_202610231456019676_H@@IGHT_350_W@@IDTH_696.jpg)
मुंबई : (Dr Madhavrao Parelkar Birth Centenary)'रुग्ण सेवा हीच ईश्वर सेवा' हे ब्रीद अंगिकारून गेली ५८ वर्षे 'नाना पालकर स्मृती समिती' रुग्णांची अविरत सेवा करत आहे. स्व. डॉ. माधवराव परळकर यांनी समितीच्या कार्याची पायाभरणी केली. त्यांच्या जन्मशताब्दीच्या निमित्ताने, त्यांच्या स्मृतींना उजाळा देण्यासाठी आणि त्यांच्या कार्याचा गौरव करण्यासाठी जन्मशताब्दी समारोह आयोजित करण्यात आला आहे. हा सोहळा शनिवार, दि. २४ ऑक्टोबर रोजी सायंकाळी ५:३० वाजता बी. एन. वैद्य सभागृह, राजा शिवाजी विद्यालय, हिंदू कॉलनी, दादर (पू) येथे पार पडणार आहे.
या सोहळ्यामध्ये राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे अखिल भारतीय कार्यकारिणी सदस्य भैय्याजी जोशी हे प्रमुख मार्गदर्शक म्हणून उपस्थित असतील. तसेच, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी हे प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित राहणार असून, टाटा मेमोरियल सेंटरचे माजी संचालक पद्मश्री डॉ. राजेंद्र बडवे हे सन्माननीय अतिथी म्हणून याप्रसंगी उपस्थित असतील. या विशेष प्रसंगी स्व. डॉ. माधवराव परळकर यांच्या प्रेरणादायी जीवन कार्यावर आधारित एका विशेष गौरव ग्रंथाचे प्रकाशन मान्यवरांच्या हस्ते केले जाणार आहे.(Dr Madhavrao Parelkar Birth Centenary)
या जन्मशताब्दी सोहळ्यास सर्व हितचिंतक, नागरिक, कुटुंब व मित्रपरिवारासह मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन समितीच्या वतीने करण्यात आले आहे.