२८ वर्षे सेवा, तरीही हक्कांपासून वंचित; कंत्राटी कामकागारांचे सात महिन्यांचे थकीत वेतन तातडीने अदा करा -मंत्री ॲड. आकाश फुंडकर यांचे निर्देश

    23-Oct-2026   
 
Saswad Municipal Contract Workers
 
मुंबई (Saswad Municipal Contract Workers): सासवड नगरपालिकेतील २३० कंत्राटी कामगार गेल्या २८ वर्षांपासून सेवा बजावत आहेत. या कामगारांना किमान वेतन, भविष्य निर्वाह निधी (पीएफ), कर्मचारी राज्य विमा (ईएसआय) आणि अन्य वैधानिक लाभ मिळत आहेत किंवा नाहीत, याची विशेष चौकशी करून सात महिन्यांचे थकीत वेतन तातडीने अदा करावे, असे निर्देश कामगार मंत्री ॲड आकाश फुंडकर यांनी दिले आहेत. (Saswad Municipal Contract Workers)
 
कामगार आयुक्त कार्यालयात आयोजित बैठकीत ते बोलत होते. यावेळी आमदार विजय शिवतारे, कामगार विभागाच्या अपर मुख्य सचिव आय ए कुंदन, उपसचिव दीपक पोकळे, उपसचिव स्वप्नील कापडणीस उपस्थित होते.
 
मंत्री आकाश फुंडकर म्हणाले की, "सासवड नगरपालिकेत एकूण २३० कंत्राटी कामगार गेल्या २८ वर्षांपासून सेवा बजावत आहेत. कामाचे स्वरूप नियमित असूनही या कामगारांना कायमस्वरूपी सेवेत सामावून घेतलेले नाही. नगरपालिकेने मंजूर केलेल्या वेतनातून विविध कारणांनी सुमारे ३० ते ४० टक्के रक्कम कपात केली जात असल्याची तक्रार कामगारांनी केली आहे. सन २०२२ पासून अनेक कामगारांचा पीएफ नियमितपणे जमा झालेला नाही. तसेच ईएसआय, किमान वेतन, साप्ताहिक सुटी, वैधानिक लाभ मिळत नसल्याच्या ही तक्रारी आलेले आहेत."  (Saswad Municipal Contract Workers)
 
नगरपालिकेकडून तातडीने अहवाल मागवा
 
"नगरपालिका ही मूळ नियोक्ता संस्था असल्यामुळे संबंधित ठेकेदारांकडून कामगार कायद्यांचे पालन होत आहे किंवा नाही, याची तपासणी करणे ही नगरपालिकेची कायदेशीर जबाबदारी आहे. त्यामुळे सासवड नगरपालिकेकडून या संपूर्ण प्रकरणाचा सविस्तर अहवाल तातडीने मागवावा," अशा सूचनाही मंत्री आकाश फुंडकर यांनी दिल्या.  (Saswad Municipal Contract Workers)
 
 




अवंती भोयर

विज्ञान शाखेतील पदवीनंतर भारतीय जनसंचार संस्थान (IIMC) अमरावतीतून पत्रकारितेचे पदव्युत्तर शिक्षण. 'दै. मुंबई तरुण भारत'मध्ये वेब उपसंपादक या पदावर कार्यरत. शेती, साहित्य, राजकारण या विषयात विशेष रस. हस्तकला, संगीत आणि कविता लेखनाचा छंद....
संबंधित मजकूर