'महा-एमटीबी घरगुती इकोफ्रेंडली गणेशा २०२६' स्पर्धेचा २६ ऑक्टोबर रोजी मुंबईत पारितोषिक वितरण सोहळ्याचे आयोजन

    24-Oct-2026   


Maha MTB Gharguti Eco-Friendly Ganesha 2026
 
मुंबई, : (Maha MTB Gharguti Eco-Friendly Ganesha 2026 ) दै. 'मुंबई तरुण भारत' आयोजित, 'महाराष्ट्र प्रदुषण नियंत्रण मंडळ' प्रस्तूत 'महा-एमटीबी घरगुती इकोफ्रेंडली गणेशा २०२६' 'पावर्ड बाय' 'द हाऊस ऑफ अभिनंदन लोढा' या स्पर्धेचा पारितोषिक वितरण सोमवार सोहळा दि. २६ ऑक्टोबर रोजी रवींद्र नाट्य मंदिर (मिनी थिएटर), प्रभादेवी, मुंबई येथे सायंकाळी ६.०० वाजता आयोजित केला जाणार आहे.
 
राज्यभरातील साडेतीन कोटी गणेशभक्तांपर्यंत पोहोचलेल्या या स्पर्धेसाठी 'विदा रिअल्टी' सहप्रायोजक म्हणून लाभले. या स्पर्धेमुळे राज्यभरातील एकूण अडीच हजारांहून अधिक गणेशभक्तांनी आपल्या घरी पर्यावरणपूरक बाप्पाची आरास केली. स्पर्धेची लोकप्रियता पाहता यंदा बृह्न्महाराष्ट्रातील सर्व गणेशभक्तांचेही या उपक्रमात स्वागत करण्यात आले होते. केवळ राज्यभरातून नाही तर गोवा, कर्नाटक, मध्य प्रदेश आदी राज्यातूनही गणेशभक्तांनी या स्पर्धेत सहभाग नोंदविला.(Maha MTB Gharguti Eco-Friendly Ganesha 2026 )
 
पर्यावरणपूरक सण साजरा व्हावा या भावनेने अनेक गणेशभक्त आणि कलाप्रेमींनी आपल्या लाडक्या बाप्पाची वैशिष्टपूर्ण आणि सामाजिक संदेश देणारी आरास केली आहे. येत्या सोमवारी आयोजित केलेल्या या पारितोषिक सोहळ्यात एकूण प्रथम पाच क्रमांक आणि २० उत्तेजनार्थ स्पर्धकांना पारितोषिक वितरण करण्यात येणार आहे. तसेच रोख रक्कम थेट विजेत्यांच्या बँक खात्यात पाठविली जाणार आहे.
 
विशेष आकर्षण : लोककलांवर आधारित कार्यक्रम
 
दरवर्षी प्रमाणे यंदाही विशेष आकर्षण म्हणजे वन्यवाणी फाऊंडेशन प्रस्तुत लोककलांवर आधारित धमाल मनोरंजन कार्यक्रम सादर केला जाणार आहे. या सोहळ्यात ३० लोककलावंतांसह दीप्ती भागवत, मकरंद सावंत, सचिन शिंदे, अनघा ठाकूर आदी कलावंत गणरायाचा जयघोष करण्यास सज्ज आहेत. हा कार्यक्रम सर्वांसाठी खुला असून नावनोंदणीसाठी सोबत दिलेल्या क्यूआर कोडवर आपली उपस्थिती कळवणे बंधनकारक आहे. काही जागा विजेते आणि निमंत्रित पाहुण्यांसाठी राखीव असणार आहेत.(Maha MTB Gharguti Eco-Friendly Ganesha 2026 )
 
पारितोषिकाचे स्वरुप
 
प्रथम क्रमांक - रु. ७५,००१
द्वितीय क्रमांक - रु. ५०,००१
तृतीय क्रमांक - रु. २५,००१
चतुर्थ क्रमांक - रु. १०,००१
पाचवा क्रमांक - रु. ५,००१
उत्तेजनार्थ (२०) - प्रत्येकी २,००१
सन्मानचिन्ह
 




तेजस परब

मुंबई विद्यापीठातून एमएसीजेपर्यंत शिक्षण. वाणिज्य शाखेतून पदवी. सध्या ‘मुंबई तरुण भारत’मध्ये मुख्य उपसंपादक (वेब) म्हणून कार्यरत. पाच वर्षांपासून विविध वृत्तपत्रांमध्ये वार्ताहर व उपसंपादक पदाचा अनुभव. दोन प्रमुख वृत्तपत्रांतील निनावी सुत्रांच्या बातम्यांबद्दल संशोधन. डिजिटल मीडियासाठी लेखन. डिजिटल मार्केटींग विषयाचा अभ्यासक. 

संबंधित मजकूर