मुंबई (Smart Citizen Curriculum Mumbai Municipal Corporation) : विद्यार्थ्यांमध्ये संविधानिक मूल्ये, सामाजिक संवेदनशीलता आणि नागरिक म्हणून अधिकार व कर्तव्यांची जाणीव निर्माण करण्यासाठी मुंबई महानगरपालिकेने पुढाकार घेतला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि भारताचे माजी सरन्यायाधीश भूषण गवई यांच्या हस्ते मुंबई येथे ‘स्मार्ट नागरिक – नागरिकशास्त्र आणि संविधानिक मूल्ये’ या शालेय अभ्यासक्रमाचे, तसेच भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनावर आधारित ‘विद्यार्थी प्रेरणा – भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर’ या पुस्तकाचे प्रकाशन करण्यात आले.
शिक्षणासोबत विद्यार्थ्यांमध्ये समाजाप्रती बांधिलकी आणि जबाबदार नागरिकत्वाची भावना रुजविणे आवश्यक आहे. या दृष्टीने मुंबई महानगरपालिकेने सुरू केलेले दोन्ही उपक्रम स्तुत्य असल्याचे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी केले. (Smart Citizen Curriculum Mumbai Municipal Corporation)
मुंबई पब्लिक स्कूलमधील विद्यार्थ्यांचे कौतुक
मुंबई पब्लिक स्कूलमधील विद्यार्थ्यांशी संवाद साधल्यानंतर महाराष्ट्राचे भविष्य उज्ज्वल असल्याचा विश्वास अधिक दृढ झाल्याचे मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितले. विद्यार्थ्यांची आकलनशक्ती, आधुनिक तंत्रज्ञानाची जाण आणि संगणक प्रयोगशाळेत सुरू असलेले काम उल्लेखनीय असल्याचे त्यांनी नमूद केले. (Smart Citizen Curriculum Mumbai Municipal Corporation)
मोठे शुल्क आकारणाऱ्या खासगी शाळांच्या तुलनेतही मुंबई पब्लिक स्कूलमध्ये उत्तम दर्जाचे शिक्षण दिले जात असल्याचे पाहून आनंद झाल्याचे ते म्हणाले. विद्यार्थ्यांमध्ये संविधानिक मूल्ये, सामाजिक जाणीव आणि नागरिक म्हणून जबाबदारीची भावना रुजविणारे उपक्रम सक्षम व मूल्यनिष्ठ समाज घडविण्यासाठी महत्त्वपूर्ण ठरतील, असेही त्यांनी स्पष्ट केले. (Smart Citizen Curriculum Mumbai Municipal Corporation)
शिक्षणासोबत सामाजिक संवेदनशीलताही आवश्यक
आजच्या विद्यार्थ्यांना समाजमाध्यमांद्वारे जगभरातील माहिती सहज उपलब्ध होत आहे. या माहितीचा त्यांच्या व्यक्तिमत्त्वावर प्रभाव पडतो. त्यामुळे विद्यार्थ्यांना नागरिक म्हणून आपले अधिकार, कर्तव्ये आणि समाजाप्रती असलेली जबाबदारी यांची जाणीव करून देणे आवश्यक असल्याचे मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितले.
समाजाच्या उभारणीत आपलाही सहभाग असला पाहिजे, याचे भान विद्यार्थ्यांमध्ये निर्माण झाले पाहिजे. समाजाने आणि संविधानाने निर्माण केलेल्या व्यवस्थेमुळे शिक्षण घेण्याची आणि व्यक्तिमत्त्व घडविण्याची संधी मिळाली, याची जाणीव ठेवणारी पिढी घडविणे महत्त्वाचे असल्याचे त्यांनी नमूद केले. (Smart Citizen Curriculum Mumbai Municipal Corporation)
शिवरायांची मूल्ये आणि संविधानाची शिकवण
भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी दिलेल्या संविधानातील मूल्ये ही जबाबदार नागरिकत्वाची पायाभरणी असल्याचे मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितले. छत्रपती शिवाजी महाराज यांनी स्वराज्याच्या माध्यमातून विविध समाजघटकांना एकत्र आणून त्यांच्यामध्ये निर्भयता, एकता आणि समाजाप्रती संवेदनशीलतेची मूल्ये रुजविली, असे ते म्हणाले.
स्वराज्याची मूल्ये आणि भारतीय संविधानाने दिलेली शिकवण विद्यार्थ्यांना समजली, तर ते निराश न होता जीवनात समाज आणि देशासाठी सकारात्मक योगदान देतील, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. (Smart Citizen Curriculum Mumbai Municipal Corporation)
लोकशाही आणि संविधानिक मार्गानेच निर्णय
भारतीय संविधानामुळे देशाची लोकशाही व्यवस्था मजबूत झाली आहे. महामानव, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे संविधान अस्तित्वात असेपर्यंत निर्णय संसदीय व्यवस्थेत घेतले जातील आणि सत्ताबदल निवडणुकांच्या माध्यमातूनच होईल, असे मुख्यमंत्री फडणवीस यांनी नमूद केले. (Smart Citizen Curriculum Mumbai Municipal Corporation)
संविधानाने प्रत्येक व्यक्तीला न्याय मिळविण्याचा अधिकार दिला आहे. त्यामुळे कोणत्याही प्रश्नावर न्याय मिळविण्यासाठी संविधानिक मार्गाचा अवलंब करणे आवश्यक आहे. तसेच, संविधानविरोधी मार्गांचा अवलंब करणाऱ्यांसाठी कायदेशीर चौकटही संविधानाने निश्चित केली असल्याचे त्यांनी सांगितले.
या कार्यक्रमाला आमदार कालिदास कोळंबकर, आमदार अमित साटम, मुंबईच्या महापौर रितू तावडे, उपमहापौर संजय घाडी यांच्यासह इतर मान्यवर उपस्थित होते. (Smart Citizen Curriculum Mumbai Municipal Corporation)
Hello, You must be familiar with the Nation First approach daily 'Mumbai Tarun Bharat' as a newspaper committed to fearless and nationalist ideals and constantly doing conscious journalism for it. The journey of four decades has been successful only because of your trust and cooperation. Dear readers, we have been making a successful effort to always be perfect in our commitment to the thoughts of the nation and the national interest...
Changing with time is essential for any organization. Daily 'Mumbai Tarun Bharat' has decided to take this role here too and make 'MahaMTB' available in the media for the new 'smart' generation. Today's youth, readers, and citizens are becoming more and more 'smart' day by day. And in today's 'smart' era, information is available in abundance in the Internet-enabled information explosion. However, there is a need for complementary knowledge to determine a modern role and approach that is compatible with culture, motionlessness and tradition.
That is why mahamtb.com, MahaMTB Mobile App', MahaMTB Youtube Channel, MahaMTB Facebook Page, MahaMTB Twitter, MahaMTB Instagram, MahaMTB Telegram, MahaMTB WhatsApp Group etc. through social media and advanced avatar content. We are coming before you. Role in the new era, 'smart' journalism with a view, 'smart' multimedia for the new era, and journalism for a 'smart' Maharashtra will be the side of the game.