कथित ऑडिओ क्लिपची फॉरेन्सिक चौकशी करणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आश्वासन


Fadnavis Forensic Probe 
 
मुंबई, : (Fadnavis Forensic Probe)मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे-पाटील यांनी समोर आणलेल्या कथित ऑडिओ क्लिपप्रकरणी संपूर्ण चौकशी करण्यात येईल. या क्लिपची फॉरेन्सिक तपासणी करून त्यातील सत्य जनतेसमोर आणले जाईल, असे आश्वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले. नागपूर येथे पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीत मतदान केल्यानंतर प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना त्यांनी या प्रकरणावर प्रतिक्रिया दिली.
 
या कथित ऑडिओ क्लिपमध्ये नेमके काय संभाषण आहे, ते अडीच वर्षांनंतरच समोर येण्यामागे काय हेतू आहे आणि या प्रकरणातून कोणाला लक्ष्य केले जात आहे, असे अनेक प्रश्न उपस्थित होत असल्याचे फडणवीस यांनी नमूद केले. त्यामुळे या संपूर्ण प्रकरणाची सखोल चौकशी होणे आवश्यक असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.(Fadnavis Forensic Probe)
 
मनोज जरांगे-पाटील यांनीही या प्रकरणाच्या चौकशीची मागणी केली आहे. तसेच शिवसेनेच्या शिष्टमंडळाने आणि भाजपनेही चौकशीची मागणी केल्याचे मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितले. या प्रकरणाची फॉरेन्सिक पद्धतीने तपासणी करून संभाषणाची सत्यता पडताळली जाईल आणि त्यातून समोर येणारे सत्य जनतेसमोर आणले जाईल, असे त्यांनी स्पष्ट केले.
 
दरम्यान, नागपूर विभागीय पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीत मतदान केल्यानंतर फडणवीस यांनी मतदारांना मोठ्या संख्येने मतदान करण्याचे आवाहन केले. विधानपरिषद हे ज्येष्ठांचे सभागृह असून, पदवीधर आणि शिक्षक मतदारांनी लोकशाहीच्या या उत्सवात उत्स्फूर्तपणे सहभागी व्हावे, असे ते म्हणाले. मतदान केंद्रांवर दिसणाऱ्या रांगांमुळे समाधान व्यक्त करत त्यांनी निवडणूक शांततेत पार पडेल, असा विश्वासही व्यक्त केला.(Fadnavis Forensic Probe)
 
 
 




गायत्री श्रीगोंदेकर

मूळची अहिल्यानगर येथील. 'राज्यशास्त्र' विषयातील पदवी. रानडे इन्स्टिट्यूट मधून (सा.फु.पुणे विद्यापीठ) 'एमजेएमसी' विषयात पदव्युत्तर शिक्षण. २०१९मध्ये मुंबई तरुण भारतमध्ये 'मंत्रालय प्रतिनिधी' या पदावर रुजू. सद्यस्थितीत 'इन्फ्रास्ट्रक्चर आणि डेव्हलपमेंट' विशेष प्रतिनिधी म्हणून कार्यरत. राज्यातील पायाभूत सुविधांविषयी फिल्ड रिपोर्ट आणि लेखनात रस.
संबंधित मजकूर