मुंबई, : (Maharashtra Government Technical Schools)राज्यातील २५ शासकीय तांत्रिक विद्यालयांची नावे बदलण्यास राज्य सरकारने मान्यता दिली आहे. कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विभागाने याबाबतचा शासन निर्णय जारी केला.
राज्यात सध्या १६२ शासकीय तांत्रिक विद्यालये कार्यरत आहेत. दरम्यान, नवीन नावांमध्ये विविध क्षेत्रांत योगदान देणाऱ्या व्यक्तींच्या नावांचा समावेश करण्यात आला आहे. मुंबईतील एल्फिन्स्टन तांत्रिक विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालयाचे नाव डॉ. जयंत नारळीकर शासकीय तांत्रिक विद्यालय, मुंबई असे करण्यात येणार आहे. तर, दादर येथील शासकीय तांत्रिक विद्यालयाचे नाव विश्वनाथ बेडेकर शासकीय तांत्रिक विद्यालय, मुंबई असे करण्यात येणार आहे. विलेपार्ले पश्चिम येथील विद्यालयाला मोहनलाल चौहान यांचे नाव देण्यात आले आहे.(Maharashtra Government Technical Schools)
ठाणे जिल्ह्यातील विद्यालयांना माधवराव भिडे, माधवराव ओक, कृष्णा माळी आणि धरमपाल गुप्ता यांची नावे देण्यात आली आहेत. पालघरमधील तलासरी व जव्हार येथील विद्यालयांना अनुक्रमे महादेव अंधेर गुरुजी आणि नवसू दादा वळवी यांची नावे देण्यात आली आहेत. यासह २५ तांत्रिक विद्यालयांची नावे बदलण्यात आली आहेत(Maharashtra Government Technical Schools)
विज्ञान शाखेतील पदवीनंतर भारतीय जनसंचार संस्थान (IIMC) अमरावतीतून पत्रकारितेचे पदव्युत्तर शिक्षण. 'दै. मुंबई तरुण भारत'मध्ये वेब उपसंपादक या पदावर कार्यरत. शेती, साहित्य, राजकारण या विषयात विशेष रस. हस्तकला, संगीत आणि कविता लेखनाचा छंद....