_202610231437188957_H@@IGHT_350_W@@IDTH_696.jpg)
ठाणे, : (Shiv Sena Viral Audio Clip)मराठा समाजात गैरसमज निर्माण करून महायुतीत फूट पाडण्याचा प्रयत्न होत असल्याचा आरोप करत, व्हायरल ऑडिओ क्लिपची सखोल आणि निष्पक्ष चौकशी करण्याची मागणी शिवसेनेच्या शिष्टमंडळाने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली.
विधान परिषद उपसभापती सचिन अहिर, खासदार रवींद्र वायकर, मिलिंद देवरा, आमदार हेमंत पाटील, माजी खासदार तथा शिवसेना सरचिटणीस राहुल शेवाळे यांच्यासह मान्यवरांनी गुरुवारी रात्री उशिरा मुख्यमंत्र्यांची भेट घेऊन निवेदन सादर केले. ऑडिओ क्लिपमागील सत्य जनतेसमोर आणावे, अशी मागणी यावेळी करण्यात आली.(Shiv Sena Viral Audio Clip)
मराठा समाजाच्या आरक्षणाचा प्रश्न, कुणबी प्रमाणपत्रांचे वाटप आणि मराठा युवकांच्या रोजगारासाठी एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्री असताना महत्त्वपूर्ण निर्णय घेतल्याचा दावा शिवसेनेने केला. सर्व समाजघटकांना सोबत घेऊन सामाजिक सलोखा कायम राखण्याची भूमिका पक्षाने मांडली. व्हायरल क्लिपच्या पार्श्वभूमीवर समाजात तेढ निर्माण होऊ नये आणि सत्य समोर यावे, यासाठी निष्पक्ष चौकशी आवश्यक असल्याचे शिवसेनेने म्हटले आहे.दरम्यान मुख्यमंत्र्यांनी चौकशी करण्याचे आश्वासन दिल्याची माहिती शिष्टमंडळातील नेत्यांनी दिली.
या भेटीनंतर विधान परिषदेचे उपसभापती सचिन अहिर यांनी सांगितले की, मनोज जरांगे यांनी सादर केलेल्या ऑडिओ क्लिपच्या आधारे पक्षाच्या नेत्यांवर नाहक आरोप करण्यात आले आहेत. या संपूर्ण प्रकरणाची सखोल चौकशी करून ऑडिओ क्लिपची सत्यता तपासावी आणि सत्य जनतेसमोर आणावे, अशी मागणी मुख्यमंत्र्यांकडे केली आहे.(Shiv Sena Viral Audio Clip)
माजी खासदार राहुल शेवाळे यांनीही या प्रकरणाच्या चौकशीची मागणी केली. कथित ऑडिओमध्ये एका महिलेने खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्याबाबत केलेल्या विधानाची तातडीने चौकशी करावी. या आरोपांमागे राजकीय हेतू आहे का, याचाही तपास करून योग्य ती कारवाई करावी, अशी मागणी त्यांनी केली.(Shiv Sena Viral Audio Clip)