मुंबई (Agriculture Students Day Maharashtra): देशाचे पहिले केंद्रीय कृषीमंत्री डॉ. पंजाबराव ऊर्फ भाऊसाहेब देशमुख यांच्या जयंतीनिमित्त दि. २७ डिसेंबर हा दिवस कृषी विद्यार्थी दिन म्हणून साजरा करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. गुरुवारी, कृषी विभागाच्या वतीने याबाबतचा शासन निर्णय जारी करण्यात आला. (Agriculture Students Day Maharashtra)
गेल्या अनेक वर्षांपासून डॉ. पंजाबराव ऊर्फ भाऊसाहेब देशमुख यांच्या जयंतीनिमित्त २७ डिसेंबर हा दिवस कृषी विद्यार्थी दिन म्हणून साजरा करण्यात यावा, अशी राज्यातील अॅग्रीकॉस विद्यार्थ्यांची मागणी होती. अखेर या मागणीला यश आले असून, महाराष्ट्र शासनाच्या कृषी विभागाने २७ डिसेंबर हा दिवस ‘राज्य अॅग्रीकॉस – कृषी विद्यार्थी दिन’ म्हणून घोषित केला आहे. (Agriculture Students Day Maharashtra)
डॉ. पंजाबराव देशमुख हे स्वतंत्र भारताचे पहिले कृषीमंत्री होते. कृषी शिक्षण, संशोधन आणि शेतकरी संघटनांच्या माध्यमातून त्यांनी देशाच्या कृषी क्षेत्राच्या विकासासाठी महत्त्वपूर्ण योगदान दिले. त्यांच्या कार्याचा गौरव करण्याबरोबरच कृषी शिक्षण घेणारे विद्यार्थी, कृषी पदवीधर, संशोधक आणि युवकांना प्रेरणा मिळावी, हा या निर्णयामागील प्रमुख उद्देश आहे. कृषी क्षेत्रातील विद्यार्थ्यांच्या ज्ञानाचा, संशोधनाचा आणि नव्या संकल्पनांचा शेतीच्या विकासासाठी उपयोग व्हावा, यासाठी हा दिवस महत्त्वपूर्ण ठरणार आहे. (Agriculture Students Day Maharashtra)
हा निर्णय युवकांना प्रेरणा देणारा - कृषीमंत्री दत्तात्रय भरणे
या निर्णयाबद्दल बोलताना कृषीमंत्री दत्तात्रय भरणे म्हणाले की, “देशाचे पहिले केंद्रीय कृषीमंत्री डॉ. पंजाबराव देशमुख यांचे कृषी शिक्षण, संशोधन आणि शेतकरी हितासाठीचे योगदान अतुलनीय आहे. त्यांच्या जयंतीनिमित्त २७ डिसेंबर हा दिवस ‘राज्य अॅग्रीकॉस - कृषी विद्यार्थी दिन’ म्हणून घोषित करण्याचा निर्णय कृषी क्षेत्रातील विद्यार्थी, संशोधक आणि युवकांना प्रेरणा देणारा ठरेल. या माध्यमातून कृषी शिक्षण आणि संशोधनातील योगदानाचा गौरव होईल. आजच्या बदलत्या परिस्थितीत शेतीसमोर हवामान बदल, पाणीटंचाई आणि बाजारपेठेतील आव्हाने आहेत. अशा परिस्थितीत कृषी शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांनी आधुनिक तंत्रज्ञान, संशोधन आणि नावीन्यपूर्ण प्रयोगांच्या माध्यमातून शेती अधिक सक्षम करण्यासाठी पुढाकार घेणे आवश्यक आहे. ‘राज्य अॅग्रीकॉस – कृषी विद्यार्थी दिन’ या उपक्रमातून विद्यार्थ्यांना त्यांच्या जबाबदारीची जाणीव होण्यासोबतच कृषी क्षेत्रातील योगदानासाठी प्रोत्साहन मिळेल." (Agriculture Students Day Maharashtra)
विज्ञान शाखेतील पदवीनंतर भारतीय जनसंचार संस्थान (IIMC) अमरावतीतून पत्रकारितेचे पदव्युत्तर शिक्षण. 'दै. मुंबई तरुण भारत'मध्ये वेब उपसंपादक या पदावर कार्यरत. शेती, साहित्य, राजकारण या विषयात विशेष रस. हस्तकला, संगीत आणि कविता लेखनाचा छंद....