मालेगावात नवदुर्गा विसर्जन मिरवणुकीवर दगडफेक! चार धर्मांध मुस्लिमांसह अज्ञातांविरोधात गुन्हा दाखल

    23-Oct-2026   

Malegaon Stone Pelting
 
मुंबई : (Malegaon Stone Pelting)वाशीम जिल्ह्यातीन मालेगाव शहरात टिपू सुलतान चौक परिसर येथे नवदुर्गा विसर्जन मिरवणुकीदरम्यान दगडफेक झाल्याची घटना घडली. दगडफेकीचे कारण गुलाल उधळण्यावरून झालेला वाद असल्याचे सांगण्यात येते आहे. या प्रकरणी चार धर्मांध मुस्लिमांसह अन्य काही अज्ञातांविरोधात मालेगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप केल्याने परिस्थिती नियंत्रणात आली असून, शहरात शांतता प्रस्थापित झाली आहे.
 
मिळालेल्या माहितीनुसार, बुधवार, दि. २१ ऑक्टोबर रोजी नवदुर्गा विसर्जन मिरवणुकीनिमित्त मालेगाव शहरात पोलिसांनी चोख बंदोबस्त तैनात केला होता. रात्री नऊच्या सुमारास जनता नवदुर्गा उत्सव मंडळाची मिरवणूक टिपू सुलतान चौक परिसरात पोहोचली. मिरवणुकीतील भाविक गुलालची उधळण करत आनंद व्यक्त करत होते. त्यावेळी गुलाल उधळण्याच्या कारणावरून अचानक धर्मांध मुस्लिमांच्या जमावाने मिरवणुकीच्या दिशेने दगडफेक केली. दगडफेकीत काही वाहनांचे नुकसान झाल्याचेही निदर्शनास आले.(Malegaon Stone Pelting)
 
सदर प्रकरणी सरकारतर्फे सहाय्यक पोलीस निरीक्षक पांडुरंग राजहंस इंगळे यांनी मालेगाव पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार सय्यद नदीम सय्यद युसुफ, सय्यद रफीक सय्यद युसुफ, सय्यद सुलतान आणि जब्बार शहा यांच्यासह काही अज्ञातांविरोधात भारतीय न्याय संहितेच्या कलम १८९(२), १२५, ३२४(४), ३०० तसेच महाराष्ट्र पोलीस कायद्याच्या कलम १३५ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलिसांकडून सध्या सुरु आहे.(Malegaon Stone Pelting)
 
 




ओंकार मुळ्ये

'मास मीडिया' या विषयातून पदवीपर्यंतचे शिक्षण पूर्ण.'कम्युनिकेशन ॲण्ड जर्नालिझम' विषयातून पदव्युत्तरपर्यंतचे शिक्षण पूर्ण. सध्या दै.'मुंबई तरुण भारत'मध्ये वेब उपसंपादक म्हणून कार्यरत. लिखाण, संगीत, वाचन, फोटोग्राफी, इ.ची आवड.लिवोग्राफी भाषाशैलीत विशेष प्रावीण्य.बालपणापासून रा.स्व.संघाचा स्वयंसेवक
संबंधित मजकूर