराज’
 
रॅलीच्या तारखेवरून इंडिया आघाडीतील काही घटक पक्षही समाधानी नसल्याचा दावा रविशंकर प्रसाद यांनी केला. या विषयावर चर्चा करण्यासाठी २२ ऑक्टोबर रोजी ऑनलाइन बैठक आयोजित करण्यात आली होती; मात्र अनेक सहयोगी पक्ष सहभागी न झाल्यामुळे ही बैठक पुढे ढकलण्यात आल्याची माहिती मिळाल्याचे त्यांनी सांगितले. (Rahul Gandhi Rally Sikh Genocide Controversy)
 
तारखेबाबत बोलताना रविशंकर प्रसाद म्हणाले, “आम्हाला असेही समजले आहे की, इंडिया आघाडीतील अनेक मित्रपक्ष १ नोव्हेंबर या तारखेबाबत समाधानी नव्हते. त्यांनी रॅलीची तारीख पुढे ढकलण्याचा सल्लाही दिला होता. यावरून राहुल गांधी यांचे खरे रूप समोर येते. ते एखाद्या निर्णयावर ठाम राहिले, की कोणाचेही ऐकत नाहीत. त्यांना स्वतःच्या मनाप्रमाणे वागायचे असेल, तर ते मागे हटणार नाहीत. मग त्यासाठी शीख समुदायाच्या भावनांची थट्टा करावी लागली, तरी त्यांना त्याची पर्वा नसेल,” अशी टीका प्रसाद यांनी केली. (Rahul Gandhi Rally Sikh Genocide Controversy)
 
मतदारयादीतील कथित घोळाविरोधात रॅली
 
दरम्यान, इंडिया आघाडीने १ नोव्हेंबर रोजी रामलीला मैदानावर रॅली आयोजित केली आहे. मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याची मागणी करणे तसेच मतदारयाद्यांच्या विशेष सखोल पुनरीक्षण प्रक्रियेत (SIR) कथित अनियमितता झाल्याचा आरोप उपस्थित करून सरकार आणि निवडणूक आयोगावर दबाव वाढवणे, हा या आंदोलनाचा उद्देश असल्याचे वृत्त आहे.
 
१९८४ मध्ये तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांची ३१ ऑक्टोबर रोजी हत्या झाल्यानंतर दिल्लीसह देशातील अनेक भागांत शीखविरोधी हिंसाचार उसळला होता. १ नोव्हेंबर हा त्या हिंसाचारातील पीडितांच्या स्मृतींशी जोडलेला दिवस आहे. त्यामुळे रॅलीच्या तारखेवरून भाजप आणि काँग्रेस यांच्यात राजकीय वाद निर्माण झाला आहे. (Rahul Gandhi Rally Sikh Genocide Controversy)
 
 




मुंबई तरुण भारत वेब टीम

Hello, You must be familiar with the Nation First approach daily 'Mumbai Tarun Bharat' as a newspaper committed to fearless and nationalist ideals and constantly doing conscious journalism for it. The journey of four decades has been successful only because of your trust and cooperation. Dear readers, we have been making a successful effort to always be perfect in our commitment to the thoughts of the nation and the national interest...
 
Changing with time is essential for any organization. Daily 'Mumbai Tarun Bharat' has decided to take this role here too and make 'MahaMTB' available in the media for the new 'smart' generation. Today's youth, readers, and citizens are becoming more and more 'smart' day by day. And in today's 'smart' era, information is available in abundance in the Internet-enabled information explosion. However, there is a need for complementary knowledge to determine a modern role and approach that is compatible with culture, motionlessness and tradition.
 
That is why mahamtb.com, MahaMTB Mobile App', MahaMTB Youtube Channel, MahaMTB Facebook Page, MahaMTB Twitter, MahaMTB Instagram, MahaMTB Telegram, MahaMTB WhatsApp Group etc. through social media and advanced avatar content. We are coming before you. Role in the new era, 'smart' journalism with a view, 'smart' multimedia for the new era, and journalism for a 'smart' Maharashtra will be the side of the game.
 
Now get all the updates in one click! mahamtb.com
संबंधित मजकूर